Spardha Pariksha Preparation in Marathi || MPSC to Talathi Bharti Guidance in Marathi - 1
                    
                           MPSC अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION ! स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जवळपास प्रत्येक अधिकारी व्हायचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्याच स्वप्न असते की ही स्पर्धा परीक्षा पास व्हायचीच !! फक्त MPSC च नव्हे तर  POLICE BHARTI , TALATHI BHARTI, SSC , RAILWAY RECRUITMENT , UPSC , BANKING, AAO, PO, अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी दिवस रात्र एक करून अभ्यास आणि तयारी करीत असतात मात्र योग्य मार्गदर्शन सर्वाना उपलब्ध होत नाही...!

www.khasmarathi.com
www.khasmarathi.com



                त्यात आज हजारो कोचिंग क्लासेस निघाले आहेत मात्र हे शिक्षण शिक्षण नसून धंदा झाल्या सारखं याचं स्वरूप आहे.... त्यात आधीच राहण्यापासून आजपर्यंत केलेला शिक्षणा वरील खर्च पाहून अनेकांना स्पर्धा परीक्षा मग ती कोणतीही असो न परवडणारी अशीच वाटते! शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नववी दहावी पासूनच अशा परीक्षांची पुढील वाटचालीची सुशिक्षित आई वडील अथवा शिक्षकवृंदाकडून बरीचशी माहिती दिली जाते, मात्र खेड्यातील मित्र मैत्रिणींचे याबाबतीत भरपूर हाल असतात! पदवी पर्यंत तर बऱ्याच जणांना हेच माहिती नसते की आपण डिग्री अथवा पदवी कशासाठी केली आहे. होय! ही सत्यस्थिती आहे!! २०१४-२०१५ पासून हे प्रमाण बरेच कमी झाले असले तरी अनेकजण आज सुद्धा फक्त कळपाचा भाग बनून राहतात!




             या अशा अगदी मुळापासून खेड्यापाड्यातील सर्व मित्र मैत्रिणींच्या प्रश्नांची जाणीव असल्यामुळेच स्पर्धा परीक्षा बद्दल संपूर्ण मार्गदर्शन अगदी मोफत आणि सर्वांना उपलब्ध असावे असा मानस ठेवून 24 जुलै 2017 पासून JUNIOR STARS  या  YOUTUBE CHANNEL च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा बाबत संपूर्ण मार्गदर्शन देण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत!


                आता यात अजून एक पाऊल पुढे जात खासमराठी.कॉम या  संकेतस्थळाच्या माध्यमातून अधिक योग्य प्रकारे हे मार्गदर्शन इथे दररोज आणि नेहमीसाठी पुरविण्याचा आम्ही संकल्प घेत आहोत! तरी तुमचे जे कोणी मित्र मैत्रिणी सरकारी नोकरीसाठी कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतील, त्यांना ही खासमराठी ची ओळख अवश्य करून द्याच!


                  आणि फक्त MPSC - UPSC  च नव्हे तर बँकिंग पासून पोलीस भरती परीक्षेपर्यंत प्रत्येक परीक्षेचं मार्गदर्शन इथे सर्वांसाठी मोफत उपलब्ध असेल.....कारण :-

Spardha Pariksha Preparation in Marathi || MPSC to Talathi Bharti Guidance in Marathi - 1
Spardha Pariksha Preparation in Marathi || MPSC to Talathi Bharti Guidance in Marathi - 1


    प्रिय मित्रांनो,
       
                  हे आमचं खुप वर्षांपासूनच ध्येय आहे.... आमची मेहनत, आमचा अभ्यास याचा फायदा फक्त आम्हालाच नव्हे तर प्रत्येकाला व्हावा.... हीच या मागची तळमळ आहे.... आणि आम्हाला जमेल तशी "लोकसेवा" करण्याचा यामागचा मानस आहे!
       

              खुप जणांना COACHING CLASSES लावणं शक्य नसतं,  खास करून त्यांना याचा विशेष फायदा व्हावा हेच सुरुवातीला आमच ध्येय होतं.....मात्र आमच्या कडे देण्यासारखं खुप काही आहे हे समजल्यामुळेच आम्ही BEST FROM THE REST देण्याचा प्रयत्न करतोय.....!


      बाकी मोती तितके घ्या शिंपले आमच्या पाशीच राहू द्या, सोबतच काही बदल-सूचना-प्रतिसाद द्यायचा असेल Anytime Welcome!


तुम्ही तुमचा वेळ देताय आम्ही फक्त त्या वेळेला महत्त्व देतोय इतकचं...!

               
धन्यवाद!! :)

             www.khasmarathi.com  या Website वरील Educational विभागातील Spardha Pariksha या Menu मधील  पुढील प्रत्येक लेखात आपल्याला हवं ते मार्गदर्शन उपलब्ध असेल त्यामुळे दररोज अगदी न चुकता या संकेतस्थळावर यापुढे नक्की भेट देत रहा!





पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा :-

MPSC EXAM PREPARATION 2020 || MPSC || SPARDHA PARIKSHA IN MARATHI - 2
      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने