April Fools Day Pranks || Corona Virus || Marathi news 


पुणे     जर आपण देखील April fools day म्हणजेच 1 एप्रिल रोजी खोड्या खेळत असाल तर सावधगिरी बाळगा कारण यावेळी आपल्याला हे करणे कठीण जाऊ  शकते. वास्तविक, Corona virus बाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा व बनावट बातमी रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. असे करताना को आढळल्यास त्याला मोठी शिक्षा होऊ शकते त्यामुळे कोणाला तरी April fools day pranks बनवणे महागात पडू शकते. देशात सध्या परिस्तिथी काय आहे याचे भान लोकांनी ठेवले पाहिजे आणि मुख्य म्हणजे पोलीस व भारतीय प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे तसेच लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.


April Fools Day Pranks || Corona Virus || Marathi news
April Fools Day Pranks || Corona Virus || Marathi news

          Lockdown दरम्यान भयभीत वातावरण निर्माण होऊ शकते, असे सांगून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी April fools day च्या दिवशी कोविड -१९ ( Corona Virus ) बद्दल कोणतीही fake news पसरवू नये, असे आवाहन केले. देशमुख यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन प्रभावी आहे. मी लोकांना आवाहन करतो की असे कोणतेही बनावट संदेश पसरवू नयेत ज्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होईल.

April Fools Day Pranks ।। Corona Virus ।। Marathi news
April Fools Day Pranks ।। Corona Virus ।। Marathi news

          मंत्री म्हणाले की, सोशल मीडियावर बनावट किंवा दिशाभूल करणार्‍या माहिती शेअर करणार्‍यांवर Maharashtra Cyber Crime सेलला कडक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवण्यासाठी आयपीसीच्या कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल, अशीही अधिसूचना पुणे पोलिसांनी दिली. या कलमान्वये 6 महिन्यांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा आणि 1000 रुपये दंड होऊ शकतो.  त्यामुळे कोणी हि April fools day हा खेळ खेळू नये. कोणी अशा नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याला वेळीच रोखा. हा खेळ खेळण्याचे प्रमाण लहान व तरुण वयाच्या मुलांमध्ये जास्त दिसून येते . पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने