" विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर ", असं का म्हटलं जातं ? । Marathi Special ।। खास मराठी . 

" विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर ", असं का म्हटलं जातं ? । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी .
" विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर ", असं का म्हटलं जातं ? । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी . 

         " विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर ", असं का म्हटलं जातं ?  विंचवी ( Vinchavi ) तिच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच पिल्लांना जन्माला घालते व त्यानंतर लगेचच मरून जाते. असं का बर होत असावं ? नेमकं असं काय घडत तिच्या सोबत कि विंचवी मरून जाते ? याच बाबतीत सांगायचं झालं तर तुमच्या माहितीत एक अजुन भर पडणार आहे. विंचवाच्या मादीला विंचवी म्हणतात .श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलच पाहिजे , निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी. विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी. काही तासांनी पिलांना भुक लागते.


          विंचवीला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. कासवा विषयी आपल्याला माहित असेलच ; कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांच पोट भरतं. ईथे त्याहुनही गंभीर समस्या आहे. विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही. आता हळुहळु पिलांची भुक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासाविस होते, पण द्यायला तर काहीच नाही. पिलं तिच्या अंगाचा चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरुन निमुट बसुन रहाते. आता पिलांची भुक अनावर होते, ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात, पहाता पहाता पिलं पोट भरुन तृप्त झालेली असतात, आणि विंचवी ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते , मरून गेलेली असते !


          याला म्हणायचं आईचं आईपण. "आई " मग ती मुंगी, शेळी, वाघीण, गाय असो कि तुमची माझी माय असो, आईपण तेच ! मातृत्व अशी जादु आहे कि जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत. ज्याला आई समजली त्याला विश्व समजलं.या जगात तुमचा कोणताही अपराध पोटात घालण्याची ताकद फक्त तुमच्या आईबाबांमधे आहे.कारण ते कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात. आपल्या आईबाबांना खुप प्रेम द्या.

" विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर ", असं का म्हटलं जातं ? । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी .
चीन मधील शेडोन्ग शहराची 'तळलेले विंचू' ही पारंपरिक डीश आहे. 

         पिल्लांनी जन्मदात्या आईला खाणं ह्याला विज्ञानाच्या भाषेत ‘मॅट्रीफॅगी’ ( मॅट्री – आईशी संबंधित | फॅगी – गिळणे ) म्हणतात. विंचवांमध्ये हे फार क्वचीत होतं. सहसा पिल्लं त्यांचं एग्झोस्केलेटन म्हणजे बाह्यकवच कठीण होईपर्यंत संरक्षणासाठी आईच्या पाठीवर राहतात (दहा-पंधरा दिवस). नंतर उतरून आपापल्या वाटेने निघून जातात. पण दरम्यान जर अन्नाची उपलब्धी कमी असेल तर आईवर हल्ला होऊ शकतो. अनेकवेळा अन्नाच्या दुर्भिक्ष्यात आईसुद्धा पिल्लांना खाते. कारण त्यांच्यात तेवढं आपल्या जन्मदात्याला ओळखण्याची संवेदना नसते असं म्हणावं लागेल. किती दुर्भाग्य म्हणावं अशा जीवाचं , स्वतःच्या पिल्लांकडूनच जीवाला मुकावं लागत पण बिळं करून राहणार्‍या काही कोळ्यांच्या जातीमधे हे कॉमनली दिसतं उदा वुल्फ स्पायडर किंवा टॅरेंट्युला वगैरे. आई तिची अनफर्टीलाईझ्ड अंडी पिल्लांना खायला देते आणि ती खाता खाता पिल्लं आईलाही खाताना आढळली आहेत.


        गर्भाशयविरहित अरचनिदा या वर्गातील बहुतेक प्रजातींपेक्षा विंचू सार्वत्रिकदृष्ट्या विचित्र असल्याचे दिसून येते . विंचू सहसा दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात आढळत नसले तरी ते जगातील सर्व उष्णकटिबंधीय भागात नियमितपणे मानवी वस्तीत आणि जवळपास आढळतात. शिकारीची कमतरता, सहजतेने उपलब्ध निवारा आणि कीटक , झुरळे, सिल्व्हरफिश आणि इअरविग्स यासारख्या किडीच्या बळींचा अभाव यामुळे औद्योगिक व निवासी क्षेत्रात विंचवांच्या संख्येत वाढ होत राहते .

" विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर ", असं का म्हटलं जातं ? । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी .
" विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर ", असं का म्हटलं जातं ? । खासमराठी स्पेशल ।। खासमराठी . 

          फार्मास्युटिकल उद्योगात वापरण्यासाठी विंचू पाकिस्तानमधील जंगलातून गोळा केले जातात. थट्टा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रत्येक ४० ग्रॅम विंचूसाठी अंदाजे १०० अमेरिकन डॉलर्स दिले जातात आणि ६० ग्रॅम नमुने किमान $ ५०,००० अमेरिकन डॉलर्स मिळतात असा अहवाल आहे. हा व्यापार बेकायदेशीर परंतु भरभराटीचा असल्याचे समजते. त्यांच्या पासून विविध प्रकारची औषधे बनवली जातात. विष हे पृथ्वीवरील खंडानुसार सर्वात मौल्यवान द्रवपदार्थापैकी एक आहे आणि त्या विषाचा एक गॅलन तयार करण्यासाठी $ 39 दशलक्ष डॉलर्सची किंमत आहे. चीन मधील शेडोन्ग शहराची तळलेले विंचू ही पारंपरिक डीश आहे.


         मित्र आणि मैत्रिणींनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? आणि पुढचे आर्टिकल तुम्हाला कोणत्या विषयावर वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका . हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता.  धन्यवाद . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने