Your Name | Kimi No Na Wa (2016) || Movie Review 


          मी पाहिलेला पहिलाच ऍनिमेशन चित्रपट " Your Name ". हा मी पाहिलेला चित्रपट , माझ्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्तम चित्रपट आहे . २०१६ साली प्रकाशित झालेल्या या your name movie ला IMDB वर ८.४ चे रेटिंग आहे . या चित्रपटाने १५ अवॉर्ड जिंकले असून २५ नामांकने मिळाली आहेत. तर गुगल च्या अहवालानुसार १०० पैकी ९७ लोक या चित्रपटाला पसंती देतात. हि एक जापनीज कथा असून त्याचे जापनीज नाव " Kimi No Na Va " आहे. तो your name english dub तसेच  your name hindi dub मध्ये पाहायला मिळेल . हा चित्रपट एकूण १ तास ५२ मिनिटांचा असून तो ऍनिमेशन / कल्पनारम्य (फँटसि) प्रकारात मोडतो .चित्रपटाचे दिग्दर्शन माकोतो शिंकाई यांनी केले आहे. ह्या चित्रपटाची कथा खूपच मनोरंजक आणि अनोखी आहे.

Your Name | Kimi No Na Wa (2016) || Movie Review
Your Name | Kimi No Na Wa (2016) || Movie Review

#YOUR NAME 💝 


#PART - 1 


"खूप सारे चित्रपट पाहिले आहेत, पाहत असतो आणि हो पाहत राहिन देखील ...!
           
       3 तासात एखादं नवीन जग , एखादा नवीन जन्म, एकाचं अथवा अनेकांचं संपूर्ण आयुष्य जगण्याचा कदाचित माझ्या अनुभवातला , बघण्यातला - 'सर्वात महत्त्वाच'  जगण्यातला सर्वात सोप्पा ~ सर्वात समृद्ध मार्ग हाच असावा!! 

       "#Your_Name" 

       चित्रांना जिवंतपणा आणणे तसं तर असं देखील सोप्प काम नसतं..!  पैशासाठी असेल अथवा आपल्याइकडे असलेली व्यक्तिपूजक मानसिकता यामुळे म्हणा चित्रपट म्हणलं की typical एक हिरो - एक हिरोईन ....एक व्हिलन .... अथवा मग उगीच एक माणूस 'TIGER' बनून शे-दोनशे लोकांना स्वतःला काहीहि न होऊ देता सहज मारून टाकतो तेव्हाच प्रेक्षकवर्गाला जास्त आवडतो.!

      कदाचित यामुळेच  असावं अथवा मग फक्त पैसा हाच कोणत्याही निर्मिती मागील मूळ प्रेरणास्रोत बनून राहिला असल्याने म्हणा "YOUR NAME" सारखे चित्रपट आपल्याकडे एक तर बनतच नसावेत अथवा मोजकेच बनवले जात असावेत! 

     असो, हा चित्रपट अगदी एक या क्षेत्रातील मास्टरपीस आहे असं दोनदा पाहिल्यानंतर दोन्ही वेळेस पटलं, इतकी चांगली निर्मिती फक्त आपल्यापुरतीच मर्यादित राहिली तर नक्कीच हा तिचा अवमान ठरेल ....अनेकांनी पाहिलाही असेल पण ज्यांनी नसेल पाहिला त्यांनी पाहावा अथवा कधीतरी आयुष्याची पाने पलटताना एखादं सुवर्ण पान म्हणून जपून ठेवावा यासाठी खूप वर्षांनी इथे करत असलेल्या या थोड्याफार लेखनप्रपंचाचा हेतू!!

     your name anime पट असण्यासोबतच अलगद उलगडत जाणारी कहाणीची सुरुवात आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जात आहे हे अनेक चित्रपट पाहणाऱ्या अथवा चित्रपटप्रेमी व्यक्तीलाच लक्षात येतं ... 

     10 ते 15 व्या मिनिटाला स्पष्टपणे जाणवतं की हि कहाणी आपल्याला उभ्या आयुष्यात न कोणी ऐकवली आहे न कधी आपण पाहिली/वाचली असेल .... 

     मी रात्रभर जागी असताना देखील सकाळी 3 वाजता चित्रपट पाहायला सुरुवात केली होती ... त्यामुळेच असं म्हणता येणार नाही पण एखाद्या छानश्या व्यक्ती सोबत बोलताना घालवलेल्या प्रत्येक क्षणाला पुढे काय असेल याची जशी उत्सुकता असते अगदी तसंच .... सस्पेन्स शेवंटपर्यंत अगदी कायम रहातो....

  

#PART - 2

  
Story-

   एक धूमकेतू/खगोलीय वस्तू आकाशातून पृथ्वीवर येऊन उल्कापात होतो ... त्यात एक गाव संपूर्ण पणे नष्ट होऊन जातं!! 

   एक मुलगी आणि एक मुलगा दोघांना पण सकाळी सकाळी झोपेतून उठल्यास एखादं स्वप्न पाहून उठलो आहोत असं वाटतं.....काहीतरी हरवल्याचा आभास दोघांनाही होत असतोच!

   मुलगा एका मोठ्या शहरात टोकियो ला राहतो तर मुलगी एका खेडेगावात! सुरुवात होते तेव्हा फक्त त्या मुलीचं आयुष्य आपल्याला हळूहळू उलगडताना दिसतं.... एका normal आयुष्याला वैतागलेली, मात्र मनाची तितकीच सुंदर आणि हो समजदार सुद्धा 💝  तिचे वडील मेयर/प्रतिष्टित व्यक्तिमत्त्व असतं ..जे नुकतंच राजकारणात पदार्पण करणार असतं....जे त्यांच्या पासून दूरच राहत असतं ... एक लहान बहीण आणि एक  आजी !! असा परिवार!!

     देवाची पूजा आणि एक विशिष्ट विधी करण्याचं काम त्या मुलीच्या घरची परंपरा असते! तिची आज्जी तिला त्या परंपरेचं महत्व सांगत असताना मुसुबी हि संकल्पना समजावून सांगते!! (The best part of this movie) 

[ #मुसुबी 

इस शब्द का मतलब हमारी सोच से भी गहरा है! सिलाई और बुनाई करना मुसुबी है!
लोगों का तालमेल भी मुसुबी है! समय का बहाव भी मुसुबी है!
सबकुछ हमारे देवताओ से जुडा हुआ है इसलिये, जब हम कुछ सिलते या बुनते है तो वो अपने आप में देवताओ की कला और समय के बहाव का प्रतिक होता है! वो सब जुडते है और आकार लेते है! वो घूमते है बंध जाते है! कभी कभी कमजोर होकर  तुट जाते है! लेकिन फिर मिल भी जाते है! मुसुबी असल में समय का बहाव है!!

जब हम कुछ खाते है या पीते है तो वो तत्व हमारे शरीर में मिल जाते है! उसे भी मुसुबी हि है!

ये एक जर्या है इन्सानो और देवताओ के मिलाव का"

हा संवाद यातील प्रत्येक शब्द समजदार पणाची आपलीच एक वेगळी ऊंची दर्शवितो ... खास करून चित्रपटाच्या शेवटी देखील हे आपल्या लक्षात येत नाही .....  ]

कसं सगळं काही एकमेकांशी जुळलेलं आहे ... कसं सगळं एकमेकांत गुंफत जातं... एखाद्या धाग्याच्या गुंतागुंतीतून किती सुंदर कलाकृती निर्माण होते हे सगळं म्हणजे मुसुबीच असतं! असं ती सांगते.... 

      एकीकडे तो तुटलेला तारा आकाशातून हळू हळू पृथ्वी जवळ येत असतो आणि दुसरीकडे एके दिवशी ती मुलगी निरस आयुष्याला वैतागून एकदा रडत रडत wish करते "अगले जनम में मुझे किसी बडे शहर का लडका बना देना" 

आणि जेव्हा ती रात्री झोपेतून उठते तेव्हा तिचं स्वप्न प्रत्यक्षात घडतं ... ती त्याच मुलाच्या ठिकाणी जाते.... बोले तो आत्म्यांची अदलाबदल... एकीकडे तो मुलगा देखील त्या मुलीच्या ठिकाणी येतो आणि ती त्याचं आयुष्य जगते....

दोघांना आणि प्रेक्षकांना देखील हे हळूहळू उलगडत जातं.... 

पण या सर्व गोष्टी अगदी सुरुवातीला दाखवलेल्या त्या धूमकेतू शी जुळलेल्या असतात ..... तो जेव्हा जेव्हा तिच्या ठिकाणी जातो तेव्हा तेव्हा त्याच्या कानी पडलेल्या गोष्टीने त्याला हळूहळू समजतं की तो 3 वर्ष पाठीमागच आयुष्य जगतोय... शेवटचा दिवस उल्कापाताचा असतो.... त्यांनतर कधीच ते शरीर बदलत नाहीत .... मग तो तिच्याशी related सगळ्या गोष्टींचा शोध घेतो ..... प्रेमात पडल्यास असच होतं न!!


     मग त्याला समजतं की ते गाव आणि ती देखील उल्कापातामध्ये नष्ट झालं आहे....आणि हे घडून 3 वर्ष झाली आहेत.... मग शेवटी तो तिथे जातोच आणि पाहतो मग त्याच्या कामी ती मुसुबी ची प्रथा येते ....ज्यामुळे तो वेळेची मर्यादा ओलांडून तिच्या जागी परत जातो.... आणि तो संपूर्ण गाव वाचवतो!! 

       शेवटी इतकं झाल्यानंतर परत start चा scene येतो .... समांतर जाणाऱ्या रेल्वे मध्ये तो विचार करत असतो .... "मला कशाचा शोध आहे? मी एखादी हरवलेली वस्तू शोधतोय की नोकरी शोधतोय...की एखादी व्यक्ती?"

     अचानकच , त्याला ती आणि तिला तो दिसतो (तोच सीन जिथून movie ची सुरुवात झालेली) .... वेगवेगळ्या trains मध्ये .... आणि मग ते दोघे शेवटी भेटतातच ......आणि मग तो तिला विचारतो ..."hey सुनो क्या हम कभी मिल चुके है?" 

तिचे डोळे भरून येतात अन ते पाहताना माझे पण आले होते आणि मी खात्रीने सांगू शकतो तुमचेही येतीलच.... जेव्हा ते दोघेही एकमेकांना विचारतात पर "तुम्हारा नाम?" Your Name?


#Part - 3 


चित्रपट 3 दा पाहिल्यानंतर एखाद्याला समजेल की किती व्यवस्थित रित्या एक एक दृश्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकमेकांत गुंफलेल आहे ..... अगदी तिळा एवढी देखील कशातच चूक न होऊ देता!" 

वेळ असेल तर नक्की दोनदा बघाच ! 

One of the BEST movie I ever watched in whole my life .... After 'The Curious Case Of Benjamin Button' !

Really Hats off to the creators 🙏 

  इतका चांगला बनवून देखील निर्मात्यांच म्हणणं असं होतं की आम्हाला तो अजून चांगला बनवायचा होता.....! 

#NOTE :-

1) काही माणसं - काही शब्द - काही कहाण्या - काही क्षण मला आयुष्यभर मनात जपून ठेवावे वाटतात ....  अगदी या movie सारखेच ! 💝 

2. "Your_Name" बघण्या पेक्षा जगण्यासारखा वाटला म्हणून इथे Specially Suggest करत आहे आवडला तर ठीक नाही आवडला तरी ठीक! 

          ऍनिमेशन चित्रपट खासकरून जपान व चीन हे त्यांची संस्कृती , धर्म जपतात त्यांच्या परंपरा , रीती रिवाज यांची थट्टा कधीच केली जात नाही. चित्रपटातून नवा संदेश देतात आणि हि गोष्ट मला फार आवडली. या गोष्टींचा अवलंब भारतामध्ये कधी होतो याचा काहीच नेम नाही...

Rating by S.J. :- 10/10* 

~S. J.

हे ही वाचा :-           मित्र आणि मैत्रिणींनो आपण your name movie review पाहिला . पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या चित्रपटावर  तुम्हाला रिव्हिव्यू वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने