कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची || स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन - 4

                  मागील भागात आपण स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? त्या कोणकोणत्या असतात ते आपण पाहिलेले आहे. सोबतच आपण हे सुद्धा पाहिले की, नागरी सेवा या एका परीक्षेच्या अभ्यासामुळे एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे, पोस्ट, संरक्षण दल, एलआयसी अशा विविध परीक्षांना बसणे सोपे जाते.अगदी अशाच प्रकारे ज्यांचा एमपीएससी (राज्य सेवा परीक्षे) चा अभ्यास परिपूर्ण असतो ते विद्यार्थी पोलीस भरती , तलाठी, लिपिक अशा सरळसेवा परीक्षा अगदी सहज उत्तीर्ण होताना दिसतात.

MPSC EXAM PREPARATION
MPSC EXAM PREPARATION

                   आता आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची ते पाहूयात !

सर्वप्रथम तुम्ही जी कोणती स्पर्धा परीक्षा देणार असाल त्या त्या परीक्षेचा तुम्हाला

1. अभ्यासक्रम
2. परीक्षेचे स्वरूप
3. मागील प्रश्नपत्रिका
4. तो अभ्यासक्रम समाविष्ट असलेली  पुस्तके आणि संदर्भ साहित्य


                या 4 प्रमुख गोष्टी माहिती असणे अति आवश्यक आहे. या चारही अथवा या चारपैकी एकाबद्दल देखील तुम्ही अनभिज्ञ असाल तर तुम्ही वाघाच्या शिकारीसाठी मोकळ्या हातानी जात आहात असे होईल!

          या चार व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आहेत जसे की कट ऑफ किती लागतो? आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत इत्यादी मात्र आपली स्पर्धा फक्त आणि फक्त स्वत:शीच आणि परीक्षेबाबतीत गुणांशी आहे हे कधीच विसरायचं नाही...!


           स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पाहून परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन मागील प्रश्नपत्रिकांचा शक्य तितक्या बारकाईने अभ्यास करायचा त्यांनतर पुस्तकांमधून अभ्यास सुरु करून केलेल्या अभ्यासाचा सराव प्रश्न आणि हळूहळू वेळ लावून प्रश्न पत्रिका सोडविण्याचा सराव करावा!


खालील दिलेल्या विडिओ मध्ये संपूर्ण मार्गदर्शन केले आहे तो नक्की पाहावा :






आता आपण एका एका परीक्षेबद्दल अगदी सविस्तर जाणून घेऊयात :-


1. राज्य सेवा परीक्षा

                     राज्य सेवा पूर्व परीक्षा
                     राज्य सेवा मुख्य परीक्षा
                     मुलाखत


2. PSI/STI/ASST. COMBINED EXAM

सरळसेवा परीक्षा (भरती) :-


1. TALATHI EXAM GUIDANCE
2. लिपिक
3. ग्रामसेवक
4. कृषीसेवक
5.पोलीस भरती
6.CET
7. TET
8. RAILWAY RECRUITMENT BOARD
9. STAFF SELECTION COMMISION
10. IBPS
11. महिला व बालविकास अधिकारी

टीप :-  वरील मुद्द्यांवर जाऊन तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची असेल त्यावर क्लिक करा !


www.khasmarathi.com
TALATHI MEGABHARTI

               महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी हे पोलीस भरती आणि तलाठी भरती यांसारख्या परीक्षांची तयारी करत असतात त्यांनी इथे विशेष लक्षात घ्यायला हवे की अशा प्रकारे एकदम क्रमबद्ध आणि योग्य प्रकारे परीक्षेचे स्वरूप ते अभ्यासक्रम अशा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास भरती निघत नसेल अथवा परीक्षा खूप उशीरा होणार असेल तरीही  केला तर यश आपोआप मिळू शकेल...!


              सोबतच, लहान ध्येय हा गुन्हा असतो असं अब्दुल कलाम यांनी सांगितलेच आहे त्यामुळे छोटी मोठी पोस्ट निघाले तरी भरपूर होईल यापेक्षा कोणतीही परीक्षा दिली तरी मी ती पास च होऊन दाखवेल अशी जिद्द ठेवा आणि अभ्यासाला लागा....!




1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने