महाराष्ट्रात येण्यापूर्वीच परप्रांतीयांनी परवानगी घेणे आवश्यक : राज ठाकरे ,योगींच्या विधानाला प्रत्युत्तर || Marathi news


          महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांनी हेही लक्षात ठेवले पाहिजे की महाराष्ट्रात येण्यापूर्वी परप्रांतीयांनी परवानगी घ्यावी.


          परप्रांतीय मजूर यांच्या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे आमोरा समोर आले. राज ठाकरे म्हणले कि सीएम योगी आदित्यनाथ यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी जे काही परप्रांतीय आहेत त्यांनी महाराष्ट्रानत येण्याआधी परवानगी घेतली पाहिजे . त्याच बरोबर राज ठाकरे यांनी मु. उद्धव ठाकरे सरकारला सुनावले.

महाराष्ट्रात येण्यापूर्वीच परप्रांतीयांनी परवानगी घेणे आवश्यक : राज ठाकरे ,योगींच्या विधानाला प्रत्युत्तर || Marathi news
महाराष्ट्रात येण्यापूर्वीच परप्रांतीयांनी परवानगी घेणे आवश्यक : राज ठाकरे ,योगींच्या विधानाला प्रत्युत्तर 

          मनसे प्रमुख राज ठाकरे हे म्हणाले कि महाराष्ट्र सरकारने या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये परप्रांतीयांचे रेकॉर्ड ठेवले पाहिजे , त्यामध्ये त्यांचा फोटो हि समाविष्ट असावा. राज ठाकरेंच्या या विधानावर प्रवासी मजुरांच्या मुद्यावरून नवे वळण लागण्याची शक्यता आहे. , कारण हे विधान म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी जे फर्मान काढले त्याला प्रत्युत्तर होते.


सीएम योगी आदित्यनाथ यांनी काढलेले फर्मान :


          मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांनी रविवार सांगितले होते कि कोणतेही राज्य जे ऊत्तर प्रदेशातील प्रवाश्याना परत बोलवू इच्छुक असेल तर , त्यांनी युपी सरकारची आधी तशी परवानगी घ्यावी लागेल आणि कामगारांचे सामाजिक-कायदेशीर-आर्थिक अधिकार सुनिश्चित केले पाहिजेत.


          मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की कोरोना लॉकडाऊन पाहता परप्रांतीय मजुरांची विविध राज्यात योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली नाही. हे कामगार आमचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत आणि आम्ही त्यांना उत्तर प्रदेशात रोजगार देऊ, त्यासाठी प्रवासी कमिशनची स्थापना केली जात आहे, ज्या पासून  त्यांना रोजगार उपलब्ध होईल.


         सीएम योगी आदित्यनाथ यांनी एका मासिकाशी बोलताना सांगितले की हे आमचे लोक आहेत आणि काही राज्यांना जर त्यांना परत बोलावायचे असेल तर त्यांना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. ते म्हणाले की, मजुरांना त्यांच्या हक्कांचे रक्षण दिले गेले पाहिजे आणि त्यांच्यावर लक्ष आणि त्यांना महत्त्व प्राप्त झाले पाहिजे.


           पुढे ते म्हणाले कि , सर्व प्रवासी कामगारांची नोंदणी केली जात आहे आणि त्यांचे कौशल्य मापन केले जात आहे. स्थलांतरित कामगारांना आमंत्रित करण्यात स्वारस्य असलेल्या कोणत्याही राज्य किंवा संस्थेस त्यांचे सामाजिक-कायदेशीर-आर्थिक अधिकारांची हमी दिली पाहिजे.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

हे तुम्ही वाचायला हवं : छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या तलवारी 



          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने