छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या तलवारी । Marathi Special ।। खास मराठी 

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या तलवारी । स्पेशल ।। खासमराठी
जगदंबा तलवार (सौर्स : गुगल )


           अनेक लोकांकडून सांगितलं जात कि भवानी देवीने शिवाजी महाराजांना तलवार दिली होती आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या . भवानी तलवारी मुळेच शिवाजी महाराजांना यश आले असेल का ? असा प्रश्न इथे उपस्थित होतो .यामध्ये कोणतीच सत्यता वाटत नाही. कारण असं असत तर शिवाजी महाराजांनी लढाई करताना आपला एक हि मावळा गमावला नसता. दुसरी गोष्ट अशी कि राजा किंवा सैनिक आयुष्यभर एकच तलवार वापरत नाही . तसच शिवाजी महाराजांकडे तीन तलवारी होत्या.

१. जगदंब तलवार


२. भवानी तलवार


३. तुळजा तलवार .



            एक गोष्ट सांगावीशी वाटते कि त्या काळी राजे महाराजे ,मावळे आपल्या तलवारीची नावे हि देवी देवतांच्या नावानिशी ठेवत असत ज्यावर त्यांची श्रद्धा असेल. तसेच शिवाजी महाराजांनी त्यांच्या तिन्ही तलवारींची नावे हि देवींच्या नावी ठेवली आहेत. शिवाजी महाराज्यांच्या तीन तलवारींपैकी तुळजा तलवार, तुळजा तलवार हि शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांनी भेट म्हणून शिवाजी महाराजांना दिली होती. लंडनच्या रॉयल पॅलेस (Royal Palace) मध्ये जी तलवार आहे ती भवानी तलवार नसून जगदंबा तलवार आहे तर भवानी तलवार आणि तुळजा तलवार ह्या कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही. 


          एक गोष्ट अशी कि त्या काळी भेट दिलेल्या तलवारी वेगळ्या व लढाई खेळल्या जाणाऱ्या तलवारी वेगळ्या असायच्या. भेट दिलेल्या तलवारी ह्या विशेषत: रत्न जडीत मौल्यवान धातूंपासून बनवल्या जायच्या त्यांचा लढाई मध्ये वापर होत नसे. भेट दिले गेलेल्या तलवारी ह्या विशिष्ट हेतू पूर्वक बनवलेल्या असायच्या. मराठा सरदारांकडे १७६० नंतर बहुतेक ज्या तलवारी असत त्या गोम, फिरंग या नावाने ओळखल्या जात.


           मराठा सरदारांची, सैनिकांची उंची ५.५ तर पठाणी सरदार जेमतेम ६ फूट असायचे . जर लांब, वजनाने हलक्या व धारदार तलवारी मराठा सरदारांनी वापरल्या तर आपले सैनिक शत्रूवर भारी पडतील अशा पद्धतीचा दृष्टीकोन शिवाजी महाराजांचा होता. आपल्या राज्यांपेक्षा चांगली शस्त्र इतर देशात असतील तर अशी शस्त्रे युद्धकाळात वापर करणे फायद्याचे ठरेल असे शिवाजी महाराजांनी ठरवले.


छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या तलवारी । स्पेशल ।। खासमराठी
जगदंबा तलवार (सौर्स : गुगल )

          स्पेन हा देश त्यावेळेस औद्योगिकरणामुळे पोर्तुगीज , इंग्लंड सारख्या देशांसोबत व्यापाराच्या स्पर्धेत होता. या देशांनी युरोपमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता व स्पेन आर्थिक संकटातून जात होता. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्पेन मधून माल आयात करून स्पेन या राष्ट्राशी मराठ्यांचा व्यापारी संबंध राहिला. शिवाजी महाराजांनी स्पेन सोबत तलवारिंची पाती बनवण्याचा करार केला . याचा परिणाम म्हणजे स्पेन या राष्ट्राला आर्थिक स्वरुपात उभारी मिळाली. यावर खुष होऊन शिवाजी महाराजांना एक भेट म्हणून स्पेनच्या राजाने हिरे, नाणे, पाचू लावलेली रत्नजडित तलवार भेट स्वरूपात दिली आणि ह्या तलवारीलाच जगदंबा तलवार म्हटले गेले.


          मित्रानो हि माहिती आवडली असल्यास तुम्ही ती  प्रिय जणांशी शेयर करू शकता आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय सांगू शकता . खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असते .


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने