"भाजप व काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहेत" : मायावती || Marathi news


          देशात आपत्तीजनक स्थिती निर्माण होत आहे जसे कोरोना विषाणूने कठोररित्या ग्रासलेले आहे , त्याचे आकडे पाहता असे लक्षात येते कि काही ठिकाणी आकडे कमी होताना दिसत असले तरी काही ठिकाणी मात्र ते वाढ होताना दिसते त्यातच चक्री वादळ , टोळ धाड यांच्याशी सामना करावा लागत आहे. तसेच नेपाळ व चीन बरोबर सीमा वाद होताना दिसत आहेत. बसपा च्या मायावतींनी एक ट्विट जारी केले त्यात त्या म्हणतात. " भाजप व काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहेत . "

"भाजप व काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहेत" : मायावती || Marathi news
"भाजप व काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहेत" : मायावती || Marathi news

          बसपाच्या मायावती खडेबोल सुनावताना म्हणतात, " खरच ही मोठी दुर्दैवाची बाब आहे की कोरोना वाढत्या साथीच्या आजारामुळे जेव्हा देशातील लोक संकटात /तणावात आहेत, विशेषतः भाजपा आणि कॉंग्रेस या काळातच घाणेरडे राजकारण करीत आहेत आणि आता चीनशी सीमेवरील वादाचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे , जे राष्ट्रीय हितासाठी योग्य नाही."


          भारतात काही ठिकाणी चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्यात येत आहे तसेच त्याचे पडसात ट्विटर व फेसबुक सारख्या सोसिअल मीडियावर उमटताना दिसत आहेत . सोनम वांगचुक सारख्या नामवंत व्यक्तीनीही आता चीनच्या मालावर बहिष्कार टाकून स्वदेशी माल घेण्यावर भर द्यावा असे जनतेला सूचित केले .


          "चीनबरोबरच इतर शेजारच्या नेपाळबरोबरचा सीमा विवाद आता खूप गंभीर रूप धारण करीत आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी देशाच्या राजकारणापेक्षा वरचढ विचार करुन देशहितासाठी उठले पाहिजे. तसेच अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वांना विश्वासात घेतलं तर बरं होईल." अशी प्रतिक्रिया मायावतींनी त्यांच्या ट्विटर हँड्लर वरून व्यक्त केली.





➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


🔅 हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )

२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ

3)  Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख




ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने