Spardha Pariksha Preparation in Marathi || MPSC to Talathi Bharti Guidance in Marathi -2
                         
                  MPSC ते Talathi Bharti कोणतीही  Spardha Pariksha असो अथवा आपल्या आयुष्याची लढाई  केव्हावी तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल,  एखादे ध्येय गाठायचे असेल, एखादे स्वप्न साकार करायचे असेल तर तुम्हाला तीन गोष्टी माहिती असाव्या लागतात.... :- 


१. तुम्हाला नेमकं काय हवं आहे?

 २. तुम्हाला ते नेमकं का हवं आहे?

  ३. तुम्हाला ते कसं मिळवता येईल?


स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागण्या पूर्वी हे तीनही प्रश्न तुम्ही एकांतात स्वतः ला एकदा अथवा बऱ्याच वेळा विचारून यांची उत्तरे माहिती करून घ्यायला हवीत !


आता ही उत्तरे तुमच्या आयुष्याचं ध्येय निश्चित करत आहेत हे वेगळ सांगायला नको !

   
             बऱ्याच वेळा अपयश आल्या नंतर खास करून, स्पर्धा परीक्षेत वय संपल्यानंतर सर्व संपल आहे असं अनेकांना वाटते. खरे तर यापैकी बऱ्याच जणांना वरील तीनही प्रश्न कधी पडलेले नसतात आणि त्यामुळेच अनुभवाने परिपूर्ण असणाऱ्या गाठोड्याला ते अपयशाच ओझ समजून आयुष्यभर वाहात रहातात! 


             तुमच्या सोबत असं नको व्हायला असं वाटत असेल तर वरील प्रश्न सर्वप्रथम सोडवा .... स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वात मोठा अनिश्चीततेचा डोंगर असतो ... त्यामुळे मनाची तयारी देखील त्याच प्रकारची ठेवा.... ! रस्ता जितका खराब आणि प्रवास जितका खडतर असतो तितकाच सुंदर ठिकाणी तो जात असतो....त्यामुळे अगदी डोळे आणि मन उघडे ठेऊन आता आपण तयारीला लागू .. ! 


             सर्वप्रथम  GOVERNMENT EXAM PREPARATION करत असताना एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला जितकी माहिती आवश्यक असते ती समजून घेऊयात ! त्यासाठी सर्वप्रथम खालील VIDEO पूर्ण बघा.. !

थोडक्यात एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला खालील गोष्टी माहिती असाव्या लागतात :-

1. Government exams बद्दल माहिती.

2. Post wise syllabus

3. How to prepare ?

4. Time management

5. Exam planning

6. i) Basic level = chapter
    ii) moderate level = chapter
    iii) difficult level = chapter

7. Magical tricks


या सातही मुद्द्यांवर 200 हून अधिक Video Lectures हे JUNIOR STARS या YOUTUBE CHANNEL वरती तुमच्या साठी उपलब्ध आहेत मात्र आपण खासमराठी वर एकदम शिस्त बद्ध पणे आणि अधिक सविस्तर प्रत्येक विषय पाहणार आहोत!
  
  आता खासमराठी वर तुम्हाला स्पर्धा परीक्षेतील काय काय तयारी करून घेतली जाईल ते आता पाहूयात :-


1. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात?


   2. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची || स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शनवरील दोन्ही प्रश्नांमध्येच प्रत्येक परीक्षा आणि त्यासंदर्भातील सर्व माहितीचा गाभा येतो त्या अनुषंगानेच एक एक करत प्रत्येक विषयांवर माहिती घेत चला....!


Spardha Pariksha Preparation in Marathi || MPSC to Talathi Bharti Guidance in Marathi - 2
Spardha Pariksha Preparation in Marathi || MPSC to Talathi Bharti Guidance in Marathi - 2


या आधीचा लेख वाचण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा...! :-


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने