Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख || Psychology 


          नमस्कार... !! मी तुषार, मानसशास्त्र विषयाचा अभ्यासक. तसं म्हणायला MA Psychology Net झालोय पण अभ्यासकच म्हणावं लागेल कारण तुम्ही कितीही शिकलात तरी परिपूर्ण कधीच होत नाही. अभ्यास ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आणि मी त्या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून मानसशास्त्रात PhD. सुद्धा करतोय. 


          लहानपणापासून आपण कोण ? , कसे आलो ?, आपलं अस्तित्व काय ? असे प्रश्न सतत डोक्यात यायचे पण नेमकं उत्तर कधी मिळालंच नाही, अशातच वाचनाचा छंद लागला नवनविन विषय वाचतांना एकदा Psychology या विषयाचे एक Book वाचनात आले आणि मी या विषयावर प्रभावित झालो. 


Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख || Psychology
Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख

          Graduation करत असताना सुद्धा हा Psychology विषय वाचायला, समजायला मिळाला आणि जेवढा तो विषय वाचत, समजत गेलो तेवढाच तो विषय Interesting वाटू लागला. नंतर बऱ्यापैकी विषय समजल्यावर स्वतःला जाणून घेण्याची उत्कंठा वाढू लागली . मग अध्यात्म या विषयाकडे वळालो , अशातच काही गुढतेकडे नेणारे विषय वाचनात आलेत व आणखी ,आणखी जाणून घेण्याची इच्छा वाढू लागली म्हणून ध्यान साधने कडे आकर्षित होऊ लागलो, self meditation करायला लागलो. ध्यान साधना करीत असतांना काही अनाकलनीय अनुभव यायला लागलेत ज्याचा परिणाम माझ्या शारीरिक आणि मानसिकतेवर सुद्धा व्हायला लागला मी एकटा पडायला लागलो, नको त्या गोष्टींचं आकर्षण आणि नको त्या गोष्टींबद्दल चिडही यायला लागली. 


          आपल्यासोबत हे अस का होते काहीच कळत नव्हतं आणि जेव्हा यांची उकल व्हायला लागली तेव्हा आणखी यात खोलावर जाऊन शोध घ्यावासा वाटू लागला . म्हणून मी बऱ्याच लोकांना भेटलो जे मार्गदर्शक ठरलेत व स्वतः काही अनुभव घेत असतानाच असं वाटायला लागलं की आपले अनुभव आपण लोकांपर्यंत पोहोचवावेत, पण कुठलाही मार्ग सापडत नव्हता ,अशातच एका मित्राने मला प्रोत्साहित केलं आणि आता मी माझे अनुभव, माझं मिळवलेलं ज्ञान आपल्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न करतोय. 


येणाऱ्या blogs मधून मी काही topics वर माझे विचार माझे अनुभव आपल्यासोबत share करणार आहे जसे की, 

🔅 Concept of God : यात असे काही अनुभव आहेत की ज्यामुळे तुमचा प्रत्येक गोष्टीवरचा point of view change होईल.

🔅 Dimensions Theories : आपला consciousness dimensions मध्ये फिरतो आणि त्याबद्दल आणखी माहिती या ब्लॉग मध्ये येईल.

🔅 Pure Spirituality : अध्यात्म हा विषय जेवढा समजून घ्याल तेवढा आणखी वाढत जातो. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला येणाऱ्या blogs मधून वाचायला मिळतील.

 विषय जरी असे विचित्र वाटत असले तरी माझे आलेले अनुभव तुमच्याशी share करताना तुम्हाला ते interesting वाटतील...

आज बरेच वर्ष झालेत मी हे सर्व करतोय आणि माझ्या अनुभवांचा तुम्हालाही तुमच्या आयुष्यात नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा..! 


लेखन : ✍ Tushar Gopnarayan   
            ◾   MA Psychology+Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
              या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने