फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ? | Marathi Special || खास मराठी 


फेवीक्वीक (Fevikwik) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ? | खासमराठी
फेवीक्वीक (Fevikwik) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ? | खासमराठी 

          मित्रमैत्रिणींनो फेवीक्वीक ( Fevi kwik )  किंवा फेविकॉल आणि कोणताही गम असो तो त्याच्या बाटलीच्या आतील भागास का नाही चिटकत बरं ? पडला ना विचारात . या आर्टिकल मध्ये आम्ही याच उत्तर तुम्हाला सांगणार आहोत . तर मित्रांनो पहिला आपण जाणून घेऊ कि  फेवीक्वीक ( Fevi kwik ) कशाचे बनलेले असते , फेवीक्वीक ( fevikwik ) हे सायनो अक्रिलेट्स जो खूप तेजीने चिटकनारा कंपौंड आहे  त्यापासून बनलेला आहे. जे खूप साऱ्या इंडस्ट्रीज , फॅक्टरीज , मेडिकल क्षेत्रामध्ये उपयोग केला जातो. आता विचार करण्यासारखी हि गोष्ट आहे कि हे कंपौंड इतकं तेजीने चिटकत असेल तर ते समाविष्ट असलेल्या बाटलीच्या आतील भागास का नाही चिटकत ? तर मित्रानो त्याच असं आहे कि ते चिटकत नाही कारण फेवीक्वीक ( Fevi kwik ) मध्ये सायनो अक्रिलेट्स पॉलिमर असते आणि ते कार्बन च्या सॉल्व्हन्ट मध्ये समाविष्ट असते . जेव्हा कार्बनच्या सॉल्व्हन्टचे बाष्पीभवन होते तेव्हा ते ज्या भागावर पडले त्या भागावर चिटकून जातात , पण जेव्हा हे कार्बनचे सॉल्व्हन्ट बाटलीच्या आत मध्ये बंद असते तेव्हा हवेच्या संपर्कात नाही येत आणि कार्बनचे सॉल्व्हन्टचे बाष्पीभवन होत नाही . आपण एखादी गोष्ट चिटकवण्यासाठी बाटली उघडून त्या भागावर फेवीक्वीक ( Fevi kwik ) लावतो , काही वेळाने मात्र कार्बन सॉल्व्हन्टचे बाष्पीभवन होते आणि ते त्या भागावर चिटकून जातात .


         तुटलेल्या वस्तू जोडताना किंवा मोठे बॅनर / फ्लेक्स पेस्टींग करताना काही वेळेस फेवीक्वीक
( Fevi kwik ) हाताला चिटकण्याची संभावना असते आणि ते थोड्या फार प्रमाणात चिटकतेही अशा वेळी समजत नाही कि ते कशा पद्धतीने हाताच्या तळव्यावरून किंवा अन्य अवयवांवरून कसे घालवायचे . ते इतके सहजा सहजी हातावरून जात नाही त्यासाठी  उपयुक्त ठरते ते थिनेर . थिनेर हे देखील एक प्रकारचे सॉल्व्हन्ट आहे त्याचा वापर ऑइल पेंट ला विरळ ( थिन ) करण्यासाठी केला जातो, आता हे थिनेर आपल्या उपयोगी पडते. हाताच्या तळव्याला लागलेल्या फेवीक्वीक ( Fevi kwik ) वर थिनेर ने चोळावे शक्य असल्यास थिनेर मध्ये बुडवावे व ते हळू हळू निघून जाईल. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कि थिनेर चा आपल्या त्वचेवर कोणताच परिणाम होत नाही पण डोळ्यात किंवा नाजूक भागात  ( Fevi kwik ) गेले असल्यास थिनेर चा वापर करु नये.

फेवीक्वीक (Fevikwik) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ? | खासमराठी
फेवीक्वीक (Fevikwik) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ? | खासमराठी 

        जर फेवीक्वीक ( Fevi kwik ) डोळ्यात गेले असेल तर आणि पापण्या चिटकल्या गेल्या असतील तर जबरदस्तीने डोळा उघडण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्यास डोळ्याला इजा होण्याची समभावना असते. अशावेळी तुम्ही तुमचा डोळा गार पाण्याने चार पाच वेळा धुवा असे केल्याने बॉन्डिंग कमी होईल , शक्यतो अशा वेळी तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील असे काहीतरी करा त्यामुळे डोळ्याच्या पापण्या जवळचे बॉंडिंग कमी होईल आणि  चिकटलेल्या पापण्यातून फेवीक्वीक ( Fevi kwik ) निघून जाईल. जर याचा काही उपयो न झाल्यास दवाखान्यात गेले पाहिजे .


          मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले ? अशाच प्रकारची महत्वाची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवू . तुम्हाला कोणत्या विषयांवर माहिती हवी असल्यास कॉमेंट करून सांगायला विसरू नका . हे आर्टिकल तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेयर करू शकता .   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने