Intersteller Movie Review || Movie Review
Intersteller अप्रतिम चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट म्हणजे Time Travel शी निगडित आहे. या चित्रपटाची मांडणी ज्याप्रकारे केली आहे त्यासाठी निर्मात्याचे कौतुकच करायला हवं . Intersteller movie ला IMDB वर १० पैकी ८.६ चे रेटिंग असून गुगल च्या अहवालानुसार जेवढे लोक हा चित्रपट पाहतात त्यापैकी ९५% लोकांना हा चित्रपट आवडतो. भारतामध्ये ७ नोव्हेंबर २०१४ साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६७. ७५ करोड USD कमावले. या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन आहेत तसेच हा चित्रपट Adventure , Drama , Sci - Fi प्रकारात मोडतो. Intersteller हा चित्रपट ऑस्कर विजेता असून आता पर्यंत ४३ दुसरे अवॉर्ड्स आणि १४७ नामांकने मिळवली आहेत.
![]() |
Intersteller Movie Review || Movie Review |
लहानपणापासूनच कॉसमॉस, युनिव्हर्स, स्पेस etc. विषय खूप आवडायचे. शाळेत असताना डिस्कवरी वर स्टीफन हॉकिंग च्या into the universe, grand design किंवा space week, how the universe works इ. डॉक्युमेंट्री सीरिज पाहूनच भारी वाटायचं. Galexian असल्याची फिलिंग यायची 😛.
नंतर ख्रिस्तोफर नोलन चा interstellar (2014) याबद्दल ऐकलं, मुळी interstellar म्हणजे " तारामंडळ " मग आपल्या आवडीचा विषय. भारी-भारी रिव्ह्यूज पाहिले पण पिक्चर फक्त इंग्लिश मध्ये असल्याने आजवर पाहणे झाले नाही 😛.
पण सर्वांना ठाऊक आहे ख्रिस्तोफर सरांचा फंडा आहे big.. bigger... biggest....❤️ बॅटमॅन triology, inception, man of steel सारख्या अवाढव्य आणि शानदार movies पाहून खरंच रहावलं नाही. त्यांची प्रत्येक फिल्म म्हणजे टेक्नॉलॉजी आणि स्टोरी याचं परफेक्ट ब्लेंड , मग inception मधील स्वप्नाच्या स्वप्नातील स्वप्न असो, अथवा The dark knight मधील जोकर चे डायलॉग्ज तर ❤️❤️❤️.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या 10 मिनटात च Cinematography आणि locations अगदी प्रेमात पाडायला लावतात. एक अशी पृथ्वी ज्यावर मनुष्य राहू शकणार नाही असं वातावरण, मग मनुष्य आणि इतर जीवनाचं अस्तित्व वाचवण्या साठी घेतलेला नव्या ग्रहाचा शोध म्हणजे interstellar.. या शोधाचा भाग , नासाचा पूर्व पायलेट कूपर, आणि त्यासोबत एनी यांच्या एका लांब हटके आणि अपरिचीत जगाच्या प्रवासात हा चित्रपट घेऊन जातो.
कूपर व त्याची मुलगी मर्फ या दोघांच्या भूमिका विशेष लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत च पण चित्रपटात दाखवण्यात येणारे एकेक सीन यांना भव्य आणि समृद्ध अश्या दोन शब्दांत व्यक्त करता येईल. स्टोरी मध्ये सिनेमातील कॅरेक्टर बिल्डअप, ट्विस्ट, व नोलन स्पेशल extraordinary क्लायमॅक्स विशेष आवडला.
Interstellar पहावा का ? ... का पहावा ?...
पहिली गोष्ट म्हणजे चित्रपट हिंदी मध्ये नाही, तर subtitles चा वापर करून किवा इंग्लिश मध्येच तुम्ही हा चित्रपट पाहू शकाल. मुळात हा चित्रपट एक विजुअल स्टोरी टेलर प्रमाणे असल्यामुळे चित्रपट समजण्यासाठी तुम्हाला सर्व डायलॉग्ज समजणे हे गरजेचे नसले तरीही चित्रपटात काही तथ्य, भौगोलिक व गणितीय गोष्टी डोक्यावरून जाऊ शकतात, अर्थातच नोलन यांचा सिनेमा आहे राव. त्यांनी या चित्रपटात देखील आपला डार्क टच ठेवलेला जाणवून येतो. VFX , Cinematography , background Score सगळं उत्कृष्ट... म्हणून शक्यतो हा मास्टरपीस चुकवू नका.
मित्र आणि मैत्रिणींनो आपण Intersteller movie review पहिला . पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या चित्रपटावर तुम्हाला रिव्हिव्यू वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!
Learned a lot of new things in this post. This post gives a piece of excellent information.
ReplyDeleteFilm Institute in Chennai
Acting School in Chennai
Weekend Acting Classes in Chennai
film making courses in chennai
Film Direction Course in Chennai
Part Time Film Direction Course in Chennai
Film Institute Chennai
Acting Course in Chennai
Best Film Institute in Chennai
Film College in Chennai
film editing courses in chennai
cinematography courses in chennai
part time film editing courses in chennai
video editing course in chennai
cinematography courses in chennai
videography courses in chennai
Post a Comment