Government Job ची संधी ! Indian Railway च्या 35 हजार जागांसाठी भरती || Marathi news


          कोरोना संकटकाळात (Coronavirus) बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या तरुणांना (Government Jobs) सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आरआरबी एनटीपीसी २०२० भरती (RRB NTPC 2020 Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत (Indian Railway)रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त (35208 Vacancy) जागा भरण्यात येणार आहेत.
Government Job ची संधी ! Indian Railway च्या 35 हजार जागांसाठी भरती || Marathi news
Government Job ची संधी ! Indian Railway च्या 35 हजार जागांसाठी भरती || Marathi news

          कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus) काहींना कमी पगारात नोकरी करावी लागत आहे. तर अनेकांनी त्यांची नोकरी गमावली आहे. काहीजण तर अद्याप बिना पगारी काम करत आहेत. दरम्यान अशावेळी सरकारी नोकरीची (Government Jobs) अपेक्षा अनेकांना लागून असते. भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) सरकारी नोकरीची सुवर्णसंधी देण्यात येत आहे. रोजगाराची ही महत्त्वाची संधी उपलब्ध करण्यात येत आहे. आरआरबी एनटीपीसी 2020 अंतर्गत ही नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही संधी पदवीधर असणाऱ्या आणि नसणाऱ्याही तरुणांसाठी आहे. (khasmarathi Majhi naukri)


          ३५ हजार २०८ जागांसाठी रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी ची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील पदवीधर तरुणांसाठी २४ हजार ६०५ जागा तर उर्वरित १० हजार ६०३ जागा या नॉन पदवीधर तरुणांसाठी आहेत. (RRB NTPC 2020 Bharati) आरआरबी एनटीपीसी २०२० परीक्षा घेण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाने EXAM Counducting Agency (ECA) ची नियुक्ती केली असून मूलभूत वेतनाव्यतिरिक्त इतर भत्ते आणि फायदेही या नोकरीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. हे भत्ते ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झाली आहे त्या श्रेणीनुसार देण्यात येईल. यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे (HRA) परिवहन भत्ता (Transport) पेन्शन योजना (Pension) वैद्यकीय फायदे, इतर विशेष भत्तादेखील लागू असणार आहे. (Indian Railway Recruitment 2020) 


कोणत्या जागांसाठी भरती ?


          आरआरबी एनआरपीसी (RRB NTPC 2020 Bharati) विभागातील क्लार्क कम टायपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टायपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अ‍ॅप्रेंटिस आणि स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा (Online Exam) रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते.(Khasmarathi.com)


➤ हे वाचा - SSB सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती


◾ शैक्षणिक पात्रता

           कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

 वयोमर्यादा: 

          सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे ; ओबीसीसाठी 18 ते 36 वर्षे आहे आणि अनुसूचित जाती/जमातीसाठी १८ ते ३८ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.


➤ हे वाचा - MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा मुलाखत तयारी कशी कराल



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने