Superhuman Formula - महामानव सूत्र || Psychology          नमस्कार मंडळी Psychology मानसशास्त्र या भागात आपण आता पर्यंत 

1] Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख 

2] Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख - Concept of Soul

3] Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख - भाग २

4] The mystery of the universe - ब्रम्हांड रहस्याचं शास्त्र

      याबद्दल माहिती पाहिली. मी खात्रीपूर्वक सांगू शकतो कि तुम्हाला नक्कीच या विषयाला अधिक जाणून घेण्याची ओढ लागली असणार.  


         मंडळी या लेखात आपण 

1] महामानव सूत्र - Superhuman Formula , 

2] Concept of Celibacy ( ब्रम्हचर्याची संकल्पना)

3] Meditation - ध्यान 

       या बाबत जाणून घेणार आहोत. मंडळी हा लेख पूर्ण वाचा आणि आचरणात आणाच, त्याचा फायदा तुम्हाला झाल्या वाचून राहणार नाही. तुम्ही तुमचे १००% द्याल तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. 


          आपल्या आयुष्यात आपले आदर्श व्यक्ती असतात. ज्यांना आपण आपल्या आपल्या मान्यतेनुसार Follow देखील करत असतो..ते आपले आदर्श असतात आणि आपल्यासारखेच अनेक लोकं देखील त्यांना आदर्श मानत असतात. याचा अर्थ असा नाही, की ते काही Superhero वगैरे आहेत पण ते ज्या Level ला ज्या उंची ला जातात, त्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेले असतात.


          तुम्ही स्वामी विवेकानंद यांचं नाव ऐकलं असेलच, कोण भारतीय व्यक्ती त्यांना ओळखत नाही? भारतीयच काय तर अख्खे जग त्यांना ओळ्खतं, त्यांच्या व्यतिरिक्त इतिहासात जरा मागे जाल, तर तुमच्या लक्षात येईल की असे अनेक लोकं होऊन गेलेत ज्यांनी आयुष्यात काहीतरी असं विशेष केलंय, ज्यामुळे त्यांना आज आपण आदर्श व्यक्ती म्हणून मानतो...आणि त्यांनी जे काय केलंय, त्यात काही गोष्टी तरी त्या सर्व व्यक्तींच्या बाबतीत Common आहेत ज्यांनी काहीतरी अलौकिक केलंय..


          बरं त्यांचं ही जाऊद्या, आजच्या काळात काही Successful व्यक्ती आहेत ज्यांनी असं काही काही केलंय, जे तुम्ही आम्ही फक्त स्वप्नात च विचार करू शकतो आणि त्यांच्यातही त्याच गोष्टी Common आहेत. आणि जर तुम्हाला समजलं की त्या सर्व गोष्टी तुमच्याकडेही आहेत तर?


          तुम्ही जर थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल ), की या सर्व व्यक्तींमध्ये ज्या Common गोष्टी होत्या त्या म्हणजे :- 

१)  Focus (एकाग्रता)
२) Discipline (शिस्त) 
३) Stubbornness (जिद्द)

      पण मग या गोष्टी तर आपल्याकडे ही असतात, मग आपण त्यांच्या इतकं Success का होऊ शकत नाही? कधी तरी हा विचार केला असेल तुम्ही...तर याचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे तुमची Lifestyle (जीवनशैली) ..!


          खरं तर  Success प्रत्येकाला हवं आहे पण आपण खरंच त्या दृष्टीने काम करतोय का हे Analyze करण्याची तयारी आपली नसते. आपण जरी म्हणत असू की Success पाहिजे, पण आपण आपला life pattern बदलण्यासाठी आपण तयार होत नाही. कारण आपल्याला आपला Comfort Zone आवडलेला असतो. Basically आपल्याला आळस येतो आणि आपण Excuses शोधू लागतो.


Superhuman Formula - महामानव सूत्र || psychology
Superhuman Formula - महामानव सूत्र || psychology

          तुम्ही बघा, जे लोकं आजच्या काळात Successful आहेत त्यांची Lifestyle काय आहे? ते कसे राहतात आणि त्यांनी असं काय विशेष केलंय ज्यामुळे ते इतके Successful आहेत आणि आपण नाही, तर या सर्व गोष्टीमध्ये एक सूत्र काम करतं ज्यामुळे ते स्वतःला घडवू शकतात आणि त्यांना एकाग्रता, शिस्त आणि जिद्द मिळते, त्यालाच महामानव सूत्र असं म्हणतात.          तुम्ही हे वाचून विचार करत असाल की नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? तर मला इतकंच सांगायचं आहे की हे सूत्र वापरून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही भागात हवा तसा बदल करू शकता आणि हे सूत्र तुम्हाला Successful Strong आणि तुमचा जो कोणता Goal असेल त्याला मिळवण्यासाठी मदत करेल..🔅  महामानव सूत्र  🔅          यात मी तुम्हाला 2 च गोष्टी सांगेन ज्यामुळे तुम्ही बऱ्याच अंशी तुमची Personality बदलून एका यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू करू शकता.

तर याचा पहिला Part आहे ब्रम्हचर्य आणि दुसरा Part आहे ध्यान.


🔅 Concept of Celibacy ( ब्रम्हचर्याची संकल्पना ) 🔅 


          याचा अर्थ आधी समजून घेऊ, ब्रम्ह म्हणजे Devine जो अलौकिक असा आहे, आणि चर्य म्हणजे मार्ग/ रस्ता. 

       शब्दशः अर्थ घेतला तर ब्रम्हचर्य म्हणजे असा मार्ग ज्या द्वारे व्यक्ती पूर्णत्वास जाऊ शकतो. पूर्णत्वास म्हणजे मोक्ष वगैरे किंवा तशी काही  गोष्ट नाहीये (तो एक वेगळा Topicआहे),  तर तुमची जी Actual Energy आहे जिला Masculine Energy असं म्हणतात तिला Sustain करणे.


          भारतात अनेक लोकं असे होऊन गेलेत ज्यांनी ब्रम्हचर्य पालन करून अनेकाविध skills आत्मसात केल्यात. मी आधी स्वामी विवेकानंद यांचं उदाहरण घेतलं कारण अगदी अलीकडच्या काळातील एक mysterious व्यक्ती म्हणून स्वामी विवेकानंद यांची ओळख आहे. तुम्ही ऐकलं असेलच की ते एकपाठी होते, म्हणजे त्यांनी एकदा वाचलं , की त्यांना पुन्हा ते वाचण्याची गरज नव्हती आणि हे सर्व त्यांनी मिळवलं ते फक्त ब्रम्हचर्याचं पालन करून..हे तर बुद्धीच उदाहरण झालं.  


         दुसरं एक  शक्तीचं उदाहरण म्हणजे प्रा. राम मूर्ती, यांना Indian Hercules म्हणत, कारण ते त्यांच्या काळातले सर्वात शक्तिशाली पुरुष म्हणून ओळखले जायचे आणि त्यांच्या ही शक्तीचं विशेष म्हणजे ब्रम्हचर्यच होय. या लोकांसारखे अनेक उदाहरणं देता येतील, पण सांगण्याचं तात्पर्य हे की तुम्ही ब्रम्हचर्य पालन करून तुमचं आयुष्य बदलू शकता..


आजचा काळ आणि आपण :


          आपण आज अशा एका युगात जगत आहोत, जेथे सर्व काही Available आहे, Internet च्या या युगात आपण आपल्याला वाटेल ते बघू, अनुभवू शकतो, पण झालं काय की जसं एखाद्या गोष्टीचा फायदा आपल्याला मिळतो तसंच त्याचा अति वापर आपलं नुकसान देखील करू शकतो, हीच त्या गोष्टीची Dark Side असते. त्यात आपलं शरीर असं आहे की Bright Side पेक्षा Dark Side कडे जास्त Attract होतं, आणि त्यामुळेच आज आपलं शारीरिक मानसिक नुकसान होत आहे. 


         आता नेमकं काय नुकसान होत आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रामुख्याने काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत ज्या समोर येतात, त्या म्हणजे  Porn*graphic content, Masturb*tion आणि Misguidance(चुकीचं मार्गदर्शन).


          या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आज आपल्यातील अनेक लोकांना समस्या उदभवत आहेत. प्रत्येक जण यापैकी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा शिकार झालेला आहे. यावर प्रामुख्याने भाष्य करणं गरजेचं आहे कारण आज जे काय युवा पिढीचं पतन होत आहे, त्याला याच गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. याबद्दल थोडं जाणून घेऊ.


1. P0rn0graphic Content :


          वासनेचं एक बिभत्स रूप म्हणजे P0rn. आज प्रत्येक व्यक्ती या व्यसनाच्या आहारी गेलेला दिसून येतो,  होय हे एक प्रकारचं व्यसन च आहे. कारण जेव्हा तुम्ही P0rn बघता तेव्हा तुमच्या Brain मध्ये Dopamine Hormone Release व्हायला लागतो, तुमच्या Brain मध्ये एक Grey Matter असतं - ज्यामुळे तुम्ही Decision Making करता, ते कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे तुम्ही या गोष्टीच्या आहारी जायला  लागता आणि पुन्हा पुन्हा तेच बघण्याची इच्छा निर्माण होते.


याचे काही ठळक परिणाम :


1. निर्णय क्षमता कमी होते.

2. तुमची बिभत्स प्रवृत्ती वाढायला लागते.


3. तुम्ही ते बघता त्यामुळे S3x बद्दल अवास्तव भावना जगृत होतो.


4. Mindset बदलतो. (यामुळेच Psychos3xual Disorders वाढत आहेत)


5. तुमची Self Worth कमी होते.


6. स्त्री म्हणजे  s3x Object अशी भावना वाढीस लागते.


7. Dopamine Hormone मुळे काहीवेळ चांगलं वाटतं आणि तो पून्हा पुन्हा Brain मध्ये Release व्हायला लागतो त्यामुळे Addiction होण्यास सुरुवात होते.


8. तुमच्या प्रवृत्ती मध्ये बदल झालेले दिसून येतात जसं की प्रत्येक स्त्री कडे एकाच दृष्टिकोनातून पाहणे.


9. मानसिक विकृती ची सुरुवात होते.


10. तुम्ही मानसिक दृष्ट्या कमजोर व्हायला लागता.2. Ma#turbation :


          प्रत्येक व्यक्तीला कामवासना ही नैसर्गिक असते. आणि ती निसर्गाने तुम्हाला दिलीय, कारण त्यामुळे तुम्ही Opposite S3x बद्दल आकर्षण Feel करता, पण झालं काय की आजकाल च्या काळात Internet मुळे सर्व च Easily available असल्यामुळे तुम्ही काही सेकंदात तुम्हाला वाट्टेल ते बघू शकता. तुमचा शारीरिक गुणधर्म च असा आहे की त्याला आनंद पाहिजे असतो , म्हणून तुम्ही वारंवार तेच बघण्यास सुरू करता आणि त्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला P0rno च व्यसन लागलं असेल तर याची पुढची Step म्हणजे Ma#turbation च असते. Basically सर्व मानसिक शारीरिक Problems च मुळ च हे आहे.


Superhuman Formula - महामानव सूत्र || psychology

याचे काही दुष्परिणाम बघू..


1. Mind Weakness होणे.


2. कायम थकलेलं वाटणे.

3. कुठल्याही गोष्टीत मन न लागणे.

4. अति जास्त केल्यास, Suicidal Thoughts.

5. आळस

6. Body Fat वाढणे कारण Testosterone जाऊन Estrogen Trigger होतं.

7. नैराश्य

8. Premature Ejaculation (शिघ्रपतन)

9. Brain Damage तुमच्या डोक्यातले Neuron Rewire होतात.

10. Low Immunity Power, इच्छाशक्ती चा ऱ्हास इ.


3. Misguidance :


         आपल्याला आज Internet वर जे काय दिसतंय मिळतंय आपण तेच प्रमाण मानून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच आपलं चुकतं. याबाबद्दल थोडं जाणून घेऊ..


1. आपल्या शरीराची योग्य माहिती आपल्याला मिळत नाही त्यामुळे मिळेल तिथून आपण Knowledge घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात Misguidance च जास्त मिळतं.


2. Internet वर आपल्याला Ma#turbation is Good for Health म्हणून आजपर्यंत सांगण्यात आलेलं आहे आणि तेच डोक्यात बसलंय त्यामुळे Mind Set बदलला आहे.


3. वासना Control कशी करावी याविषयी कोणी बोलत च नाही त्यामुळे Confusion होतं आणि त्यामुळे नवनवीन Problem तयार होत आहेत.


आता यावर उपाय काय ?


          Basically या सर्व गोष्टींमुळे तुम्ही एक Strong Personal Lifestyle Set करण्यात मागे पडत आहात.
तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की Ma#turbation is Good पण तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही काही वेळेसाठी Masturbate केल्यावर चांगलं Feel करता, पण ती Activity करण्या आधी जी Energy होती जो एक Rage होता तो आहे का? याचं उत्तर निश्चित च नाही असं असेल. जर तुम्हाला इतकं वाचून बदलण्याची इच्छा होत असेल तर आता वेळ आहे ती Recovery करण्याची...आणि Problem तिथे Solution असतातच.  त्यासाठी येथे उपयोग होतो त्या दुसऱ्या Part चा जो आहे ध्यान.🔅 ध्यान : संकल्पना 🔅


          ध्यान म्हणजे स्वतःला एका ठिकाणी स्थिरावून घेणं. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही एखादं काम करता, ते जर तुमच्या आवडीचं काम असेल तर तुम्हाला काळ वेळ याच भान राहत नाही.


          जसे Scientist असतात, किंवा आपण एखाद्या चित्रकाराचं उदाहरण घेऊ, तुम्ही Leonardo da Vinci च नाव ऐकलं असेल, मोनालीसा ची Painting बनवणारा चित्रकार, त्याने ती एकच Painting बनवली असेल असं नाही, पण ती मोनालीसा ची Painting च का Famous झाली? कारण तो जेव्हा ते काढत होता तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष एकच होतं ते म्हणजे ते चित्र काढणे आणि ते काढताना त्याच इतकं ध्यान लागायचं की तो काळवेळ विसरून जायचा.


Superhuman Formula - महामानव सूत्र || psychology
Superhuman Formula - महामानव सूत्र || psychology

          तर सांगण्याचं तात्पर्य हे की कुठलीही गोष्ट तुम्ही करा ती जर पूर्ण Focus ने तुम्ही करत असाल तर ते ध्यान आहे.


ध्यानाच्या काही पद्धती आहेत त्याबद्दल बघू..


1. मंत्रोच्चारण :


हा एक Basic ध्यानाचा प्रकार आहे. मंत्रोच्चारण केल्याने एक Rhythm तयार होतो, ज्यात Sound आणि Vibrations असतात आणि त्या Sound मुळे तुमचं ध्यान लागतं.


2. सक्रिय ध्यान :


हे ध्यान म्हणजे क्रिया करताना केलेलं ध्यान होय. मग ती क्रिया कुठलीही असू शकते. जस की चालणे, प्रवास करणे इ.


3. Rhythmic meditation :


यात एखादया Medium ची मदत घेऊन ध्यान करत असतात. जस की, Binurial Beats.


4. विपसना ध्यान :


यात श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान करायला सांगतात. ही ध्यानाची सर्वात सोपी पद्धत आहे.

अशा बऱ्याच पद्धती आहेत ज्यामुळे तुम्ही Mind आणि Body Balancing करू शकता. पण याद्वारे Lifestyle कशी करावी हा प्रश्न पडू शकतो तर त्याचं ही उत्तर पुढीलप्रमाणे:

 टीप: हे सर्व कमीत कमी 21 दिवस करा आणि नंतर जर तुम्हाला Result दिसत असले तर तुमची Lifestyle या Tips नुसार Design करा.


1. रोजचं एक Routine बनवा.

2. रोज सकाळी उठणे सुरू करा.

3. प्रयत्न करा की ब्रम्हमुहूर्तावर ध्यान करता येईल.

4. रोज कमीत कमी 1 तास तरी व्यायाम करा.

5. रोज नवीन काहीतरी शिका.

6. स्वता:च्या स्वच्छतेची काळजी घेणं सुरू करा.

7. शारीरिक बळकटी साठी शिलाजीत , अशवगंधा जे Available असेल ते घ्या.

8. जेव्हा ही डोक्यात काही Negative विचार येतील तेव्हा लगेच त्या जागेवरून उठून थोडं फिरून या.

9. P0rn0 बंद.

10. Social Media वर ज्या काही अशा Trigger करणाऱ्या Post असतील तर त्या Pages ला Unfollow करा.

11. शक्य असेल तर भडकवू गोष्टीपासून दूर रहा.

12. नवनवीन Skills Develop करा, पुस्तके वाचा.


या सर्व गोष्टी तुम्ही सुरू केल्यात की याचे सर्वात अधिक benefits तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर होतील. 


याचे काही ठळक फायदे..


1. तुम्ही तुमच्या भावना बऱ्याच अंशी Control करू शकाल.

2. Mind Rewire होईल आणि तुम्हाला P0RN वगैरे बघण्याची गरज वाटणार नाही.

3. नेहमी चांगला Mood राहील.

4. Testosterone वाढलं की Energy Level वाढते त्यामुळे तुम्ही कायम Energetic Feel कराल.

5. Body मध्ये Vascularity वाढण्यास सुरुवात होईल.

6. Fat loss होणं सुरू होईल.

7. तुमचं तेज तुमच्या लक्षात यायला लागेल.

8. तुम्ही अधिक Emotionally Stable होत जाल.

9. Energy वाढेल त्यामुळे बरीच कामं करायची प्रेरणा मिळायला लागेल.

10. मानसिक दृष्ट्या Strong झालात तर बऱ्याचशा गोष्टी करणं तुम्हाला अधिक सोप्प वाटायला लागेल.


          आणखी बरेच Benefits तुम्हाला मिळतील आणि Energy Transmutation होऊन कुंडलिनी जागरण होण्यात सुद्धा मदत होईल. कुंडलिनी आणि त्याच्या बद्दल पुन्हा कधीतरी..


          Successful होण्यासाठी तुम्हाला स्वतःच प्रयत्न करावे लागतील. हे सर्व तर बस एक आराखडा म्हणून आहे. तुम्ही सर्वात आधी हा Mind Set करा की मला हे सर्व करायचं च आहे आणि हळूहळू हे सर्व करणं सुरू करा. हे सर्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवा Patience is the Key !! म्हणून हार न मानता आपल्या आयुष्यात काही Goals बनवा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु करा..पुढील वाटचाली साठी शुभेच्छा !!
लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
               या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने