महेंद्रसिंग धोनी ||व्यक्तिविशेष 

 महेंद्रसिंग धोनी ||व्यक्तिविशेष

महेंद्रसिंग धोनी ||व्यक्तिविशेष 




   भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस तर चला माहिती करुन घेऊ त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
 

         महेंद्रसिंग धोनी याचा जन्म 7 जुलै 1981 रोजी बिहार रांची आता झारखंड येथे हिंदू राजपूत कुटुंबात झाला.महेंद्रसिंग सिंग यांच्या वडिलांचे नाव पानसिंग हे आहे तसेच त्याला नरेंद्र सिंग हा भाऊ व जयंती गुप्ता ही बहीण आहे.


            त्याने आपले शिक्षण जवाहर विद्या मंदिर शायमाली रांची येथे केले बॅडमिंटन आणि फुटबॉल खेळात तो जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होता.तसेच फुटबॉल मध्ये गोलकीपर म्हणून चांगला होता.त्याच्या स्किलमुळे त्याची विकेट किपर म्हणून निवड झाली. 1995 ते 1998 ला कमांडो क्रिकेट क्लब कडून तो खेळला .

धोनी ने रणजी ट्रॉफीत बिहार संघाकडून 1999 ते 2000 दरम्यान क्रिकेट खेळले.


💥आंतरराष्ट्रीय करिअर💥


🔰23 डिसेंबर 2004  मध्ये बांगलादेश विरुद्ध त्याने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.

🔰तर 2 डिसेंबर 2005 ला  श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण.

🔰त्याने 2007 ते 2016 मध्ये  (एकदिवसीय )भारतीय क्रिकेट टीमचे नेतृत्व केले आहे.

🔰तसेच 2008 ते 2014 मध्ये कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.

🔰इतिहासात पहिल्यांदाच ICC च्या तिनी ट्रॉफी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकल्या आहेत.अशी कामगिरी करणारा एकमेव कप्तान.

🔰2007 ला ICC वर्ल्ड टी 20  सामना जिंकला.

🔰2011 ला ICC क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला.

🔰2013 ला ICC चॅम्पियन ट्रॉफी जिंकली

🔰तसेच 2010 व 2016 ला आशिया कप जिंकला.

🔰धोनी ने आतापर्यंत 350 एकदिवसीय सामन्यात 50.53 च्या सरासरीने 10773 धावा केल्या असून 183 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या.

🔰तर 90 कसोटी क्रिकेट सामन्यात  38.09च्या सरासरीने 4876 धावा तर 224 ही सर्वाधिक धावसंख्या

🔰98 टी 20 सामन्यात 37.60 च्या सारसरींने त्याने 1617 धावा केल्या असून 56 ही सर्वोच्च धावसंख्या .


तसेच महेंद्रसिंग धोनी हा Ipl मधील चेन्नई सुपर किंग्स या संघाचा 2008 पासून कप्तान आहे.

तसेच 2010 ,2011 आणि 2018 ला या संघानं ipl जिंकलं आहे.
 महेंद्रसिंग धोनी ||व्यक्तिविशेष

महेंद्रसिंग धोनी ||व्यक्तिविशेष 


🔯पुरस्कार 🔯


धोनीला आतापर्यंत अनेक पुरस्काराने ने सन्मानित केले आहे

🔰2008 व 2009 ला ICC प्लेअर ऑफ द इयर ने सन्मानित.

🔰2007 ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ने सन्मानित

🔰2009 ला पद्मश्री तर 2018 ला पद्मभूषण पुरस्कार

🔰तसेच त्याला भारतीय आर्मी कडून लेफ्टनंट कर्नल रँक दिली आहे.

धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया ला कसोटी क्रिकेट मध्ये 40 वर्षाच्या इतिहासात  व्हाईट वॉश देणारी पहिली टीम झाली.

30 डिसेंबर 2014 ला कसोटी मधून त्याने निवृत्ती घेतली आहे.

महेंद्रसिंग धोनीला  वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन ठेवण्याचा छंद आहे.



          मित्र मैत्रिणीनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो त्यामुळे काही अडचणी असल्यास कंमेंट करायला विसरू नका तसेच हि माहिती तुमच्या प्रियजनांशी शेयर करा. खासमराठी नेहमीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने