Book Review: EK HOTA CARVER | एक होता कार्व्हर  | Khasmarathi


                          नमस्कार मी आज आपल्याला मी वाचलेल्या एक होता कार्व्हर या पुस्तकाबद्दल  सांगणार आहे...

पुस्तक : एक होता कार्व्हर
लेखिका : वीणा गवाणकर
पृष्ठे संख्या : 184
किंमत  : 200 रु
प्रकाशन :  राजहंस प्रकाशन

                जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर श्रमलेल्या, काबाड कस्ट केलेल्या या थोर संशोधकाचं, चित्रकाराचं, कृषितज्ञांचं उभ्या हयातभर अखंड अविरत जीवनप्रवास सांगणारं हे पुस्तक..www.khasmarathi.com
एक होता कार्व्हर | KHASMARATHI
                     केवळ अप्रतिम आणि अवर्णनीय या दोन शब्दात या पुस्तकाची प्रशंसा आपण करूच शकत नाही........!

                          एका विदेशी व्यक्तीबद्दल एवढी विस्तीर्ण आणि त्यांच्या मुळाशी जाऊन सत्य माहितीची पडताळणी करून ती पुस्तकी स्वरूपात समाजापुढे मांडताना लेखकांना किती कसरत घ्यावी लागली असेल हे पुस्तक वाचतांनाच समजतं..

समाजातील कोणत्याही स्तरातील कोणत्याही वयोगटातील वाचकाला हे पुस्तक वाचताना एक वेगळीच ऊर्जा आणि जगण्याची कला शिकवणारं हे पुस्तक..

                         मेरी नावाच्या एका गुलाम निग्रो स्त्री च्या पोटी जन्मलेल्या काळ्या आणि कुरूप मुलांची ही कथा..
तसं काळं आणि कुरूप जन्मनं निसर्गाचं देणं परंतु आपल्या बालपणातच आपल्या पासून आपले आई- वडील हिरावून घेणं हे कोणत्या कर्माचे फळ असतील?

जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या बालपणापासून त्यांच्या मृत्यू पर्येंतचा त्यांचा जीवनप्रवास आणि त्या प्रवासात त्यांचे श्रम, त्यांची विचारसरणी, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन,त्यांनी वेळेला दिलेलं महत्त्व हे प्रत्येक वाचकांसाठी प्रेरणादायी आहे..

★पुस्तकातून आपण काय शिकावं...... :-

● व्यक्तीची परिस्थिती त्याच्या विकासाचा अडथळा नसून त्यांनी परिस्थिती विरुद्ध केलेली हालचाल थांबवली की तो संपतो..

● प्रत्येक व्यक्ती हा अजन्म विद्यार्थीच असतो..
    जगात शिकण्या सारखं आणि शिकून घेण्यासारखं बरच काही आहे..

● व्यक्तीच्या बाह्य अंगावर त्याच परीक्षण करणं हे नेहमीच चुकीचं असतं..

●अंगात कौशल्य असणारा व्यक्ती आयुष्यात उपाशी कधी मरत नाही..

● संधी मिळताच माणसानं प्रत्येक गोस्ट शिकून घ्यावी , त्याचा उर्वरित जीवनात त्याला फायदा होतोच..

● चांगले राहणीमान, स्वज्वळ विचार आणि गोड वाणीत जग जिंकण्याची ताकत असते..

●कोणतीही लालच तुमची प्रगती रोखण्याचा सर्वात मोठा अडथळा आहे..

                     असा हा महामानव 5 जानेवारी 1943 ला काळ्या आईच्या स्वाधीन झाला .....!

            1864 ते 1943 या 79 वर्ष्याच्या काळात आपलं पूर्ण आयुष्य इतरांसाठी खर्च करणारे कार्व्हर वाचताना मन हळवून जातं....!

            निग्रो समाजामुळे त्यांच्यावर झालेला अन्याय व समाज सुधारण्यासाठी त्यांनी केलेलं श्रम, शेती क्षेत्रात संशोधन व वेगवेगळे प्रयोग करून केलेली क्रांती सगळंच अवर्णनीय आहे..वीणाताई मुळे अश्या महामानवाच्या जवळ जाता आलं..
ताई आपले मनापासून आभार.... _/\_


लेखक :- श्री. कैलास रोडे.


टीप :-  अशाच छान छान पुस्तके चित्रपट, माहिती, मनोरंजन, शेती पासून तंत्रज्ञान , नोकरी पासून                     स्पर्धा   परीक्षा              या आणि आयुष्यातील अशा प्रत्येक गोष्टींच्या  ज्ञानासाठी                   
             KhasMarathi सोबतच Famistan या दोन्ही  ठिकाणी दररोज भेट देत चला! 
Post a Comment

Previous Post Next Post