मिसाईल मॅन डॉ. A.P.J. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त खास... । व्यक्तीविशेष ।। Khasmarathi 

                    डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी तरुण पिढीला दिलेलं मिशन २०२० आणि भारताला महासत्ता होवू पाहणाऱ्या डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ साली रामेश्वरम या तामिळनाडू मधील ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते . त्यांच्या आई चे नाव आशीअम्मा व वडिलांचे नाव जैनुल्लाब्दीन असून ते मध्यम वर्गीय कुटुंब होते.


"जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही ,
     स्वतः बद्दल अभिमान बाळगण्याआधी काही तरी 
     करून दाखवा , स्वतःला सिद्ध करा... !!"


मिसाईल मॅन डॉ. A.P.J. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त खास... । व्यक्तीविशेष ।। Khasmarathi.
मिसाईल मॅन डॉ. A.P.J. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त खास... । व्यक्तीविशेष ।। Khasmarathi.

      जैनुल्लाब्दीन यांना चार मुले व एक मुलगी होती सर्वात मोठे असणारे मुस्तफा हे किराणा मालाचे दुकान् चालवायचे तर सर्वात लहान असणारे बंधू  शंख शिंपल्या पासून बनवलेल्या वस्तू यात्रेकरुंना विकायचे. तर स्वतः जैनुल्लाब्दीन रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत असत. कलाम यांचे कुटुंब तसे गरीबच होते कलाम हे स्वतः पेपर विकून आपल्या कुटुंबाला सहकार्य करायचे .

     कलाम यांचे शालेय जीवन पहावयाचे झाले तर ते सर्वसाधारण श्रेणीतील विद्यार्थी होते. पण ते शिकण्याची तीव्र इच्छा असणारे व कष्टकरी विद्यार्थी होते . श्वार्ट्ज उच्च माध्यमिक विद्यालय, रामनाथपुरम इथून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी जोसेफ कॉलेज, तिरुचिराप्पल्ली इथे प्रवेश घेतला . १९९५४ साली युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास इथून त्यांनी फिसिक्स मधून पदवी घेतली. १९५५ साली ते मद्रास ला गेले व मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. कलाम एका वरिष्ठ वर्गाच्या प्रकल्पावर काम करत होते पण त्याचे हेड त्यांच्या रेंगाळलेल्या कामांवर असमाधानी होते त्यांनी कलाम यांना बजावले कि पुढच्या तीन दिवसात जर प्रकल्प पूर्ण नाही झाला तर त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल यामुळे  ते तणावात राहिले पण पुढल्या दिवसात त्यांनी त्यांचा प्रकल्प पूर्ण करून दिला.

     फायटर पायलट बनणे हे त्यांचे स्वप्न होते पण ते पूर्ण करण्यात थोडेसे चुकले कारण फायटर पायलट बनण्यासाठी फक्त आठ जागा शिल्लक होत्या आणि कलाम नवव्या स्थानापर्यंत मजल मारू शकले. मद्रास इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी इथून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी १९६० साली एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ऑफ द डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनिजेशन मध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. १९६९ मध्ये कलाम यांची भारतीय अवकाश संशोधन संस्था (इसरो) येथे बदली झाली जिथे ते भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहन (एसएलव्ही-II) चे प्रकल्प संचालक होते. त्यांनी जुलै १, १९८० साली रोहिणी उपग्रह यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत तैनात केले.

     के. आर. नारायणन यांच्यानंतर कलाम यांनी भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. २००२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी लक्ष्मी सहगलने जिंकलेल्या १०७,३६६ मतांना मागे टाकून ९२२,८८४ मतांच्या मतदानाने विजय मिळविला. त्यांचा कार्यकाळ २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ पर्यंतचा होता. पद सोडल्यानंतर कलाम भारतीय व्यवस्थापन शिलॉंग, भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदौर येथे भेट देणारे प्राध्यापक झाले.

     २७ जुलै २०१५ साली "पृथ्वी सारखा जिवंत ग्रह तयार करणे " या विषयावर भारतीय इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे व्याख्यान देण्यासाठी गेले. पायऱ्यांवरून जात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते पण थोडा वेळ सभागृहात विश्रांती घेतल्यानंतर ते ठीक झाले. सायंकाळच्या सुमारास साधारण ६:३० वाजता व्याख्यान देत असताना ते खाली कोसळले त्यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले . ७:४५ वाजता त्यांच्या नाडी किंवा जीवनाची इतर चिन्हे दिसली नाहीत , हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांच्या तीन सेवा प्रमुखांनी कलामांच्या शरीरावर पुष्पहार दिला आणि त्यांचे पार्थिव शरीर 10 राजपथ मार्ग येथे दिल्लीच्या निवासस्थानी नेण्यात आले; तेथे अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

     अब्दुल कलाम यांचे जीवन खरच कष्टदायक होते असे असले तरीही त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही , नम्रता -जिद्द -चिकाटी अंगी असल्यामुळे त्यांनी जीवनात येईल त्या संकटांवर मात केली. शिकण्याची परिस्थिती नसताना देखील यशाचा शिखर गाठला अशी फार थोडेच माणसे पाहायला मिळतात ज्यांचं नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरात कोरली जातात , भारताला प्रगती पथावर नेणाऱ्या ध्येय वेड्या - मूर्ती लहान पण  कीर्ती महान असनाऱ्या महान व्यक्ती डॉ अब्दुल कलाम यांना शतशः नमन .

गौरव :

१) डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस " जागतिक विद्यार्थी दिवस " म्हणून पाळला जातो.

२) १९८१ साली अब्दुल कलाम यांना पद्मभूषण , १९९० साली पद्मविभूषण तर १९९८ साली भारतरत्न देऊन गौरवण्यात आले.

डॉ अब्दुल कलाम यांनी लिहलेली पुस्तके :

१) 'इंडिया - माय-ड्रीम'

२) विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र).

३) 'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम'

४) सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)

५) इग्नायटेड माइंड्स : अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया


डॉ अब्दुल कलाम यांनी जगाला दिलेले काही अनमोल विचार :

१) स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.

२) यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.

३) एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.

४) जर आपण सूर्याप्रमाणे चमकू इच्छित असाल तर प्रथम सूर्याप्रमाणे जळा.

५) आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.

               अशा या महामानवाला त्यांच्या जयंती निमित खासमराठी परिवारातर्फे मानाची आदरांजली !

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने