पुराव्यानिशी लाईव्ह येणार आहे ; तृप्ती देसाई || अक्षय बोराडे प्रकरणाला नवे वळण || Marathi news


          काही दिवसांपूर्वी अक्षय बोऱ्हाडे या तरुणास  एका बड्या नेत्याने मारहाण केली होती त्यावेळी त्या तरुणाने फेसबुक लाईव्ह माध्यमातून आपल्यावर झालेले अन्याय त्याने स्पष्ट केले. अक्षय बोऱ्हाडे हा तरुण गोर गरीब तसेच मनोरुग्ण व समाजातील अन्याय होणाऱ्या घटनांना त्याचा युट्युब चॅनेल वरून प्रकाश झोतात आणत असतो. सध्या तो २०-३० मनोरुग्णांना सांभाळत असल्याचे जाणकार सांगतात. थोडक्यात अक्षय हा तरुण समाजकार्य करतो. महाराष्ट्र भर हे प्रकरन वाऱ्यासारखं पसरत आहे.

पुराव्यानिशी लाईव्ह येणार आहे ; तृप्ती देसाई ||अक्षय बोराडे प्रकरणाला नवे वळण || Marathi news
पुराव्यानिशी लाईव्ह येणार आहे ; तृप्ती देसाई

          एकीकडे भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी या प्रकरणाबाबत फेसबुक मीडिया वर एक विधान केलं त्यात त्या म्हणतात कि ,  " सर्वसामान्यांनी हे सत्य स्वीकारायलाच हवं. अक्षय मोहन बोराडे कोणाचे आभार मानतो आहे, बघा जराआणि हे सर्व कोण आहेत माहित नसेल तर यूट्यूबला चेक करा...हा मुलगा गुन्हेगारी टोळीशी परिचित आहे हे ऐकलं होतं, परंतु त्याच्या कालच्या लाईव्ह वरून आता सिद्ध झालं., आता हा आवाज त्याचा नाही असे म्हणून आंधळ्या डोळ्यांनी पाठिंबा देणाऱ्यांनी सत्य गोष्टीला खोटे ठरवू नये.म्हणूनच तो लाईव्ह मध्ये म्हणत होता का? की माझे हे काम बंद झाले तर मी नामचीन गुंड होईन."


          पुढे त्या म्हणतात " तो मनोरुग्णांची सेवा करतो म्हणून त्याचे आमच्याकडून अभिनंदनच परंतु या व्हिडिओमध्ये भाऊसाहेब आंधळकर नाव सोडले तर इतरांची माहिती युट्युब आणि गुगलवरमिळेलच.हा व्हिडिओ मि टाकला म्हणून घाबरून जाऊन काल रात्रीचा व्हिडिओ अक्षय बोराडेने डिलीट करू नये म्हणजे झालं,आम्ही तो डाउनलोड केलाय पूर्ण त्यामुळे काही टेन्शन नाही.जुन्नर पोलिसांनी त्याचे सहा महिन्यातील कॉल रेकॉर्डिंग तपासावे, तसेच त्याला मारहाण करण्यात आली अशा स्वरूपाचा व्हिडिओ लाइव्ह आला त्यानंतरचे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग तपासावेत म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी समजू शकेल."


तसेच त्या अक्षय बोराडे प्रकरणात पुराव्यानिशी लाईव्ह येणार आहेत , टाइमिंग कळवेनच.सत्य स्वीकारण्याची तयारी पाठिंबा देणार्‍यांनी ठेवावी . असे त्यांनी फेसबुक वर पोस्ट करून जनतेला सूचित केले.
अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने दिलेले पुरावे :

➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )

२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ


        ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने