आज्ञाचक्राची अद्भुत शक्ती : Telepathy ( The Power of Third Eye ) || Psychology          तुम्ही 90 च्या दशकातील असाल तर कधीतरी Comics वाचल्या असतीलच, त्या काळात एक Comics यायची जादूगार Mandrek. तो आपल्या शक्तीने इतरांच्या मनात काय चाललंय ते ओळखायचा आणि आपले विचार त्यांच्या मनात उतरवून  त्याला हवं तसं कामही करून घ्यायचा. खरं तर हे एक काल्पनिक पात्र आहे पण ती शक्ती काल्पनिक नाही. जर ती काल्पनिक नसेल ती आपल्याला मिळू शकते आणि जर ती वास्तविकतेत मिळू शकत असेल तर ती आपण मिळवली तर काय होईल? आज्ञाचक्राची अद्भुत शक्ती :Telepathy ( The Power of Third Eye ) काय आहे ती शक्ती जाणून घेऊया..
आज्ञाचक्राची अद्भुत शक्ती : Telepathy ( The Power of Third Eye ) || Psychology
आज्ञाचक्राची अद्भुत शक्ती : Telepathy ( The Power of Third Eye ) || Psychology

          मानवी मन त्याचं अस्तित्व आणि मानवी मेंदू हे कायम एक रहस्यच आहेत. त्यांच्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजूनही उलगडलेल्या नाहीत. अतिशय गुढतेकडे नेणाऱ्या गोष्टींची उकल करण्याची जिज्ञासा आपल्यात आहे म्हणूनच मानव सुरुवातीपासून ते गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आलेला आहे. अशाच एका मानवी रहस्यांपैकी एक रहस्य म्हणजे टेलिपॅथी.


          टेलिपॅथी चा प्रयोग करून तुम्ही दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घेऊ शकता, तसंच आपले विचार सुद्धा त्यांच्या मनात टाकू शकता. 


          हे वाचून थोडं चमत्कारीक वाटू शकतं पण हे शक्य होतं कारण ही शक्ती आपल्याला आपला Third Eye जागृत केल्याने मिळू शकते. आता Third Eye म्हणजे काय आणि तो कसा काम करतो हे समजण्यासाठी आमचं Sixth Sense नावाचं Article वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता टेलिपॅथी म्हणजे काय ते जाणून घेऊ..


◾ Telepathy :


          कुठल्याही यंत्राशिवाय आपले विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचवणे आणि त्यांचे विचार ग्रहण करणे या पद्धतीला टेलिपॅथी असं म्हणतात.


          In Conversation of the Mystic  या पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी टेलिपॅथी चा उल्लेख केलेला आहे. त्यांनी त्यात सांगितलंय की प्राचीन काळात जे आध्यत्मिक गुरू होते ते कशाप्रकारे आपल्या शिष्यांसोबत संवाद साधत असत. त्याही पेक्षा स्वतः स्वामी विवेकानंद त्यांचे गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांच्याशी एकही शब्द बोलले नव्हते, पण त्यांच्यात संवाद व्हायचा, आणि तो टेलिपॅथी चाच एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. 


          भारतातच नव्हे तर सम्पूर्ण जगात याविषयी संशोधन सुरू झालं आणि D Scott यांनी Exploring Psychich Phenomena Beyond Matter या पुस्तकात या तंत्राविषयी संशोधन करून बरीच माहिती लिहून ठेवलीय.◾ Telepathy Possible ?


          जेव्हा आपण अशाप्रकारच्या अद्भुत शक्तींविषयी वाचतो तेव्हा वाटतं की आपल्याकडेही अशी शक्ती असावी पण हाही प्रश्न पडतो की हे खरंच शक्य आहे का? कारण बऱ्याचदा आपल्या तार्किक बुद्धीला ह्या गोष्टी पटत नाहीत पण कुठेतरी याचा शोध घ्यावा असंही वाटतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं.


          तर मुद्दा हा की हे शक्य आहे का ? हे समजण्यासाठी आधी आपलं मन कसं काम करत आणि चेतन मन काय हे जाणून घेऊ..◾ मनाची संकल्पना :


          मानवी मन हा सुद्धा एक गुढतेकडे नेणारा विषय आहे, पण आज ते कसं काम करतं किंवा त्यात काय चालतं हे समजून घेण्यासाठी मानसशास्त्र काम करतं. त्याचबरोबर मनाचे आयाम सांगण्यासाठी अध्यात्म सुद्धा मदत करतं.Basically तुमचे विचार आणि तुम्ही अर्थात तुमचा ego ज्या गोष्टचं नियंत्रण घेण्याचा प्रयत्न करतो तत्याला मन असं म्हणता येईल. म्हणजे आपल्या वैचारिक पातळीची एक अशी अवस्था ज्यात तुम्ही स्वतः तुम्ही नसून ते एक वैचारिक व्यक्तिमत्व असतं.◾ चेतन मन :


चेतन मनाला concious mind असं ही म्हणतात.  रोजच्या जीवनात येणारे अनुभव, घडणाऱ्या गोष्टी तसेच येणारे विचार हे सर्व चेतन मनाचे भाग असतात. ही मानवी मनाची एक वरची परत म्हणता येईल. ज्यामध्ये रोजचे अनुभव साठवल्या जातात आणि आपलं व्यक्तिमत्व घडत जातं. 
आता हे शक्य कसं होईल ते जाणून घेऊ..◾ आध्यत्मिक पैलू :


          खरं तर मानवी विचारांना पाश्चात्य संशोधकांनी अति महत्व दिल्यामुळे आपले विचारच सर्व काही आहेत असं आपल्याला शिकवण्यात येतं. 


          वास्तविकतेत आपले विचार म्हणजे फक्त आपल्या मेंदूचं एक creation म्हणता येईल. म्हणजे बघा आपल्याला येणारे जे अनुभव असतात किंवा प्रत्येक घटनेवर जी आपली एक reaction असते, ती आपल्या पूर्वानुभवावर आधारलेली असते. त्यानुसारच आपला मेंदू कार्य करतो.


          अध्यात्मिक पैलू यापेक्षा भिन्न मत मांडतो, अध्यात्मात मनाचे अनेक पैलू सांगितले आहेत. अध्यात्मिक पैलू सांगतो की आपलं मन जेव्हा एका ठिकाणी केंद्रित करून एक निर्विकार अवस्था प्राप्त होते तेव्हा आपण ही शक्ती किंवा हे तंत्र विकसित करू शकतो. त्यावर संशोधन सुद्धा झालं असून आज विज्ञान सुद्धा ते पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करतंय. 

परा मानसशास्त्रात याबाबतीत अध्ययन केलेलं आढळून येतं आणि त्यासाठी काही पद्धतीही निर्माण केलेल्या दिसून येतात. 
आज्ञाचक्राची अद्भुत शक्ती : Telepathy ( The Power of Third Eye ) || Psychology
आज्ञाचक्राची अद्भुत शक्ती : Telepathy ( The Power of Third Eye ) || Psychology


◾ टेलिपॅथी च्या शक्यता :

          जर टेलिपॅथी जमलीच तर त्यातून काही शक्यता उदभवतात ज्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की एक प्रकारची superpower च तुम्हाला मिळालीय.. त्या शक्यता काय असू शकतात याचा एक अंदाज पुढीलप्रमाणे1. अंतरज्ञान :


          जेव्हा आपलं अज्ञाचक्र जागृत व्हायला लागतं तेव्हा आपल्याला एक आंतरिक ज्ञान प्राप्त व्हायला लागतं आणि त्यामुळे टेलिपॅथी सोबत याचा संबंध जोडला तर लक्षात येतं की एक insight आपल्याला मिळतं ज्यामुळे अनेक अशा गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात ज्या अनाकलनीय आहेत.2. भविष्य ज्ञान :


          असं म्हणतात की टेलिपॅथी मुळे आपल्याला भविष्यात डोकावण्याची शक्ती मिळते, पण हे कितपत खरं आहे हे जाणून घेण्यासाठी स्वतःला अनुभव घेणं गरजेचं आहे.3. पूर्वस्मृती :


          तुम्ही ध्यानाच्या समाधी अवस्थेत जाणं सुरू केलं की तुम्हाला पूर्वस्मृती येतात असं अध्यात्मात सांगण्यात येतं. अनेक लोकांना आपल्या पूर्वस्मृती आलेल्या आहेत असे अनुभव google केल्यास तुम्हाला वाचायला मिळतील. तर टेलिपॅथी चा एक भाग म्हणून पूर्वस्मृती सुद्धा तुम्हाला कळायला लागतील अशी शक्यता आहे.4. वैचारिक प्रक्षेपण :


          सर्वात महत्वाचा मुद्दा ज्या साठी टेलिपॅथी खूप प्रचलित आहे तो म्हणजे वैचारिक प्रक्षेपण. खरं तर आपले विचार आपण नेहमीच प्रक्षेपित करत असतो, पण बहुतांश वेळी ते शाब्दिक किंवा क्रियांच्या माध्यमातून असतात. जर ते विचार Control करून एका तरंगाच्या माध्यमातून प्रक्षेपित करता आले तर त्याला वैचारिक प्रक्षेपण अर्थात टेलिपॅथी असं म्हणता येईल.


          थोडक्यात काय Third Eye किंवा Sixth Sense काहीही म्हणा, जेव्हा ही गूढ शक्ती जागृत व्हायला लागते तेव्हा त्या शक्तीचे पैलू हे आपल्या समोर उलगडायला लागतात आणि त्यातूनच अशा शक्तींचा उदय होतो ज्या कुठेतरी रहस्यमयी आणि अनाकलनीय वाटत असतात. 


          कदाचित त्या असतीलही... आणि त्या असतील तर त्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करताय हे सुद्धा महत्वाचं ठरतं. प्रयत्न केल्यावर यश मिळतंच असं म्हणतात तर या शक्तीचं रहस्य उलगडून घ्यायचं असेलच तर एकदा तरी प्रयत्न करून बघणं गरजेचं आहे आणि जर यशस्वी झालात तर....?  त्यावर पुन्हा कधीतरी.. !


लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi
➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने