" ती " आणि " तो " || भाग २ || प्यारवाली Love story


           नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो.... !! मनोरंजन ( Entertainment ) Khasmarathi Special या भागात आम्ही तुमच्यासाठी नवनवीन उत्सुकता आणि मनाला कुतूहल लावणाऱ्या जीवन कथा ( Life story ) तसेच प्रेमकथा ( Love story ) घेऊन येत आहोत , या लेखात तुम्ही एक अनोखी प्रेमकथा पाहणार आहात . जिचं नाव आहे ती " आणि " तो " एक प्यारवाली Love story जी वाचताना नक्कीच तुमच्यातील उत्सुकता वाढेल .
" ती " आणि " तो " || भाग २ || प्यारवाली Love story
" ती " आणि " तो " || भाग २ || प्यारवाली Love story

🔅 भाग - २ 🔅

          दोघांचही प्रेम एकमेकांना अंगवळणी पडायला लागलं. त्याच बोलण्यात त्यांचा प्रेमळ संसार त्यात रमू लागला. दिवसा वेळ नाही म्हणून रात्रीसुद्धा विषय निघायला लागले.कधी कधी तर त्याचे डोळे बोलता बोलता निजायचे, पण ती मात्र एकटीच बडबडत असायची. तिच्या लक्षात आलं की , तिचे डोळे थोडेसेच पण मात्र नक्कीच भिजायचे.


          एक दिवस बोलणं नाही झालं नं तर दोघांनाही जीव कासावीस झाल्यासारखं वाटायचे ,

          दररोज कितीतरी वेळ चालणारे फोन आणि मेसेज यातील शब्दा शब्दांतून एकमेकांच्या मनातिल भावना व्यक्त होत होत्या ,

          मनातल्या मनात सुखाचा संसाराची स्वप्ने फुलू लागली होती,

          फोन आणि मेसेज वरचा तो क्षणांचा सहवास त्यांना आता नुसता हवा च नाही तर कायमच्या सोबत असावा असा वाटू लागला होता ,

त्यासाठी किती तरी स्वप्ने ते रंगवत होती ,

सतत मनघूटळत राहणारी कोमल ,


अचानक वैभवाच्या रुपात मिळालेले अनोळखी प्रेम मिळाल्यामुळे आता खूप खुश राहू लागली होती ,त्यामुळे घरचेही खूप आनंदी होते.

तसं दोघांच्या हि मनात विचारांची घालमेल चालूच होती ,प्रेम तर होतं पण व्यक्त करायला दोघेही खूप घाबरत होती .

अशातच........

   अखेर वैभव ने पुढाकार घेतला आणि काहीसा घाबरत एकदाचा तिला msg केला ......... " प्रिय कोमल "


      बोलणे लटके तुझे,
लटकाच तो रुसवा साज,
सुटता सुटे नं बंध ते,
मन झाले वेडेपिसे आज...


पाहिले न मी तुजला कधी.
तरी आज तू माझ्या हृदयात..
शोधतो मीच मजला,
का हरवलो मी तुझ्या प्रेमात..


इंद्रलोकीची अप्सरा तू,
की आहेस वसंताची बहार,
दरवळणारा गंध कुसुमातला,
की तू कस्तुरी सुवास ..


अनोळखी तरी,ओळखीची..
सांग ना ग कोण तू,
दूर असून का जवळची,
गूढ प्रिये हे खोल तू....


          .....मला माहित आहे तुझा प्रेम आणि लग्न या दोन्हीवर विश्वास नाही , पण फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवशील का ??सम्पूर्ण आयुष्यभर तुझी काळजी घेईल.तुला कधीच कोणत्या प्रसंगात एकटं सोडणार नाही ! ' खूप प्रेम करतो तुझ्यावर ' .मला माझ्या आयुष्यात तू हवी आहेस, " लग्न करशील का माझ्याशी ? "
" ती " आणि " तो " || भाग २ || प्यारवाली Love story
" ती " आणि " तो " || भाग २ || प्यारवाली Love story
      
          ..प्रेम आणि लग्न या विषयापासून सतत दूर पळणारी कोमल ,वैभव ने केलेल्या 'Propose' मुळे गालावरची खळी पार लाजून गेली.


पण तिच्या आयुष्यात काय भूतकाळ घडला होता ? ते वैभव ला माहिती नव्हतं ,

आपल्या भूतकालाविषयी त्याला कळलं तर ?

          कदाचित तो निघून तर जाणार नाही नं कायमचा ?लोक पुन्हा काय म्हणतील ? जेवढं सहन करतोय त्यापेक्षा जर त्रास झाला तर ? अशा अचानक आलेल्या विचारांच्या वादळामुळे तिच्या मनात कलह निर्माण झाला होता ,


          पण तरी सुद्धा आपण खरं प्रेम करतोय त्यामुळे त्याच्यापासून काही लपवायच नाही ,या विचाराने त्याला सांगावं म्हणून तिने त्याला msg type करायला सुरुवात केली आणि लिहिलं..............
  

( कथेमध्ये पुढे काय घडतं, वैभव ने केलेल्या Propose ला कोमल काय उत्तर देईल. कोमल त्याच प्रेम स्वीकारेल का ? वाचण्यासाठी पुढील भाग लवकरच .........)


क्रमश:
लेखन : ✍  गोविंद हिरडकार . 
             ◾    7709575552


FB :  गोविंद हिरडकार . Or 
➤  https://www.facebook.com/govind.hiralkar


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Khasmarathi 


➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने