The mystery of the universe | ब्रम्हांड रहस्याचं शास्त्र || Psychology
        आपण कोण ? आपला Origin काय ? ही पृथ्वी , हे ब्रम्हांड कसं निर्माण झालं ? कोणी केलं असेल हे सर्व ? खरंच हे निर्माण करणारी शक्ती आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम एक शास्त्र करतं. काय आहे ते शास्त्र ? या लेखात आपण पाहणार आहोत mystery of the universe ,Curiosity ,Metaphysics ,Origin of the universe ,Cosmology ,Quantum Physics . या सर्व गोष्टी पाहताना तुमच्या मनाला खूपच उत्सुकता लागेल तसेच पडणाऱ्या प्रश्नाचे निराकरण होण्यास मदत होईल चला तर मग पाहुयात. 


          आपण पृथ्वीतलावर राहतो, या पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव ,जंतु, प्राणी, पक्षी आहेत हे आपल्याला माहीतच आहे. या जैवविविधतेने नटलेल्या ग्रहावर सर्वांत बुद्धिमान प्राणी म्हणजे माणूस. इच्छाशक्ती, बुद्धी, शारीरिक क्षमता आणि एक complex body design माणसाला सर्व जीवांमधून अगदी वेगळं स्वरूप प्रदान करतात. मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आजपर्यंत करून दाखवल्या आहेत, आणि पुढेही करणारच आहे. त्याला ज्या गोष्टी आतापर्यंत कळल्यात त्या गोष्टी काही शास्त्र, काही नियम याद्वारे मिळवून मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम माणूस अगदी आधीपासून करत आलेला आहे, यालाच Curiosity म्हणतात.

The mystery of the universe | ब्रम्हांड रहस्याचं शास्त्र || Psychology
The mystery of the universe | ब्रम्हांड रहस्याचं शास्त्र || Psychology

          Curiosity मुळे आपला Origin काय ? आपण कोण ? कसे आलो ?  हे ब्रम्हांड काय ? याच अस्तित्व काय ? हे सर्व प्रश्न मानवाला अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी प्रेरित करू लागलेत, आणि त्यातूनच विविध क्षेत्रात अनेक शोध होऊ लागलेत. मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र निर्माण होऊ लागलं. जसजशी माहिती मिळत गेली तसतशी अनेक प्रश्नांची उत्तरेदेखील मिळत गेली, पण त्यासोबतच नवीन प्रश्न देखील निर्माण होऊ लागलेत, त्यांची उत्तरे शोधतांना असं लक्षात यायला लागलं की काही प्रश्न जरा गुढतेकडे घेऊन जाणारे आहेत. मग जिज्ञासा इतकी वाढली, की त्या प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी काही नवीन शास्त्रांचा उदय झाला. तसेच काही ब्रम्हांड निर्मिती आणि आपल्या Existence बद्दल प्रश्न निर्माण झाले त्यांची उत्तरे शोधण्यासाठी एका विशेष प्रकारच्या शास्त्राची गरज भासू लागली तेव्हा metaphysics ची निर्मिती झाली. आता हे काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया...
Metaphysics :


          आपल्या भौतिक गोष्टींचं अध्ययन करण्यासाठी एक शास्त्र विकसित करण्यात आलं , त्याला physics असं म्हणतात. यातल्या Theories प्रत्येकाने एकदा तरी वाचल्या ऐकल्या असतीलच, पण जेव्हापासून आपल्याला कळायला लागलं की निसर्गात अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्या बुद्धी च्या बाहेरच्या आहेत, तेव्हा एक नवीन शास्त्र उदयास आलं, त्याला Metaphysics म्हणतात.

          Metaphysics ही Physics ची एक शाखाच आहे, ज्यात एखाद्या Knowledge ची Reality तपासण्यात येते. याचे Basically दोन भाग पडतात, ज्यात पहिला भाग हा ब्रम्हांडाची Study करतो तर दुसरा भाग अस्तित्व Existence ची Study करतो.यात जे प्रामुख्याने शोधले जाते ते म्हणजे-


1. Existance of god :

          खरंच जर हे ब्रम्हांड तयार झालं तर ते तयार करणारं कोणी आहे का आणि जर असेल तर त्याच अस्तित्व काय या बद्दल Metaphysics मध्ये संशोधन सुरू आहे.


2 . Origin of the universe :

          आपलं हे ब्रम्हांड, याचं Origin काय, किंवा यात नेमकं काय काय आहे अशा सर्व बाबींचा शोध यात घेतला जातो.


3 . Secrets of the nature : 

          आपली प्रकृती ही अनेक रहस्यमयी गोष्टींनी भरलेली आहे, त्यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.


          तसं बघितलं तर Metaphysics हा विषय Interesting वाटायला लागतो, कारण यात Science आणि Probability वापरून अशा गोष्टींचं आकलन करण्यात येतं  ज्या Normally आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत.


Metaphysics चा काही शाखा आहेत त्या पुढील प्रमाणे :


1. Cosmology :

          यात ब्रम्हांड कसं काम करतं याचं संधोधन केलं जातं.  ग्रह, तारे यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, त्यांचा उगम कसा झाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यात शोधली जातात.


2 . Ontology :

          यात God Particle, Paranormal Entities याबाबत संशोधन केलं जातं, अत्याधिक गुढतेकडे जाणारा हा विषय आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एक एका विशीष्ट पद्धतीद्वारे शोधण्याचं काम यात केलं जातं.


आता हे सर्व वाचून तुम्ही सुद्धा Curious झाले असाल, पण याच्या पुढेही बरंच काही आहे, याची दुसरी Term म्हणजे Quantum Physics..आता याबाबत थोडी माहिती बघू..Quantum Physics :          यामध्ये प्रामुख्याने वस्तूंच्या Micro Level वर जाऊन Study केली जाते. 
उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखाद्या वस्तूला बघतो तेव्हा वास्तविकतेत त्याच Light Ray Reflection आपण बघतो, म्हणजे प्रत्येक वस्तू जी आपल्या दृष्टीक्षेपात असते, ती वस्तू प्रकाश किरणांचं एक Reflection मात्र असते,असं ही Study सांगते.Metaphysics चे काही नियम :


          या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्यात उपयोगी पडू शकतात, ज्या Metaphysics ची देण आहेत  आणि ज्यामुळे आपण एक माणूस म्हणून निसर्ग आणि ब्रम्हांड याबद्दल जाणून घेऊ शकतो तसेच त्याचा जास्त फायदा जगताना Mental आणि Spiritual Level वर अधिक होऊ शकतो, त्याबद्दल थोडसं..


1. वैचारिक शक्तीचा नियम :

          आपण विचार करू शकतो आणि ते विचार आपलं अस्तित्व बदलून टाकण्याची ताकद ठेवतात असं हा नियम सांगतो. जसं की Positive विचार आपल्याला सकारत्मक करून आपल्या व्यक्तिमत्वात अनेक चांगले बदल घडवून आणू शकतात.


2 . पुनः निर्माण करण्याचा नियम :

          यात आपल्या शरीरावर Focus करण्यात येतो. या Theory नुसार आपलं शरीर हे अनेक Cells च मिळून बनलेलं असून त्या Cells मध्ये आपल्या शरीरराची झीज भरून काढण्याइतकी ताकद आहे आणि त्यामुळेच आपण जिवन जगू शकतो, म्हणजे आपल्या शरीरात पुनः निर्माण करण्याची क्षमता आहे असं हा सिद्धांत सांगतो.


3 . सकारात्मकतेचा नियम :

          स्वतःला Positive करून किती बदल आपण स्वतःमध्ये करू शकतो ह्याची माहिती हा नियम सांगतो. जेव्हा तुम्ही Positive राहायला शिकता तेव्हा तुम्ही तुमच्या Energies Positive करायला सुरुवात करता आणि त्यामुळे बऱ्याच अंशी तुमचं आयुष्य बदलून जातं.


4 . सहानुभूती चा नियम :

          लोकांच्या भावना समजून घेऊन त्यानुसार Reaction कशी द्यायची त्याबाबत हा सिद्धांत माहिती देतो.


5 . विलगतेचा नियम :

          जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर Depend  राहायला लागतो तेव्हा ती गोष्ट आपल्यासाठी घातक ठरू शकते किंवा त्यामुळे मिळणाऱ्या इतर गोष्टींवर आपण दुर्लक्ष करू शकतो म्हणून कुठल्याही गोष्टी पासून Detach होणं हे तुमच्या Spiritual Progress साठी अतिमहत्वाचं ठरतं असा हा नियम सांगतो.


          आपलं ब्रम्हांड आणि आपलं अस्तित्व काय आहे याबाबद्दल सतत संशोधन सुरू आहे.. बऱ्याच गोष्टी अजूनही उलगडल्या नाहीत आणि कदाचित जेव्हा त्यांचा उलगडा होईल तेव्हा आपण नसू , पण spiritual level वर जेव्हा तुम्ही जायला लागता तेव्हा या गोष्टींचा उलगडा तुम्हाला व्हायला लागतो असं म्हणतात, त्यालाच Spiritual Awakening असं म्हणतात. काय असतं नेमकं हे Spiritual Awakening? त्याबद्दल पुढच्या वेळी बघू...!

लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98


Instagram :
@gtushar111 


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.
               या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत . 
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


1 टिप्पण्या

  1. व्वा क्या बात हैं ...बर्याच गोष्टींची माहिती या आपल्या लेखातुन मिळाली माहिती शेयर करण्यासाठी मन्नपुर्वक धन्यवाद सर आपले ...आणी आपल्याला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा सर ...!!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने