इजरायल देशाने केला Corona Virus वर Vaccine शोधल्याचा दावा ! || Marathi news 


          महामारीचे संकट बनलेल्या कोरोना व्हायरस ( Corona virus ) चा वाढता प्रादुर्भाव पाहून लस बनवण्यासाठी भारतातच नव्हे तर सध्या जगभरात चाचण्या सुरू आहेत, मात्र हवे तसे यश आत्तापर्यंत कोणालाच मिळाले नव्हते. मात्र नुकतेच, कोरोनाशी झगडत असलेल्या जगासाठी इस्रायलकडून एक खूपच चांगली बातमी आली आहे. इस्राईलने कोरोनाला रोखण्यासाठी लस Vaccine  सापडल्याचा दावा केला आहे.

          कोरोना व्हायरसला पराभूत करण्यासाठी संपूर्ण जग आतुरतेने लसची वाट पाहत आहे. Israel ने  असा दावा केला आहे की या लसीविषयी जगाची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. इस्रायलने कोरोना लस Corona Vaccine तयार केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे ही घोषणा  इस्त्रायली संरक्षण मंत्री नफाटाली बेनेट यांनी  केली आहे. त्यामुळे लवकरच जग कोरोनाच्या विळख्यातून मोकळा श्वास नक्कीच घेईल अशी आशा निर्माण झाली आहे. 


इजरायल देशाने केला corona virus वर Vaccine शोधल्याचा दावा ! || Marathi news
इजरायल देशाने केला corona virus वर Vaccine शोधल्याचा दावा ! || Marathi news 


         कोरोना व्हायरस  Corona Virus वरील ही लस शरीरातील कोरोना विषाणूचा नाश करण्यास सक्षम आहे असे इस्त्रायलने म्हंटले आहे.  ही लस, व्हायरसला  शरीराच्या इतर भागात पसरण्यापासून प्रतिबंधित करते. डिफेन्स बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इस्त्राईलला  कोरोना विषाणूची ही लस बनविण्यात यश आले आहे. 


          इस्रायलची ही गुप्त प्रयोगशाळा जैविक संस्था जैविक आणि रासायनिक शस्त्रे तयार करण्यासाठी ओळखली जाते. इस्त्राईलची संरक्षण जैविक संस्था दक्षिणेकडील तेल अवीव  पासून 20 किलोमीटर अंतरावर नेस जिओना येथे आहे. असा दावा केला जात आहे की ही प्रयोगशाळा जमिनीच्या आत खोलवर आहे, इस्त्रायली गुप्तचर संस्था मोसाद आपल्या शत्रूंना ठार मारण्यासाठी धोकादायक विष आणि विषाणू या प्रयोगशाळेत बनवत असतात .


          सध्या, इस्राईल आता कोरोना लस पेटंट घेण्याची तयारी करीत आहे, त्यानंतर त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू होईल. यासाठी नक्कीच अजून चाचण्या घेण्यात येतील! अशाच सर्वोत्तम Updates करीता खासमराठी ला नेहमी भेट देत रहा!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने