महाराष्ट्रातले 'डिसीजन मेकर' आम्ही नाही : राहुल गांधी || Marathi news


नवी दिल्ली :


          Corona Virus आणि देशात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना Rahul gandhi  यांनी Maharashtra च्या राजकीय राजकारणात खळबळ उडवून दिली." आमचा महाराष्ट्र सरकारला पाठिंबा आहे. आम्ही तेथील 'डिसीजन मेकर' ( Decision maker ) नाही," असे राहुल गांधी यांनी वक्तव्य केले आहे.


         काही काळापूर्वीच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या अशाच प्रकारच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात, ‘मी मंत्रिमंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे,’ असे चव्हान यांनी म्हटले होते.

महाराष्ट्रातले 'डिसीजन मेकर' आम्ही नाही : राहुल गांधी || Marathi news
महाराष्ट्रातले 'डिसीजन मेकर' आम्ही नाही : राहुल गांधी || Marathi news

         एका पत्रकाराने महाराष्ट्रातील सध्यस्थितीचा उल्लेख करत राहुल गांधी यांना प्रश्न विचारला होता, की देशातील एक तृतियांश कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. तेथील सरकारमध्ये तुमचा सहभाग असून मुंबईत महाराष्ट्राच्या आर्ध्याहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रानेही राज्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते का? कारण तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही चर्चा सुरू झाली आहे.


         या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या मोस्ट कनेक्टेड देशातील शहरांमध्येच कोरोना वाढत आहे, असे आपल्याला दिसून येईल. मी आपल्याला सांगू इच्छितो, की आम्ही महाराष्ट्रातील 'डिसिजन मेकर' नाही ,आमचा महाराष्ट्र सरकारला पाठिंबा आहे. मात्र,  आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान आणि पदुच्चेरी येथे डिसिजन मेकर आहोत. हाच फरक आहे सरकार चालवण्यातला आणि सरकारला पाठींबा देण्यातला तर , महाराष्ट्र त्याच्या कनेक्टिव्हिटीमुळे संघर्ष करत आहे. 


          मुंबई देशातील एक आर्थिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईला पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करायला हवे. मला जाणीव आहे, की महाराष्ट्र एक अत्यंत कठीन लढाई लढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण तागदीनिशी सहकार्य करणे आवश्यक आहे."


आम्ही काय करत आहोत :


          काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार गोरगरिबांना पैसे आणि भोजन पुरवत आहे. आम्हाला माहिती आहे, की पुढे काय करायला हवे. पण राज्ये किती काळ एकटेच लढाई लढतील त्यामुळे केंद्रसरकारला पुढे यावे लागेल व नियोजनासंदर्भात देशाशी बोलाने करावे  लागेल.


सरकार पुढे काय करेल ? 


          नरेंद्र मोदी म्हणाले होते, की आपण 21 दिवसांत कोरोना विषाणूंवर मात करू, मात्र आता 60 दिवस झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग भयानकरित्या वाढतच चालला आहे तरी परिस्तिथी चिंताजनक बनली आहे. अशात कोरोनाच्या वाढत्या स्वरूपात लॉकडाउनही काढला जात आहे. लॉकडाउनचा हेतू पूर्णपणे फेल गेला आहे. आता सरकार पुढे काय उपाय योजना आखणार ? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला.➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  असे शूज ज्यांची किंमत ऐकून डोळे चक्रावतील... !! 


२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ


        ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने