Tiktok आणि आपण सर्व..... वैचारिक || खासमराठी  


     एकीकडे YouTubers ला जनतेने प्रचंड आधार दिला तर Tiktok - कमीत कमी कालावधीत अनेक भारतीयांना प्रचंड वेड लावलेल्या या अँप ची रेटिंग गेल्या काही दिवसात कमालीची घसरली !

      याची दोन मुख्य कारणे आहेत :-

१ . युट्युबर विरुद्ध टिकटोकर्स

२ . चीन विरुद्ध भारतीय


Tiktok आणि आपण सर्व..... वैचारिक || खासमराठी
Tiktok आणि आपण सर्व..... वैचारिक || खासमराठी

१. टिकटोकर विरुद्ध युट्युबर


      जसा टिकटॉक एक प्लॅटफॉर्म आहे अगदी तसाच युट्युब सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे...... लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी मेहनत घ्यावीच लागते...!!

        लाखोंच्या गर्दीत उठून दिसण्यासाठी काही न काही नवीन, काहीतरी वेगळं करावं लागतं..!

     यात वाद लागला होता तो युट्युबर , टिकटोकर्स आणि मीम बनवणाऱ्या लोकांचा...!

   तुमची उत्सुकता आणि कूतुहुल हेच असेल की खासमराठी कोणाची बाजू घेईल? होय ना...!  तर आधीच सांगतोत, की खासमराठी हा प्लॅटफॉर्म आम्ही मराठी भाषेपेक्षा जास्ती मराठी तरुण मित्रांसाठी तयार केला आहे!


  या वादात सुद्धा आमचं लक्ष त्यांच्याकडेच होतं आणि कमालीची गोष्ट माहिती आहे काय आहे? यात सुद्धा मराठी जनता फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून सर्वांसाठीच उपलब्ध आहे...! टाळ्या वाजवत वाहवा करत आणि कार्यकर्त्यांसारखं एकमेकांसोबत एकमेकांना घेऊन भांडत वेळ घालवत .... त्यांनाच वेगळी दिशा देण्यासाठी हा एक लेखनप्रपंच आणि अनेकांचा रोष पत्करून देखील सत्यस्थिती मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न..!
 
      तुम्ही सुद्धा नीट बघा....!!

    या प्रचंड लोकप्रियता आणि पैसा मिळवून देणाऱ्या वादात मराठी  माणूस उभा कुठे आहे माहिती आहे का?? तो बघा एकदम त्या कोपऱ्यात..... राजकीय कार्यकर्त्या सारखा एकमेकांची आई .....बहीण लिंग .....जात... बाहेर काढत थांबला आहे...! ते तिकडे दोघे जण बघा फेसबुक वर सांगत आहेत टिकटॉक उडवून टाक .. तो बघा दुसरा एकाला सिक्सर म्हणून ट्रोल करत आहे.... तो बघा आमचा कंटेंट creator कसा भारी तुमचा कसा गेलेला आहे यावर भाषण देत आहे , जनमत तयार करत आहे!!

      इकडे गर्दी कसली आहे रे?? अरेच्चा...!!

       हे बघ अर्धे टिकटॉक च्या बाजूने थांबलेत तर अर्धे युट्युब च्या बाजूने... कुठून तरी खासमराठी आपल्या मराठी मित्रांना विचारत आहे....  अरे भावांनो पण त्या दोघांपैकी पैकी किती जण तुमच्या बाजूने आहेत रे?

    त्यांना खरच तुमच्याशी काहीतरी देणं घेणं आहे का? तुम्ही किती दिवस अजून मोठ्या हुशार नेत्यांचे मूर्ख कार्यकर्तेच बनून राहणार आहात रे?
 
      उठा मित्रांनो जागे व्हा....! निवडणूक होत आहे नेते खुष आहेत त्यांचा पैसा वाढवत आहेत आणि इतकी मेहनत करून त्यांची लोकप्रियता फक्त तुम्हीच वाढवत आहात......!!


   किती दिवस अजून असंच सगळं करणार आहात?? तुम्हाला नाही का वाटत कधी यात आपला माणूस सुद्धा असला पाहिजे?? आपल्यासाठी पण इतक्या लोकांनी असं न सांगता काम केलं पाहिजे??
 
      शिवछत्रपती, शाहू महाराज, बी. आर. आंबेडकर , बाजीराव पेशवा यांनी आपल्याला नेतृत्व शिकवलं आहे की फक्त जाईल तिथे कार्यकर्ता च बनायचं??

      तुम्ही ज्यांच्या साठी इतके भांडत आहात त्यांची आणि तुमची कमाई एकदा तरी तपासून नक्की बघाच....!!

      असो... मीमर्स सारखी वृत्ती ठेवा सर्व गोष्टी मध्ये आनंद हास्य शोधण्याची.... मात्र टिक टॉक आणि youtube च्या वादापेक्षा स्वतःला स्वतःच्या वेळेला जास्ती महत्त्व द्या इतकच!!!

  आता दुसरी बाजू बघा.....!!


२. चीन विरुद्ध भारतीय


    बारकाईने अभ्यास केल्यास अनेक लोकांना खासकरून मराठी मित्रांना हे समजायला हवं की  खरं तर हे एक फक्त अँप्लिकेशन आहे! संपूर्ण चीन नव्हे ...! जर तुमचा खरच चीन ला सरळ विरोध आहे तर आधी जा आणि अभ्यास करून या की तंत्रज्ञान असो की कोणतीही व्यावसायिक बाजारपेठ , भारतातील किती टक्के व्यवसाय चीन च्या आधाराशिवाय टिकाव धरू शकतात?

   तरी देखील चीनचा विरोध समजण्या सारखा नक्की आहेच... मात्र या ऍप च्या विरोधात तुम्ही जे काही करत आहात खासकरून मराठी भारतीय मित्र....ते एक तर त्यांनाच समजण्यापलीकडे आहे अथवा शुद्ध मूर्खपणा आहे!

      तुम्ही दिलेल्या रेटिंग चा त्यांना फरक पडत असेल असं वाटत असेल तर तो आपला एक शुद्ध गैरसमज आहे!

     नीट समजून घ्या की टिकटॉक ला तुम्ही दिलेले रिव्हिव फक्त प्ले स्टोअर वर आहेत.... इतर ठिकाणी त्यांची रेटिंग कमी होईल का?
   
     बर जितकी मेहनत घेऊन त्यांचा धंदा बंद पाडण्यासाठी झटत आहात ती आज न उद्या गूगल प्ले स्टोअर नक्की जाणून घेईलच!!

    एक दिवस हे सगळे रिव्हिव देणारे लोकं, त्यांचे खोटे रेटिंग आणि रिव्हिव नक्की उडवून टाकेलच!!

     टिकटॉक ला अनेक व्यावसायिक देखील विरोध करत आहेत... मला तरी असं जाणवलं की, त्यांनी जे यश भारतात मिळवलं आहे ते अनेकांच्या नजरेत बोचेल असंच आहे...त्यामुळे जाणून बुजून काहीच तथ्य नसताना, व्यावसायिक देखील याला विरोध करत आहेत!

    अनेक पोस्ट जणू पैसे देऊन व्यवस्थित  तयार  करायला लावून share केल्या गेलेल्या वाटल्या! ज्यात एका पोस्ट मध्ये सांगितलं होतं की, अँप ची रेटिंग कमी करा अँ प अनइंस्टॉल करा चीन च्या 100 लोकांचा रोजगार जाईल....

       मित्रांनो कोणताही अस्सल व्यावसायिक सूज्ञ व्यक्ती इतर कोणाचा धंदा बंद करून स्वतः मोठं होणं पसंद कधीच करणार नाही...!
 
        असो, जर चीनचा विरोध असेल तर घरातील कित्येक चिनी वस्तू का वापरताय? कोणीतरी पोस्ट केली होती ती देखील तथ्यपूर्ण होती ... चीनचे मोबाईल का वापरता?

   खासमराठी न टिकटोक ला समर्थन करत आहे ना विरोध खासमराठीचं सांगणं इतकंच आहे की तुम्ही जितकी मेहनत यांना पाडण्यासाठी करत आहात त्यापेक्षाही जास्त मेहनत घेऊन त्यांना प्रतिस्पर्धक म्हणून उभे रहा...!


       जितका वेळ तुम्ही चीनी ऍप्स वापरून घालवत आहात, त्यांची रेटिंग स्वतः आणि इतरांना सुद्धा कमी करण्यासाठी सांगत आहात लिहित आहात तितक्या वेळात स्वतः एखादा भारतीय अँप तयार करण्यासाठी खर्च करा....!

       तेव्हा तुम्हाला समजेल की इतकं यशस्वी व्हायला सुद्धा त्यांना किती मेहनत घ्यावी लागली

मित्रांनो, इतरांच्या वादात पडून तुमचा अमूल्य कधीच परत न येणारा  वेळ वाया घालवू नका...!

       थोडक्यातच सांगायच झालंच तर .... युट्युबर असतील टिकटॉकर असतील .....
   
    खरच, तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल तर नक्कीच त्यांचा वापर करा.... त्यांच्याकडून वापरले जाऊ नका...! 


तळटीप :- कोणाच्याही भावना अथवा मन दुखावण्याचं, धाडस आमच्याकडून  कधीच होणार नाही... आम्ही मराठी लोकांना जास्तीत जास्त चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत होतो आहोत आणि राहू!


सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे.


लेखन - श्री. सुकेश संजय जानवळकर. ( SJ )


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ? 

२)  पोलीसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच का असतो ? 


         ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने