A Human Experience : अनुभव मानवी अस्तित्वाचा || Psychology


          आपण जन्म घेतो तसं आपल्याला एक नाव, एक धर्म, एक पंथ, एक ओळख मिळते आणि त्याच मान्यतेच्या आधारावर आपलं पुढचं भविष्य ठरलेलं असतं. आपण एक मनुष्य आहोत ही संकल्पना कालानुरूप स्पष्ट होत जाते आणि आपणही आपलं अस्तित्व मान्य करायला लागतो. 


          पण कधी कधी आपण कोण, कुठून आलो, आपलं अस्तित्व असं कसं काय निर्माण झालं, याचा उद्देश काय ? असे प्रश्न आपल्याला पडतात आणि तेव्हा असं वाटतं की जाणून घ्यावं हे चक्र. बऱ्याचदा आपण एका विशिष्ट मान्यतेद्वारे जे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ,


          जस की एखाद्या धर्माचं उदाहरण घ्या, तुम्ही ज्या धर्मात जन्म घेतलाय त्याची एक मान्यता असते आणि त्या मान्यतेनुसार तुम्ही कोण कसे आलात किंवा तत्सम प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्हाला त्या त्या धर्मात दिलेली आढळून येतील, पण तरीही मनाला कधी कधी हा प्रश्न पडतोच की आपण जे काय मानतोय किंवा जे काय सांगण्यात येतंय ते खरंच तसं आहे का ? किंवा हे ही मानलं की जे काय आधी सांगून ठेवलंय ते सर्व खरं पण मग मीच का आलो ? मलाच का हे सगळं देताय ? म्हणजे माझ्या ऐवजी दुसरा कोणी असता तर ? या सर्व प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी आजचा हा लेख A HUMAN EXPERIENCE !
A human experience : अनुभव मानवी अस्तित्वाचा || Psychology
A human experience : अनुभव मानवी अस्तित्वाचा || Psychology

◾ Concept of life :


           आपण जेव्हा या संकल्पनेवर विचार करायला लागतो तेव्हा लक्षात येतं की, जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी आपल्या अस्तित्वात महत्वाची भूमिका बजावत असतात. 


          या दोन अनुभवाव्यतिरिक्त एक लांब प्रवास आपल्याला करावा लागतो तो म्हणजे आयुष्य. या प्रवासात आपल्याला अनेक अनुभव येतात, लोकं भेटतात, समस्यां येतात, आणि कायम एक शिकवण मिळत जाते. 


          विचार केला तर लक्षात येईल की ही सर्व एखाद्या System सारखं चाललेलं असतं, म्हणजे बघा तुम्ही जन्म घेता तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत एक विचारधारा, एक मान्यता, एक अस्तित्व यांच्यासोबतच तुम्ही हे आयुष्य जगता, पण खरंच तुम्ही जे काय मानताय, ते तसंच आहे असं असतं का? आयुष्य म्हणजे बस्स एक प्रवास आणि दुसरं काहीच नाही का? एकदा सर्व संपलं की The End ! असं च आहे का? 


          तर इथे तुम्हाला आध्यात्म आणि मानसशास्त्र उत्तर देतं पण बऱ्याचदा मिळालेल्या उत्तरातूनही आपल्याला समाधान मिळत नाहीच उलटं आणि कुतूहल वाढतं. 


◾ Concept of Death :


          जी गोष्ट अस्तित्वात आलीये ती कधीतरी सम्पणारच, पण ती संपण्याआधी ती काहीतरी अनुभव घेऊन जात असते. आता आपल्या आयुष्याचा विचार केलात तर आपल्याला येणारे अनुभव त्यातून मिळणारी शिकवण आणि त्यातून घडत जाणारे आपण यांचा एक विचार डोक्यात ठेवला तर लक्षात येईल की जेव्हा आपण मृत्यू शय्येवर असू तेव्हा आपल्याकडे अनुभवांचं एक भांडार असतं जे आयुष्यभर आपण मिळवलेले असतात.


          मृत्यू ला समजून घेतलंत तर लक्षात येईल की तुमची मान्यता, तुमचे विचार, तुमचं अस्तित्व हे फक्त एक paradox आहे. म्हणजे बघा, तुम्ही सर्व अनुभव घेतलेत त्यातून तुम्ही घडले पण एक ना एक दिवस हे सर्व सम्पणारच, त्यामुळे जर मृत्यू चा विचार केलात तर लक्षात येईल की आपण हे सर्व अनुभवत होतो, वास्तविकतेत या सर्व गोष्टी Pointless आहेत. येथे एक Theory येते ज्याला Human Experience म्हणता येईल.


◾ A human experience :


          आपण मनुष्य एका विशिष्ट संरचनेवर आधारलेले जीव आहोत असं आपल्याला बऱ्याचदा लक्षात येतं, म्हणजे बघा किती Systematic असं आपलं शरीर आहे, शरीर तापलं की थंड होण्यासाठी घाम येतो, Energy कमी झाली की आपोआप शरीर Recovery करायला लागतं अशा अनेक गोष्टी आपल्याला समजतील.


          समाजाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे, तुम्ही एक विशिष्ट Identity घेऊन समाजात वावरता, एका विशिष्ट वयानंतर तुमच्या गरजा बदलतात, त्यानुसार तुम्ही कार्य करणं सुरू करता त्याचबरोबर ज्या ज्या काही जबाबदार्या आहेत त्या सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं सुरू करता.


          जेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करतो तेंव्हा वाटतं की हे जे शरीर मिळालंय, किंवा जे काय समाजात स्थान मिळालंय हे खरंच तितकं महत्वाचं आहे का ? म्हणजे मी जे काय करतोय त्याचा आणि माझ्या खऱ्या अस्तित्वाचा काही तरी संबंध आहे का? असा विचार जेव्हा मनात यायला लागतो तेव्हा एक जिज्ञासा निर्माण होते आणि आपल्या शारीरिक अस्तित्वापासून आपण विलग व्हायला लागतो, तेव्हा येथे आपल्याला आपल्या सूक्ष्म शरीराची ओढ लागते आणि ते काय आहे याबद्दल भाष्य करणारं भरपूर साहित्य आपल्या कडे उपलब्ध आहेच.


◾ Spiritual beings :


          तुम्ही इतकं सगळं वाचल्यावर असं वाटत असेल की हे सर्व तर ठीक आहे पण मग आपलं अस्तित्व काय ? म्हणजे सूक्ष्म शरीर ठीक आहे, आत्मा असेल तर तेही ठीक, Consciousness म्हणाल तर ते सुद्धा आहे पण मग नेमकं माझं काय मी कोण ? तर याबाबत एका Spiritual Psychologist Danny Rongo ने भाष्य करताना म्हटलंय की, " We are spiritual beings having a human experience ! "
A human experience : अनुभव मानवी अस्तित्वाचा || Psychology
A human experience : अनुभव मानवी अस्तित्वाचा || Psychology

          आता हे वाचून तुम्हाला वाटत असेल की आम्ही spiritual beings? म्हणजे आमचं अस्तित्व खोटं ? हे जे काय अनुभव आम्ही घेतोय ते खरे नाहीत का? तर याचं उत्तर आहे की ततुम्ही जे काय अनुभव घेताहात त्यासाठी च तर तुम्हाला इथे पाठवलंय.. 


          आता विचार पडतो की येथे आलोय म्हणजे काय ? म्हणजे आम्ही हा अनुभव घेऊ आणि पुढे काय? आधी तर लिहिलंय की मृत्यू म्हणजे The End ! मग हे असं कसं ? तर याबाबत अजूनही संशोधन सुरू असून भविष्यात याचं उत्तर निश्चितच मानवतेकडे असेल. 


◾ भविष्याचा वेध :


          आज मानव अस्तित्व काय आहे आणि आपण कसे आलोत यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून काही नवनवीन संकल्पना उदयास येत आहेत. आध्यत्मिक आणि मानसशास्त्रीय संशोधन जसं जसं पुढे जाईल तसं तसं हे गूढ उकलण्यास सुरवात होईल.


          भविष्यात मानव आणि मानवी अस्तित्व समजून घेण्यासाठी अनेक उपकरणं निघालेले असतिल Superhuman Project हा त्यातीलच एक प्रकार आहे. मानवी चेतनेवर संशोधन करून ती चेतना कशी कार्य करते तसंच त्या चेतनेला कसं Manipulate करता येईल यावर प्रयत्न सुरू आहेत.


          अध्यत्मात या गोष्टींचं उत्तर सांगण्यात आलेलं असून यावर पुन्हा संशोधन करून आणखी नवीन सिदसिद्धांत समोर येण्याची शक्यता आहे. तो पर्यंत आपलं आयुष्य जगण्यास शिका आणि हा प्रवास तसंच या प्रवासाचे अनुभव जगा आणि आनंद घ्या या Human Experience चा !लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi
➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने