भारत सरकारने १०६ जणांवर का केला गोळीबार ? । Marathi Special ।। खास मराठी 





" भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा , 
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा  
सह्याद्रीचा सिंह गर्जतो , शिवशंभू राजा ,
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. "

जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा


          महाराष्ट्र राज्याने ५० वर्षात प्रगतीची घोडदौड सुसाट केली आहे , आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य बनले आहे. कला, साहित्य ,क्रीडा,व्यापार उद्योग, शिक्षण,आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवर असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळते . आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .


         १ मे या दिवसाला कामगार दिनच ( labour day ) नाही तर महाराष्ट्र दिन म्हणूनही संबोधले जाते / महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.  महाराष्ट्र आणि गुजरात ही भारतातील दोन राज्ये व 1 मे हा त्यांचा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ही दोन्ही राज्ये मुंबई राज्याचा भाग होती. १ मे १९६० रोजी भारतात ' महाराष्ट्र ' या राज्याची स्थापना झाली. यापूर्वी महाराष्ट्र आणि गुजरातचे वेगळे अस्तित्व नव्हते ते संघटित राज्य होते. आताची वेगवेगळे असलेले राज्ये महाराष्ट्र व गुजरात त्या वेळी एकच राज्य मुंबई यात समाविष्ट होते. त्या काळात, राज्यात मराठी व गुजराती भाषा बोलणारे लोक सर्वाधिक होते. मराठी व गुजराती भाषिक लोक स्वत: साठी स्वतंत्र राज्याची मागणी करीत होते.


            राज्य पुनर्गठन अधिनियम 1956 अंतर्गत बरीच राज्ये स्थापन केली गेली. या कायद्यांतर्गत कर्नाटक राज्य कन्नड भाषिकांसाठी तयार केले गेले, तर तेलगू भाषिकांना आंध्र प्रदेश मिळाला. त्याचप्रमाणे, तामिळ भाषिकांसाठी तामिळनाडू आणि मल्याळम भाषकांसाठी केरळ राज्य बनविले गेले. पण मराठे व गुजरातींना वेगळी राज्ये मिळाली नाहीत. या मागणीवर अनेक आंदोलने झाली. दोन्ही भाषांचे लोक दिवसेंदिवस आपली हालचाल तीव्र करीत होते.


           फ्लोरा फाउंटनच्या परिसरात २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते त्यामुळे मराठी माणसे चिडून होती. या निर्णयाचा निषेध सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून होत होता. या संगठनामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन करण्यात आले .


भारत सरकारने १०६ जणांवर का केला गोळीबार ? ।। खासमराठी स्पेशल ।। खासमराठी
भारत सरकारने १०६ जणांवर का केला गोळीबार ? ।। खासमराठी स्पेशल ।। खासमराठी 

           एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून प्रचंड जनसमुदाय गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. सरकारकडून मोर्चा व पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र पोलिसांचे हे प्रयत्न अढळ सत्याग्रहीं मुळे अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. अंदाधुंद गोळीबारात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.


          १ मे १९६० रोजी भारत सरकारच्या तत्कालीन नेहरू सरकारने 'बॉम्बे रीआर्गेनाइजेशन एक्ट १९६०' अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मुंबई राज्य विभागले. दोन्ही राज्यांमध्ये मुंबईवर हि वाद झाला. मराठ्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी कारण तेथील बहुसंख्य लोक मराठी भाषिक होती , तर गुजराती लोक म्हणत होते की मुंबई हि त्यांच्यामुळेच अस्तित्वात आहे. अखेरीस मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली. महाराष्ट्र दिन विशेष करण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी 1 मे रोजी अनेक रंगीबेरंगी कार्यक्रम आयोजित केले जातात.


           १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात . महाराष्ट्राच्या निर्मितीत बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.



कामगार दिन का साजरा केला जातो ?



          १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन ! इतिहासात डोकावून पहिले तर आपल्या असं लक्ष्यात येत कि औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले . कामगारांकडे भरपूर काम होतं, मात्र त्यांची पिळवणूक सुरु झाली होती. कोणत्या ना कोणत्या  हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास , १४ तास काम कराव लागत असे . या विरोधात कामगार आक्रमक होऊन एकजूट झाले आणी त्यांनी उठाव केला.


आंतरराष्ट्रीय कामगार दिन !

          जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. अखेर कामगारांच्या कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ' १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत रेमंड लेविन याने १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी केली . त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणूनऔपचारिक रित्या मान्यता देण्यात आली.


खालील विडिओ तुम्ही तुमच्या व्हाट्सएप्प स्टेटस ला ठेवू शकता . 





मित्र मैत्रिणीनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो त्यामुळे काही अडचणी असल्यास कंमेंट करायला विसरू नका तसेच हि माहिती तुमच्या प्रियजनांशी शेयर करा. खासमराठी नेहमीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने