jay bhim movie review | जय भीम मूवी रिव्हिव्ह 

jay bhim movie review
jay bhim movie review


jay bhim movie review | जय भीम मूवी रिव्हिव्ह 

By Sukesh Janwalkar

टीप :- जर पाहिला नसेल तर पुढे वाचू नका... आधी बघा मगच वाचा !
जय भीम सारखा एखादा चित्रपट पाहण्यात आला की खरं तर दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांच करावं तितकं कौतुक कमी वाटतं ... इतका जबरदस्त हा चित्रपट बनवला गेला आहे!!
अशातले मराठी असो की बॉलिवूड चित्रपट खरं तर एकतर फक्त पैशांसाठीच बनवले जातात किंवा काहीच काम धंदे नाहीत म्हणून तरी बनवले जातात या मतावर मी आलोय.... अक्षरशः एखादा सुद्धा असा चित्रपट पाहायला भेटणं जाम मुश्किल आहे की ज्यात नायिका , प्रेम, रोमान्स आणि गरज नसताना ही दाखवलं गेलेलं आयटम सॉंग नसेल... आणि एखाद्या विशिष्ट गोष्टींवर लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा चळवळ घडवण्यासाठी बनवायला घेतला असेल !
असो... अतिशय अभ्यासपूर्ण अशी कथेची मांडणी ...प्रत्येक गोष्टी ला दिलं गेलेलं मोजून मापून वजन.... कोणत्याही गोष्टीची टाळली गेलेली अतिशयोक्ती.... तात्कालीन परिस्थितीनुरूप केलं गेलेलं चित्रीकरण... विशेष म्हणजे वकीलाला दिली गेलेली त्या वेळेतील चलनातील चिल्लर... आणि एक न एक पात्राचा प्रभावी आणि दमदार अभिनय ... ना कसला रोमान्स ना उगीच केलं गेलेलं अंगप्रदर्शन यामुळेच हा चित्रपट सुद्धा खरंच बघण्यापेक्षा जगण्या सारखा वाटला... !!
1993 मध्ये K. Chandru वकिलीची प्रॅक्टिस करीत असताना चेन्नई High Court तील सर्वात जास्ती काळ चाललेली ही एक साधी सुधी वाटणारी केस आहे. पण चित्रपट अगदी सत्य कथेवर आधारित आहे... त्यात कथेचे चित्रीकरण इतक्या जबरदस्त पध्दतीने केलं गेलेलं आहे की 10 पैकी 9 गुण कोणीही द्यायलाच हवं असं वाटतं!!
पात्रांची ओळख करून देण्यासाठी , त्या प्रत्येक पात्राची वैयक्तिक पार्श्वभूमी स्पष्ट होण्यासाठी आणि त्या काळातील जीवनमान आपल्याला समजण्यासाठी सुरुवातीला चित्रपटाला एक आगळा वेगळा Angle दिला गेलेला दिसला....तो पार्ट थोडासा Slow वाटतो पण तितकाच Intersting सुद्धा !! त्यातून आपल्याला अगदी सुरुवातीलाच स्पष्ट होतं की तेथील पोलीस वालेच खरे गुंडे, गुन्हेगार आहेत...
थोडं पुढे गेल्या नंतर एका छोट्याशा गावातील समाजातील अगदी छोट छोट्याशा आदिवासी लोकांचं जीवनमान तेव्हा कसं होतं... त्यात तात्कालीन प्रतिष्ठित लोक त्यांच्याबरोबर कसं चुकीच्या प्रकारे वागायचे...इत्यादी गोष्टींचा बराचसा अंदाज आपल्याला येऊन जातो....त्यात कोणत्याही चित्रपटाची मजा पात्राशी पूर्णपणे एकरूप होता आलं तरच येत असते त्यामुळं जमलं तर आजची परिस्थिती सोडून तेव्हाच्या काळी जाऊन नक्की एकरूप होऊन बघायचं !!
अक्षरशः हे लोकं उंदीर मारून खायचे (?)... साप पकडायचे इतके जंगली दाखवले गेले आहेत... या सगळ्यात त्याच आदिवासी लोकामधील एका साध्या सुध्या वाटणाऱ्या कुटुंबातील दोघा नवरा बायकोचं एकमेकांवर असलेलं नितांत प्रेम.... त्यात त्यांचा परिस्थिती मुळे असलेला फाटका संसार.... अन त्यात देखील त्याचं तिच्यासाठी स्वतःच हक्काचं घर बांधण्यासाठी चं स्वप्नं... Specially तिने वीटभट्टी वर काम करत असताना त्याच्या हाताचे ठसे घेऊन तयार केलेली वीट आणि ती वीट नवीन घरात ठेवायची असं तिने पाहिलेलं स्वप्नं अगदी आपसूकच आपल्या डोळ्यात टचकन पाणी आणून जातं अगदी 'गजनी' वाला touch देऊन...! ❤️
पण कथेला खरी सुरुवात होते सरपंचाच्या घरी झालेल्या चोरी पासूनच.... जी चोरी केलेली नसते त्या चोरीत आणि सोबतच इतर कित्येक गुन्ह्यात अशा गरीब आदिवासी लोकांना फसवलं जात असतं ... त्यात या प्रेग्नंट असलेल्या स्त्रीला तिच्या नवऱ्याला किती हाल हाल सोसावे लागतात...पोलिसांच्या तावडीतून सुरू झालेला ते वकीला पर्यंत एका साध्या , अशिक्षित, असहाय, निरागस आणि गर्भवती असलेल्या स्री चा प्रवास इतका कष्टदायी दाखवला गेला आहे की आपल्या साठी तरी तो हृदयद्रावक वाटतो.... !!
वकील चंद्रु अर्थातच हिरो चा शब्द न शब्द अगदी विकत घ्यावा असाच वाटतो.... तो एकतर कधी बोलत नाही... आणि बोललाच तर कुठेतरी त्याच्या प्रत्येक शब्दाची नोंद घ्यावी असं वाटू लागतं.... इतक्या प्रभावी पणे त्याचं बोलणं दाखवलं गेलं आहे.
कोर्टात वकील म्हणून असताना किंवा कोर्टा बाहेर एक व्यक्ती म्हणून जगत असताना... त्याच्यात दाखवली गेलेली अभ्यासु वृत्ती, माणूसकी, जाती पाती बद्दल असलेले त्याचे विचार आणि पोलिसांबद्दल किंवा त्यांच्या वृत्ती बद्दल असलेला त्याचा थोडा बहुत द्वेष अतिशय परफेक्ट असा दिसतो....!
पुढे जाऊन त्याने या केस वर केलेली मेहनत... एक न एक गोष्टीचा कसून केलेला पाठपुरावा अगदी मन जिंकून जातो....!
अर्थातच केस तर शेवटी Hero च जिंकत असतो पण या जिंकण्यापेक्षा त्यांच्या लढाईचा प्रवास अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवून ठेवतोच...!!
मला तर चित्रपटातील सगळेच Dailouge जाम आवडले राव....
Especially तिच्यावर काहिच चुकी नसताना, ती गर्भवती असताना, इतका अतोनात त्रास दिला गेलेला असताना , तिच्या नवऱ्याचा अक्षरशः तिच्या डोळ्या देखत जणू खूनच केला गेलेला असताना ती वकिलाला बोलते....
"साहेब जरी त्या पोलिसाला साप चावला असता आणि तो माझ्याकडे इलाजासाठी आला असता तरी मी त्याचा जीव नक्की वाचवला असता!"
खरंच जास्ती करून तिथेच आपण तिच्या प्रेमात पडलो ... !!
Habeas corpus पासून सुरू झालेली केस आणि पोलिसांना दोषी ठरवून दिला गेलेला योग्य न्याय सगळं कसं जाम भारी वाटतं!!
बाकी ही कथा अगदी खरी आहे हे समजलं तेव्हा असा ही एक भारत आहे का असा प्रश्न नक्की पडतोच.... त्यात सत्य जीवनात चन्द्रु नावाचा वकील होता आणि त्याचं काम पाहिलं तर तोंडात बोट आपोआप जातं.... मद्रास high Court वर त्यांची न्यायाधीश म्हणून निवड अब्दुल कलाम सर नी केली होती या वरूनच बाकी आपल्या लक्षात यायला हवं...!
न्यायाधीश म्हणून काम करताना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तब्बल 96000 केसेस निकाली लावल्या होत्या .... बाकी चित्रपटाच्या शेवटी त्यांच्या बद्दल बरीच माहिती दिली गेलेली आहे राहिलेली आज न उद्या वृत्तपत्रात नक्कीच छापून देतील ...!
बाकी बघा ना चित्रपटाचा हा मूळ विषय सोडून प्रकाश राज यांच्या एका वाक्यावर सोशल मीडिया वर वाद आणि या इतक्या छान चित्रपटाला विरोध सुद्धा सुरू झालेला आहे .... !!
बाकी काही असो K Chandru असतील की कथेची नायिका Sanghini .... Quality माणसातच असावी लागते राव ... उगाच कोणीही HERO नाही होऊ शकत ! ❤️

~Sukesh Janwalkar.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने