The Shawshank Redemption Movie || Movie Review 


The Shawshank Redemption Movie || Movie Review
The Shawshank Redemption Movie || Movie Review

           १९९४ साली दिग्दर्शित झालेला सर्वात प्रेरणादायी चित्रपट shawshank redemption .ह्या चित्रपटाने खूप नाव कमावले . IMDB वर या चित्रपटाला १० पैकी ९.३ चे रेटिंग दिले गेले आहे. दिग्दर्शक फ्रॅंक दाराबवोन्ट असून नायकाचे नाव टीम रॉबिन्स ज्यांनी अँडी नावाची भूमिका चित्रपटात साकारली. ह्या चित्रपटाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पाडतो. The Shawshank Redemption Movie चित्रपटाला दिग्दर्शीत होऊन २०-२५ वर्ष झाली असली तरी लोक त्याला आज ही पसंती देतात. खरच या चित्रपटातून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं भेटेल , हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या स्वभावात फरक पडेल. या चित्रपटातून आपल्याला जीवन जगण्याचा नवीन मार्ग सापडतो. जस म्हणतात ना , उम्मीद कि  किरण तसच काहीस... !!


          चित्रपटाचं नाव ऐकल्यावर असं वाटत कि हा काही तर वेगळाच चित्रपट असावा पण शॉशांक मधील तुरुंग आहे. एखादा गुन्हेगार किंवा कैदी जेव्हा तुरुंगवास  भोगून तुरुंगाच्या बाहेर पडतो तेव्हा त्याच्या मनाला काय वाटत असेल बर ? तुरुंगात राहून जेथे त्यांनी त्यांचं विश्व् निर्माण केलं , बाहेर पडल्यावर त्यांना एका नव्या जगात प्रवेश केल्यासारख वाटेल. या चित्रपटात हेच दाखवलं गेलं आहे कि तुरुंगवास काय असतो ? तिथली दुष्ट लोक कशाप्रकारे आपल्याला पीडा देऊ शकतात ?  कैद्यांचे राहणी मान कसे असते ? याबद्दल आपण कधीच ऐकले नसेल जे या चित्रपटातुन पाहावयास मिळते. कैद्यांचे सर्वस्व बनून गेलेला तुरुंग हे चित्र ज्या प्रकारे मांडलेले आहे ते खरच प्रशंसाजनक आहे. 


          अँडी हा एक बँकर आहे. चित्रपटाच्या सुरुवातीस एक अश्लील दृश्य दाखवलं गेलं आहे ज्यामुळे काही जण हा चित्रपट पाहायचे टाळतील पण तेवढा भाग स्किप केला तर पुढे खूप मनोरंजक कथा आहे. नायक अँडी वर आरोप आहे कि त्याने त्याच्या बायकोला व बायकोच्या प्रियकराचा खून केला. आणि त्याचसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळते. अँडी त्याची निर्दोषता सिद्ध करण्यात अपयशी ठरतो. त्यानंतर त्याला शॉशांक येथील तुरुंगात पाठवले जाते. इथूनच चित्रपटाची खरी सुरुवात होते. तुरुंगात भेटलेला रेड हा अँडीचा पहिला मित्र , जो २० वर्षांपूर्वी या तुरुंगात आला. तुरुंगात असणाऱ्या एक एक पात्राकडून आपल्याला नवीन गोष्ट शिकायला मिळते. अँडीच्या येण्याने तुरुंगातील कैद्यांच्या जीवनावर झालेले बदल उत्कृष्टरीत्या मांडले आहे. 


The Shawshank Redemption Movie || Movie Review
ब्रुक आजोबा यांनी सोडलेली नोट (सौर्स - गुगल )

          तुरुंगात ग्रंथपाल असलेले ब्रुक आजोबा यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटत कारण त्यांचं आयुष्य हे त्या तुरुंगात गेलेलं आहे ते कैद्यांना पुस्तके पुरवतात. त्यांना वाटत असत तुरुंगातच त्यांना मरण येईल पण वयाची काहीच वर्षे शिल्लक असताना त्यांना तुरुंगातून सोडण्यात येते यावर ते खूप भडकतात पण शेवटी काय करणार त्यांना तिथून जावं लागत. म्हातारवयात त्यांची सोय मानून त्यांना एक घर व नोकरी देण्यात येते. ब्रुक आजोबांचे बाहेरच्या जगात कोणीच मित्र नाही त्यांना आता नोकरीही करवत नाही . ते पूर्ण पणे एकटे पडतात रात्री झोप लागत नाही. बाहेरच जग त्यांना खायला उठत. अशा परिस्थितीत ते आत्महत्या करण्यापूर्वी " BROOKS WAS HERE " असे नोट सोडतात. हे दृश्य हृदय पिळवून टाकणारे आहे.  


          चित्रपटातील नायक अँडी आपल्या मित्रांचं काय पण तेथील पोलिसांचे कशाप्रकारे हृदय जिंकतो व आपली सुटका करण्याचा प्लॅन आखतो याचा शेवटी उलगडा होतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते. तसच भ्रश्टाचारी पोलिसांना त्यांच्या कर्माची कशी शिक्षा भोगावी लागते व आपला जिवलग मित्र जेव्हा तुरुंगातून सुटेल तेव्हा त्याचा विचार हे सर्व या चित्रपटाला मास्टरपीस बनवतात. खरच हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. 


The Shawshank Redemption Movie || Movie Review
आपल्या मित्र मंडळींचे हृदय जिंकल्यानंतर अँडी  (सौर्स गुगल)

या चित्रपटातून मला काय मिळालं. :


          खरं सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात या चित्रपटाला खूप महत्वाचं स्थान आहे . मला या चित्रपटाने पूर्णपणे बदलवून टाकले . मला आठवत जेव्हा मी खूप खचून गेलो होतो मला काय करायचं समजत नव्हत . मला या चित्रपटाबद्दल खूप जणांनी सांगितलं होत पण चित्रपटाच नाव आणि एकतर खूपच जुना असल्यामुळे मी पाहायचं टाळत होतो . आयुष्यातील चढउतार झेलताना मी फारच विचार करायचो हा चित्रपट जेव्हा पाहिला तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते. या चित्रपटातून आयुष्य कस जगावं हे मला समजलं. हा चित्रपट पहा , नक्की तुमचे जीवन सुखकर करण्यास मदत करेल. आता एकच गोष्ट सांगतो माणसाला इतरांचे हृदय जिंकता आले पाहिजे.   

          हा चित्रपट तुम्हाला हवा असल्यास कमेंट करा , The shawshank redemption full movie download  लिंक देवू .            मित्र आणि मैत्रिणींनो आपण  The shawshank redemption movie review  पाहिला . पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या चित्रपटावर  तुम्हाला रिव्हिव्यू वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने