" ती " आणि " तो " || भाग ३ || प्यारवाली Love story


           नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो.... !! मनोरंजन ( Entertainment ) Khasmarathi Special या भागात आम्ही तुमच्यासाठी नवनवीन उत्सुकता आणि मनाला कुतूहल लावणाऱ्या जीवन कथा ( Life story ) तसेच प्रेमकथा ( Love story ) घेऊन येत आहोत , या लेखात तुम्ही एक अनोखी प्रेमकथा पाहणार आहात . जिचं नाव " ती " आणि " तो " || भाग ३ || प्यारवाली Love story आहे जी वाचताना नक्कीच तुमच्यातील उत्सुकता वाढेल .
" ती " आणि " तो " || भाग ३ || प्यारवाली Love story
" ती " आणि " तो " || भाग ३ || प्यारवाली Love story🔅 भाग - ३ 🔅भूतकाळात नकळत घडून गेलेल्या गोष्टीमुळे प्रेम आणि लग्न या गोष्टीपासून सतत दूर पळणारी कोमल.

आज मात्र वैभव ने केलेल्या Propose मुळे कोमेजून तर गेलीच होती ,

शिवाय तिच्याही मनात आदर आणि प्रेम होतच ,


          आयुष्यात एवढ्या वर्षांनंतर प्रेम मिळालं आणि जर त्याला भूतकाळ सांगितला तर तो कायमचा सोडून जाणारं म्हणून भूतकाळातील गोष्टीची एक झळ चर्र्रर्रर्र कण तिच्या डोक्यातून थेट काळजापर्यंत पोहचली ,

आणि ती धास्तावलीच .

पण तीला आता त्याच्या आलेल्या Propose ला उत्तर द्यायचे होते ,शेवटी मनाचा पक्का निश्चय करून तिने लिहायला सुरुवात केली,     " प्रिय वैभव "
   कसा आहेस ?


          खरंतर मीही तुझ्याच पुढकाराची वाट बघत होती.कारण माझही तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे.तुला माझ्याबद्दल ज्या काही प्रेमळ भावना आहेत तशा मलाही तुझ्याबद्दल आहेत.

पण या प्रेमळ नात्याची सुरुवात करताना मला तुझ्यापासून काहीच लपवायचे नाही.तुला काहीतरी सांगायचंय , ते एकूण तुला कदाचित धक्काही बसेल पण ते एकूण घे स्वतःला सावर,आणि आणि नंतर तुझा निर्णय मला कळव.


     घरच्यांनी माझ्यासाठी शहरातला मुलगा बघितला होता .एकुलता एक शिवाय घरात सर्व सुखसोयी,समृद्धी, खूप मोठं एकत्रित कुटुंब ,सगळ्यांना हेवा वाटावा असं सासर मला मिळाल होतं,

 लग्न पक्क झालं ,साखरपुडाही झाला होता,तारीखही ठरली होती ,


          पण म्हणतात नं 'जस दिसतं तसं कधीच नसतं' या नात्याला कोणाची नजर लागली आणि लग्नाच्या दिवशी तो मुलगा अपघातात गेला.आणि त्याचक्षणी लग्न मोडले.बाहेरच्यांप्रमाणे नातेवाईकांनीही 'अवलक्षणी' म्हणून घ्यायला सुरुवात केली होती त्यामुळे पुन्हा बघायला कोणी येईना.म्हणून घरच्यांनीही तूर्तास लग्न हा विषय टाळला .तेव्हा मी पण लग्न करायचे नाही म्हणून विषय सोडला.


पण तू माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला नवीन पालवी मिळाली .मी घरच्यांना तुझ्याबद्दल आधीच कळवले.पण समाज 'अवलक्षणी' म्हणते,पुन्हा लग्न मोडेल या भीतीने त्यांनीही स्पष्ट नकार दिला.


तुझा खोडकर मन मिळावू स्वभाव मला नेहमी आनंदी ठेवू लागला , मीही तुझ्या प्रेमात कधी पडले मला कळलंच नाही .आयुष्यात सगळं सोडून तुझ्यासोबत यावं लागलं तरी त्यात माझी एका पायावर तयारी आहे .

फक्त आता उत्तर तुला द्यायचे आहे ,हे सर्व ऐकून तुझा निर्णय काय ? ते मला कळव.

          
          हे सर्व ऐकून वैभवला धक्काच बसला , तो तास अन तास फक्त विचारात राहायचा .....


असेच काही दिवस निघून गेले,त्याने तिला सर्व ठिकाणी " Block " केले, तिला उत्तर द्यायचे नाही या विचारात असतानाच त्याचा फोन वाजला,तो Unknown नंबर होता ! 
" ती " आणि " तो " || भाग ३ || प्यारवाली Love story
" ती " आणि " तो " || भाग ३ || प्यारवाली Love story

पलीकडून तोच गोड आवाज पण आता रडत होता .


ति ( कोमल ) :- Hii ,कसा आहेस ?


          खूप दिवस झाले तुझ्याशी बोलले नाही रे  ,खूप आठवण येतेय तुझी ! बोलणं बंद केलं तेव्हापासून मला काहीच फरक पडला नसेल असेच वाटत असेल नं तुला ? पण खरं सांगू, तुझे शब्द ,तुझ्या कविता ,तुझा आवाज ऐकायला कान अधीर झालेत माझे.


माझ्या मनात माझ्या प्रत्येक गोष्टीत तू आहेस,माझ्या प्रत्येक स्वप्नात फक्त तूच आहेस ,तू सुद्धा आठवणींच्या पावसाने खूप अश्रू लपवले असशील नं.पण खरं सांगू माझ्याही डोळ्यातून आठवणींच्या रूपाने तूच वाहायचा.


  " एकटं जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यात दुसरं कोणी व्यक्ती आली नं ,
की तिची आपोआप अडचण भासायला लागते " 


सगळं आयुष्य कसं गुंतागुंतीचं वाटायला लागतं नं ,प्रेम खूप आहे रे ......

पण तुला ........... "

         हे सर्व ऐकत असताना त्याच्या डोळ्यातून केव्हा अश्रू आले त्यालाही कळलं नाही ,पण त्याने तसं नं दाखवता थरथरत्या हाताने फोन हळूच कट केला आणि पुन्हा तो नंबर "Block List" मध्ये Add केला.

आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम करून कोमलने चुकी केली का ?

की तिचा भूतकाळ सांगून मोठी चुकी केली ?


संपूर्ण....लेखन : ✍  गोविंद हिरडकार . 
             ◾    7709575552


FB :  गोविंद हिरडकार . Or 
➤  https://www.facebook.com/govind.hiralkar


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Khasmarathi 


➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने