रामनवमी का साजरी केली जाते ? / एप्रिल २०२० रामनवमी साजरी  केली जाणार की नाही ? । Marathi Special 

रामनवमी का साजरी केली जाते ? / एप्रिल २०२० रामनवमी साजरी  केली जाणार की नाही ? । खासमराठी
रामनवमी का साजरी केली जाते ? / एप्रिल २०२० रामनवमी साजरी  केली जाणार की नाही ? । खासमराठी 

          हिंदू धर्मात रामनवमी ( Ram Navami ) हि धूम धडाक्यात आणि श्रद्धा ठेवून साजरी केली जाते . राम नवमी हिंदू धर्मात खूप मोठा पर्व आहे . चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष च्या नवव्या  तिथीला राम नवमी साजरी केली जाते , हिंदू धर्म ग्रंथ श्रीरामचरितमानस मध्ये सांगितले गेले आहे कि जगामध्ये शांती आणि धर्म स्थापनेसाठी चैत्र महिन्यात दुपारच्या वेळेस प्रभू श्री कृष्णांनी , श्री रामाचा अवतार घेतला होता . श्री रामांच्या जन्मदिवसालाच रामनवमीच्या रूपात साजरे केले जाते . रामनवमीच्या दिवशी  भारतातील विविध राज्यांमध्ये  प्रभू श्री रामांची पूजा अर्चा केली जाते , आराधना केली जाते.  या दिवसाला हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते कारण प्रभू श्री राम यांनीच हिंदू धर्माची स्थापना केली. लोकांना चांगल्या आणि सत्य मार्गावर चालण्याचा संदेश दिला तसेच आपले कर्तव्याचे कसे पालन करायचे हे त्यांनी सांगितले . जस कि सर्व जण जाणतात कि प्रभू श्री राम हे देव श्री विष्णू चे  सातवे अवतार आहेत. जे धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरले होते.


राम नामका फल है मीठा ,
कोई चखकर देख ले।
खुल जाते है भाग ,
कोई पुकार कर देख ले। 


          राम नवमीच्या दिवशी जे लोक  श्री रामाची पूजा करतात व उपवास धरतात त्यांचे केलेले सगळे पाप नष्ट होतात , हा उपवास केल्याने भक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात . भारत वर्ष च्या वेगवेगळ्या राज्यांतील लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रभू श्री रामांची पूजा करतात. जर तुम्हाला सुद्धा प्रभू श्री रामांची पूजा करायची असेल तर राम नवमीच्या दिवशी पहाटे स्नान करून भक्ती भावाने  प्रभू श्री राम आणि श्री हनुमान यांची  पूजा केली पाहिजे. तुम्हाला श्री रामांची कथा किंवा आरती व हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालीस वाचली पाहिजे.  असं मानलं जात कि या दिवशी केलेला उपवासाने व श्रद्धापूर्वक केलेल्या पूजेने मानवाच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात . मनाला शांती भेटते आणि सर्व परिवार आनंदमय होऊन जातो.


          पृथीवर अधर्माचा नाश आणि धर्माचा विजय करण्यासाठी प्रभू राम पृथीवर अवतरले असे म्हणतात. रामनवमीच्या दिवशी दुपारच्या वेळेस ( १२ वाजता ) राम जन्माचा सोहळा साजरा करण्यात येतो . प्रभू श्री रामांची पूजा करताना ,त्यांच्या मूर्तीस हार घातले जातात तसेच साखरेची माळ हि घालतात. गंध लावतात , हळद कुंकू वाहतात . प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला चमेली, चंपा, केवडा अन् जाई ही फुले वाहन्यात येतात .  त्यानंतर आरती करण्यात येते व त्यानंतर  प्रसाद वाटप करण्यात येतो . प्रभू श्री रामजन्माच्या दिवशी साजर्‍या करण्यात येणाऱ्या उत्सव सोहळ्या रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो तसेच यादिवशी लोक माओ कामनेने उपवास धरतात. दानशूर व दानधर्म करणाऱ्या व्यक्ती या दिवशी गरीब व गरजू लोकांना दान  देतात तसेच मंदिरास निधी देतात. हिंदू धर्मात दान धर्माला खूप महत्त्व दिले गेले आहे . असे म्हणतात कि या दिवशी दान करणाऱ्या व्यक्तीस कधीच कमतरता भासत नाही . ते धन धान्याने समृद्ध होतात. त्यामुळे या दिवशी थोडे फार दान नक्कीच केले पाहिजे.

रामनवमी का साजरी केली जाते ? / एप्रिल २०२० रामनवमी साजरी  केली जाणार की नाही ? । खासमराठी
रामनवमी का साजरी केली जाते ? / एप्रिल २०२० रामनवमी साजरी  केली जाणार की नाही ? । खासमराठी 

          ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालसारख्या पूर्वेकडील राज्यांमध्ये, जगन्नाथ मंदिरे आणि प्रादेशिक वैष्णव समुदाय रामा नवमी साजरा करतात आणि उन्हाळ्यात वार्षिक जगन्नाथ रथ यात्रेची तयारी सुरू झाल्यावर हा दिवस मानला जातो. रामनवमीच्या दिवशी मठ तसेच मंदिरात श्री राम आरती  , राम नामाचा जप, भजन व कीर्तन , प्रवचन व राम नवमीच्या दिवसाचे महात्म सांगण्यात येते. ते करत असताना राम भक्त प्रभूंच्या भक्तीमध्ये रंगून जातात. ग्रंथाचे वाचन, राम गीत, रामायणाचे गायन ,रामकथेचे निवेदन असे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लहान मुले, महिला वर्ग, तरुण व वृद्ध लोक या कार्यक्रमात सहभागी होतात .

२ एप्रिल २०२० , राम नवमी आणि  कोरोना व्हायरस  


          जसे कि सर्वाना माहित आहे कि भारतातच नव्हे संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार  माजवला आहे. भारतातील सरकारने संपूर्ण भारतभर लोकडाऊनचे आदेश दिले आहेत. लोकांना बाहेर फिरण्यास मनाई आहे ( संचार बंदी )  तसेच जमाव बंदी हि केली आहे आता हा प्रश्न पडतो कि असे असताना राम नवमी साजरी कशी करता येणार ? अथवा या वर्षी रामनवमी साजरी करता येणार नाही ? असे प्रश्न उद्भवत आहेत. सांगायचं झालं तर २०२० या साल ची राम नवमी साजरी करता येणार नाही .


          भारत सरकारने १४४ कलाम लागू केल्याने लोक कुठे हि एकत्रित येऊ शकत नाहीत , तसेच जमाव बनवून पूजा पठण करू शकणार नाहीत , धार्मिक आणि  पवित्र  ठिकाणांना बंदीचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे भारतातील राम भक्तांचे ,मने दुखावली असतील पण हा सर्व सामंजस्याचा भाग आहे , भारतातील सर्व भक्तांनी देशातील परस्तिथी समजून घेतली पाहिजे. कोरोना व्हायरस च्या संक्रमणाचा सर्वांना धोका आहे. भारत सरकारच्या नियमांचे पालन करणे हे आपल्या जिवासाठीच गरजेचे आहे.


          मित्र आणि मैत्रिणींनो या आर्टिकल मध्ये राम नवमी का साजरी केली जाते हे सांगितले. हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले याचा अभिप्राय तुम्ही कमेंट  करून सांगू शकता तसेच आणखी कोणत्या हि  विषयावर तुम्हाला माहिती हवी असल्यास सांगायला विसरू नका . आम्ही तुम्हाला त्या विषयाची माहिती नक्कीच पुरवू . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने