India बाबत काही Interesting Facts जे तुम्हाला क्वचितच माहीत असतील.. || interesting facts


          आपण जरी India मध्ये राहत असलो तरी आपल्याला भारताविषयी फारच कमी माहिती असेल असं मला वाटत कारण भारतातील काही interesting facts असे आहेत ज्याबाबत लोकांना माहित नाही. तेच Facts about india तुम्हाला या लेखातून पाहायला मिळेल.

India बाबत काही Interesting Facts जे तुम्हाला क्वचितच माहीत असतील.. || interesting facts
India बाबत काही Interesting Facts जे तुम्हाला क्वचितच माहीत असतील.. || interesting facts


।। बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ।। 

          भारत माझा देश आहे ,सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे .अशी भारताची प्रतिज्ञा म्हणत आपण लहानाचे मोठे झालो .आपण सर्व जाणतोच कि भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र मिळाले . डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते . इंग्लंडची जुलमी राजवट संपुष्टात येऊन लोकशाहीचा उदय झाला .


          भारत दक्षिण आशियातील देश असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातवा क्रमांक लागतो . भारत सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे . भारत लोकशाही संसदीय प्रणालीमध्ये शासित असलेला एक धर्मनिरपेक्ष देश आहे . लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो ,भारत हा विकसनशील देश असून वेगाने विकासाकडे वाटचाल करत आहे तसेच माहिती तंत्रज्ञान सेवांचे केंद्र बनत चालला आहे. भारत अण्वस्त्रे असलेला देश असून सर्वात जास्त खर्च लष्करी विभागावर केला जातो .


          भारताची राजधानी दिल्ली असून भारतात एकूण २९ राज्ये आहेत हिंदी हि भारताची अधिकृत भाषा आहे . चीन ,पाकिस्तान,नेपाळ ,बांगलादेश ,भूतान हे भारताच्या सीमेवरील देश आहेत . भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर दक्षिणेस लक्ष द्वीप समुद्र आहे . असा हा भारत देश विविधतेने नटलेला आहे .⧪  भारतामधील काही रोचक तथ्य  ⧪


          ◾ सिंधू (इंडस) या शब्दावरून भारतास इंडिया हे नाव मिळाले तर भारत देशाला भारतवर्ष हे नाव महाभारतानुसार राजा भरत चक्रवर्ती यांच्या नावावरून प्रचलित केले .भारताचा अर्थ संस्कृत मध्ये अग्नी असा होतो .


          ◾ इंडिया (INDIA) शब्दाचा कोणताही फुलफॉर्म नाही पण काही मनोरंजक आणि तथ्य असे आहे कि या शब्दाचा फुलफॉर्म


I : Independent .
N : Nation  .
D :Developed
I : In .
A: August

 असा घेतला जातो .


          ◾ भारतीय जणगणने नुसार भारतात एकूण १५५२ मातृभाषा आहेत व २२ अधिकृत भाषा बोलल्या जातात तसेच सर्वात जास्त हिंदी भाषक (५३१. ४ मिलियन ) व इंग्रजी भाषा बोलणारे (१२५ . ३ मिलियन ) आहेत .


          ◾ महात्मा गांधी याना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते . भारताच्या स्वातंत्रासाठी इतर क्रांतिवीरांसह ते जबाबदार होते .


          ◾ भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे


          ◾ आर्य भट्ट यांनी 'शून्याचा' शोध लावला होता व ते भारतीय गणिततज्ञ होते .


          ◾ भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर , राष्ट्रीय फुल कमल , राष्ट्रीय फळ आंबा आहे .


          ◾ भारत देश सर्वात जास्त सोने खरेदी करनारा देश आहे .


          ◾ बुद्धिबळ या खेळाचा शोध भारतात लागला व भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे .


          ◾ योग ५००० वर्षांपूर्वी पासून अस्तित्वात आहे व त्याची सुरुवात भारतातून झाली .


India बाबत काही Interesting Facts जे तुम्हाला क्वचितच माहीत असतील.. || interesting facts
India बाबत काही Interesting Facts जे तुम्हाला क्वचितच माहीत असतील.. || interesting facts

          ◾ भारताच्या मुंबईतील ,बांद्रा-वोराळी  समुद्रावरील पूल (सीलिंक) बनवण्यासाठी वापरलेले स्टील वायर हे पृथ्वीच्या परीघ इतके आहे , ते बनण्यासाठी २,५७,००,००० तास लागले .


          ◾ २०११ ऑगस्ट मध्ये श्रीनगर मधील डाळ तलावातील तरंगत्या पोस्ट ऑफीस चे उदघाटन करण्यात आले , भारतामध्ये १,५५,०१५ टपाल कार्यालये आहेत .


          ◾ भारताचे राष्ट्रगीत लिहिणारे भारतरत्न रवींद्रनाथ टागोर यांनी  बांग्लादेश ही राष्ट्रगीत लिहिले आहे .


          ◾ भारतातील मिझोराम राज्यातील बकतवान्ग गावामध्ये राहणारे कुटुंब जगातील सर्वात मोठे कुटुंब आहे .या कुटुंबात ३९ बायका ,९४ मुले आहेत.


          ◾ शकुंतला देवी यांना मानवी calculator म्हणून ओळखले जाते कारण त्या दोन १३ अक्षरी संख्यांचे गणित तब्बल २८ सेकंदात करायच्या.

India बाबत काही Interesting Facts जे तुम्हाला क्वचितच माहीत असतील.. || interesting facts
India बाबत काही Interesting Facts जे तुम्हाला क्वचितच माहीत असतील.. || interesting facts

          ◾ पिंगाली व्यंकय्या जे एक शेतकरी व स्वतंत्र्यवीर होते ,त्यांनी भारतीय तिरंग्याची रचना केली . भारतीय ध्वज संहिताच्या मानांकनाच्या नुसार भारतीय ध्वजाचे गुनोत्तर २:३ आहे


          ◾ भारताचे पहिले रॉकेट हलके आणि लहान असल्याने त्याला केरळ पासून तरुवनंतपूरम मधील थुम्बा लॉंचिंग स्टेशनवर सायकलवरून नेण्यात आले .


          ◾ तक्षशीला हे जगातील पहिले विद्यापीठ सुमारे ७०० बी. सी पासून भारतात सुरु झाले होते .


          ◾ साप शिडीचा शोध भारतात लागला .


          ◾ भारताने आतापर्यंत झालेले पाचही पुरुष कब्बडी विश्वचषक जिंकले असून या स्पर्धेत ते अपराजित राहिले आहेत.


          ◾ जगातील ९० देश भारताकडून सोफ्टवेअर विकत घेतात.


          ◾ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा अंतराळवीर राकेश शर्मा यांना विचारले कि, "अंतराळातून भारत कसा दिसतो ?"  त्यावर ते म्हणाले , " सारे जहाँ से अच्छा... !! " मित्र आणि मैत्रिणींनो या लेखात आपण interesting facts about india  बाबत माहिती जाणून घेतली.  पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने