शरद पवार कोकण दौऱ्यावर :नुकसानीची पाहणी व मदरशाला दिली भेट || Marathi news 


          राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 'निसर्ग' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 9 जून रोजी रायगड आणि 10 जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी तसेच शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. या चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालं आहे असं जाणकारांचं सांगणं आहे.


          राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी सकाळी मोरबा, माणगाव ,म्हसळा या गावांना भेट दिली तसेच गावकऱ्याची विचारपूस केली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतीचं मोठे नुकसान झालं आहे. थेट बांधावर जाऊन शरद पवार यांनी नुकसानाची पाहाणी केली. तसेच म्हसळा येथील मदरशाला भेट दिली व झालेल्या नुकसानीची माहिती घेतली .



        दिवेआगार, श्रीवर्धन येथे शरद पवार भेट देणार आहेत. श्रीवर्धन येथे अधिकाऱ्यांसोबत बैठकी घेणार आहेत. सायंकाळी 5 व ६ वाजता हरिहरेश्वर आणि बागमांडलामार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दापोली येथे मुक्काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे .

शरद पवार कोकण दौऱ्यावर :नुकसानीची पाहणी व मदरशाला दिली भेट || Marathi news
नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकण दौऱ्यावर : शेतकऱ्यांबरोबरच मदरशाला दिली भेट || Marathi news 

         रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे,  व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. तर  रत्नागिरी जिल्हा दौरा 10 जून रोजी असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. शरद पवारांनी महत्वाचे पाऊल उचलेले असून शेतकरी व सामान्य नागरिकांकरिता ते फायद्याचे ठरणार आहे.


          सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही , रत्नागिरी व रायगड जिल्ह्याप्रमाणे निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम गंभीर असला तरी सरकार कोकणवासीयांच्या पाठीशी कायमच उभे राहील,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे सांगून आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.





➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


🔅 हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )

२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ

3)  Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख




ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने