रागाला कसं आवरायचं ?। How to Control Anger ?।। वैचारिक । खासमराठी  


रागाला कसं आवरायचं ? ।। वैचारिक । खासमराठी
रागाला कसं आवरायचं ? ।। वैचारिक । खासमराठी 

         अनेकदा मला अनेकजणांचा राग यायचा ....अर्थातच अजूनही येतोच....स्वभावदोष आहे तो ! शीघ्रकोपी वगैरे ...


         अनेकदा यात काही परकी माणसे असायची मात्र खूप जास्ती ज्यांना मी आपली माणसे मानायचो तीच दिसायची.....!


         मग मी  How to Control Anger .... राग कसा आवरायचा... वगैरे वगैरे सारखे  YouTube Videos , Blogs वगैरे पाहिलो,  वाचलो......मात्र कशानेच कसलाच घंटा फरक पडला नाही....!


         शेवटी आलेला राग  गिळूनच टाकायचो.... स्वतःच मन इतर कशात तरी गुंतवायचो...कारण आपल्या रागामुळे इतर कोणाचं मन का दुखवावं असं रागात असताना पण माहिती नाही का मात्र, नेहमी वाटायचं....


         पुढे व्हायचं असं की गिळलेला राग मनात एक वेगळीच आग भडकवत असतो.... त्याने  खूप चिडचिड व्हायची ....मन जळत राहायचं .... समाधान हरवून जायचं.... कधी कधी जर फारच जवळच्या कुण्या व्यक्तीने राग आणून दिला असेल तर रात्र रात्र डोळ्याला डोळाच लागायचा नाही....


         एके दिवशी मात्र झालं असं की , एका मित्राला मी काही पैसे दिले होते तो लगेच देतो म्हणून 8 दिवस त्याने पैसेच आणून दिले नव्हते म्हणून मला पैसे देत नाहीये या पेक्षा तो पैसे असून देखील आपल्याला टाळत आहे याचा राग आला....


         मग 8 दिवसांनीच तो आला त्याने पैसे दिले त्यात पण एखादं रुपया काहीतरी कमीच दिला मात्र एकदम त्या दिवशी हसत खेळत बोलून त्याच्या कामाला गेला....


         दुपारी 3 - 4 च्या आसपास मात्र असं समजलं की त्याला काम करत असताना विजेचा झटका लागला आणि त्यातच जाग्यावर त्याचा  मृत्यू सुद्धा झाला आयुष्यात पहिल्यांदाच कुण्या मित्राच्या मातीला गेलो.....


         तेव्हा तिथून निघताना मात्र मनातला निम्म्या पेक्षा अधिक राग त्या मयताच्या आगीत जळून गेला होता....


        त्यांनंतर मात्र कोणाचा ही राग , कोणाबद्दल ही द्वेष भावना मनात निर्माण होऊ लागलीच तर मी तो शेवट एकदाच मनातल्या मनात आठवतो जिथे माझी नवीन सुरुवात झाली होती..... !


        व्यक्तिमत्त्व घडायला... खूप काही शिकवून जायला.... असे खूप छोटेच प्रसंग आपल्या पूर्ण अंतरंगात संपूर्ण बदल घडवून आणू शकतात हे समजलं....!


        त्या दिवशीपासून  मी कधीच आपल्या माणसांचे शब्द शक्यतो टाळत नाही...


       Even  मला जेव्हा हे स्पष्टपणे समजत असतं की त्यांच्या या निर्णयामुळे माझं आयुष्य मातीमोल होतं आहे तरी देखील आणि माझी काडीइतकीही इच्छा नसली तरी देखील....


        राग अजूनही येतोच .... अजूनही तितक्याच लवकर येतो.... मात्र "मृत्यू हेच अंतिम सत्य आहे!"  हे समजल्यामुळे...या राग, लोभ, द्वेष आणि तत्सम भावनांचा मनावर कसलाच परिणाम मात्र होत नाही...!


       भेटेल तितकं जगून घेतो... देता येईल तितकं देऊन बघतो....!


       आयुष्य तुम्हाला ही असंच सुख समाधान आणि आनंदाने जगायचं असेल तर इतरांनी केलेल्या चुका असोत की आपण स्वतः करत असलेल्या चूका त्या अंतिम सत्याकडे बघत बघत स्वीकारायच्या इतकंच....!


        इतरांचा राग आला तर तो/ती उद्या या जगात नसेल आणि स्वतःला लोभ होऊ लागला तर उद्या आपल्याला काहीच न्यायचं नाहीये हे सत्य मनापासून समजून घ्यायचं बघा खूप फरक पडेल !!  :)


©खासमराठी
-जीवनतंत्र
~S.J.


           मित्रानो हि पोस्ट आवडली असल्यास तुम्ही ती  प्रिय जणांशी शेयर करू शकता आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय सांगू शकता . खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असते . 

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने