केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्य सरकार वाद : रेल्वेमंत्र्यांचे रात्री 2 वाजता ट्वीट || Marathi news


          कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन अलर्ट देण्यात अल्ला त्यामुळे अनेक मजूर अडकून पडले होते. अशा अडकलेल्या प्रवाशांना आपापल्या राज्यात पोहचवण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातून आतापर्यंत ६-७ लाख मजुर आपापल्या गावी परतले . पण अद्यापही रेल्वेकडून दिवसाला ८० ट्रेनची आवश्यकता असताना केवळ ५० टक्के म्हणजे ४० ट्रेन पाठवल्या गेल्या असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे केला. यावरुन आता रेल्वेमंत्री विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष ट्विटरवरुन पाहायला सुरु झाला आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्य सरकार वाद : रेल्वेमंत्र्यांचे रात्री 2 वाजता ट्वीट || Marathi news
रेल्वेमंत्र्यांचे रात्री 2 वाजता ट्वीट

          राज्यासाठी १२५ ट्रेन देण्यात तयार आहोत असे केंद्रीय रेल्वेमंत्री Piyush Goyal यांनी सांगितले व राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी तात्काळ रेल्वेला पाठवण्याचं आवाहन केले होते. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत ३ ट्विट केले. रात्री १२ वाजता पीयूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करुन रात्रीचे बारा वाजले आहेत आणि ५ तासांनंतरही आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून उद्याच्या १२५ ट्रेनची माहिती आणि प्रवाशांची यादी आलेली नाही असे त्यांनी सांगितले.          मध्यरात्री २ च्या सुमारास केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी आम्ही १२५ ट्रेनची तयारी केली असताना महाराष्ट्र सरकारने ४६ गाड्यांची यादी पाठवली आहे , त्यापैकी ४१ ट्रेन सोडाव्या लागतील कारण उर्वरित ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओडिसा या ठिकाणच्या असून तिथे अम्फान चक्रीवादळामुळे ट्रेन चालवण्यास परवानगी नसल्याचं पियूष गोयल यांनी सांगितले.          महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास आवश्यक असणाऱ्या गाड्यांची यादी सादर केली आहे. फक्त केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच ठिकाणी पोहचू द्या, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहचू नये अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी  असा टोमणा लगावला.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या तलवारी           ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने