ठाकरे सरकार अपयशी , राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ; नारायण राणे || Marathi news


          राज्यातील कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार नारायण राणेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारमध्ये कोरोना संकट हाताळण्याची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी राणेंनी राज्यपालांकडे केली.

ठाकरे सरकार अपयशी , राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ; नारायण राणे || Marathi news
ठाकरे सरकार अपयशी , राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ; नारायण राणे || Marathi news

          नारायण राणे म्हणाले राज्य कसे चालवावे व उपाययोजना राबवाव्यात , पोलीस यंत्रणा कशाप्रकारे हाताळली जावी, हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमलेले नाही. मनपा व राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट आहे तर रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे हि चिंतेची बाब आहे. लोकडाऊनचे उल्लंघन होताना दिसतेय त्यामुळे ही सर्व रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. तरच परिस्थिती सुधारू शकते , अशी विनंतीही राज्यपालांना केली.



          आतापर्यंत राज्याला जे काही दिलंय ते केंद्र सरकारने दिलं आहे. मार्ग शोधायचा सोडून टीका करणे हे एक प्रकारचं राजकारण आहे. या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना सुरक्षित कसं ठेवावं याचा अभ्यास नाही, अशा शब्दांत राणेंनी सरकारला लक्ष्य केलं. राज्यातील आणि विशेषत: मुंबईतील रुग्णालयं लष्कराच्या ताब्यात दिली तरच परिस्थिती सुधारेल,सगळा अनागोंदी कारभार राज्यात सुरु आहे. असं मत त्यांनी व्यक्त केलं.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

हे तुम्ही वाचायला हवं : छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या तलवारी 



          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   

2 टिप्पण्या

  1. आपके आपस के मतभेदों से देशवासियों को आप लोग प्रताड़ित करने का मौका मिला उसका फल भोगना ही पड़ेगा जेसे प्रमोद महाजन जी ने जो कुछ ग़लत कीया उसकी कीमत मीली अब तो सुधरेगा भारत की बिक जाने के बाद आपको जागरूकता आयेगी सबके सब पालीटीकल गेम है बाकी कुछ नहीं

    उत्तर द्याहटवा
  2. चुनाव जीतने के बाद भी उद्धव जी में जोश की कमी दिख रही है

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने