"सत्यवानाची सावित्री व्हायच की महात्मा फुलेंची हे आता महिलांनीच ठरवायचंय" : तृप्ती देसाई || Marathi news



          वटपौर्णिमा दिनाचे अवचित्त साधून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा . मा तृप्ती ताई देसाई यांनी आज तमाम महिला वर्गाला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. त्या वेळी त्या म्हणाल्या कि " सत्यवानाची सावित्री व्हायच की महात्मा फुलेंची हे आता महिलांनीच ठरवायचंय "

"सत्यवानाची सावित्री व्हायच की महात्मा फुलेंची हे आता महिलांनीच ठरवायचंय" : तृप्ती देसाई || Marathi news
"सत्यवानाची सावित्री व्हायच की महात्मा फुलेंची हे आता महिलांनीच ठरवायचंय"

          "आज ५ जून वटपौर्णिमा आणि पर्यावरण दिन , आज वटपौर्णिमेच्या महिलांना शुभेच्छा आणि पर्यावरण दिनाच्या सुद्धा सर्वांना मनापासून शुभेच्छा . आज वटपौर्णिमा महिलांमध्ये उत्साह असतो . अनेक ठिकाणी महिला नटून थटून जातात परंतु लोकडाऊन ची परिथिती असताना तो सन जो आहे तो घरीच साजरा करायचा आहे. बाहेर गर्दी करायची नाहीये , अनेक ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आलेले आहे. पण हा सन साजरा करत असतानाच २१ व्या शतकात माझे काय मत आहे हे तुम्हाला आवर्जून सांगायचे आहे, जेव्हा एखाद्या स्त्रीचे एकाद्या पुरुषाशी लग्न होते. तेव्हा त्या महिलेला मंगळसूत्र घातलं जात. तिला हिरव्या बांगड्या घातल्या जातात , पायात जोडवी घातली जातात. " असं तृप्ती देसाई म्हणाल्या. 


          पुढे त्या म्हणतात " हे सर्व अलंकार महिलाना घातले जाते परंतु असा कोणता दागिना किंवा लायसन्स कि ज्याद्वारे लग्न झालेय असे ओळखता येईल असे पुरुषाला काही केले जात नाही. जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा मरतो तेव्हा तिला विधवा म्हंटल जात पण एखाद्या पुरुषाची पत्नी मरते तेव्हा त्याला विधवा म्हंटले जात नाही . त्या महिलेचा पती वारला असेल तिला पांढरी साडी घालणे , टिकली लावू नको सांगणे असेल , बांगड्या घालू नको सांगणे असेल पण आता या परिस्तिथी मध्ये ५-१०% सुधारणा झाली असेल पण ९०% परिस्तिथी तशीच आहे.





          त्यामुळे मला महिलांना असे सांगायचे आहे. कि  वटपौर्णिमा साजरी करा , पूजा करा. पण महिला वर्गाला समानतेचा अधिकार दिला गेला आहे त्यानुसार बदल करण्याची गरज आहे , वटपौर्णिमेच्या महिलांना शुभेच्छा आणि त्या महिलांना आवर्जून सांगायचे आहे कि सत्यवानाची सावित्री व्हायच की महात्मा फुलेंची सावित्री व्हायचय हे आता महिलांनीच ठरवायचंय आहे.




➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


🔅 हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )

२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ

3)  Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख




        ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने