Alibaba Owner Jack Ma यांचे गाजलेले Speech  || वैचारिक || खासमराठी 


          मित्र मैत्रिणींनो माणसाने आपल्या चुकीतूनच मार्ग काढत शिकायचं असत. तसेच ध्येय गाठताना स्वतःच आत्म परीक्षण करत राहावं . अनेक असे उद्योगक आहेत त्यांनी यशाची शिखरे पार करताना खूप सारी अयशस्वी वर्षे खर्ची घातली आहेत. त्यांना हे यश सहजा सहजी नाही मिळाले. अशीच काहीशी कहाणी " जॅक मा " alibaba owner Jack ma  यांच्या विषयी पाहायला मिळते तर मित्रानो या लेखात आपण जॅक मा यांचे अनमोल विचार व सुप्रसिद्ध भाषण jack ma speech अनुवाद मराठी मध्ये केला आहे ते पाहणार आहेत. चला तर मग पाहू ते काय म्हणतात

Alibaba Owner Jack Ma यांचे गाजलेले Speech  || वैचारिक || खासमराठी
Alibaba Owner Jack Ma यांचे गाजलेले Speech  || वैचारिक || खासमराठी 


          माझे वडील श्रीमंत नव्हते. विद्यापीठासाठी मी तीनदा प्रयत्न केले. तीनही वेला अयशस्वी. मी हार्वर्ड यूनिवर्सिटीसाठी दहा वेळा अर्ज केला. प्रत्येक वेळी नकारच भेटला. ते मला पाहू देखील इच्छित नव्हते. शेवटच्या वेळी, मी शिक्षकांच्या महाविद्यालयात गेलो, जे नोकरी करण्यासाठी आमच्या शहरात 3rd किंवा 4th क्लास समजलं जायचं! मी नोकरीसाठी अर्ज केले 30 वेळा नकारच मिळाला. तो माझ्यासाठी अतिशय कठीण काळ होता. त्या वेळी मी खूप निराश होतो कारण मी विद्यापीठात शिकवायचो. माझे वेतन दरमहा दहा डॉलर्स होते.  कारण की मला चांगली नोकरी मिळत नव्हती.


          1994 मध्ये जेव्हा मी चर्चा केली की, “मी “इंटरनेट” असे काहीतरी करणार आहे आणि २३ जणांनी त्याला साफ साफ विरोध दर्शविला. ते म्हणाले - "ही एकदम बावळट कल्पना आहे, आपण कधीही इंटरनेटबद्दल काहीही ऐकलेले नाही आणि तुला तर संगणकांबद्दल काहीच माहिती नाही”आणि हो, मी कधीही विचार केला नाही की मी स्मार्ट आहे. कोणालाच साधा विश्वास देखील नव्हता की मी कधी यशस्वी होईल.कारण त्यावेळी प्रत्येकाचं हेच मत होतं की - "हा माणूस उगीच वेगळा विचार करतो, एकदम वेड्यासारखा. अशा कल्पना शोधतो ज्या कधीच काम करणार नाहीत!”


         मी तीन हजार डॉलर्स बैंकेतून कर्जाऊ घेण्याचा प्रयत्न केला 3 महिने गेले पण मला ते अजूनही मिळाले नाहीच.आम्ही 30 ते  40 उद्योजक भांडवलदारांकडे गेलो त्यांना बोललो. ते सगळे म्हणाले -  “नाही ..... हे विसर!” भरपूर लोक म्हणाले – “अलीबाबा एक भयंकर मॉडेल आहे”जसे मी म्हणालो - "मला यावर विश्वास आहे. मला नेहमी वाटायचं की ही गोष्ट मोठी होऊ शकते."मी कधीच विचार केला नव्हता की ती इतकी मोठी होईल.पण मला विश्वास होता की, काहीतरी तिथे माझी वाट बघतय आणि मला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम घ्याला हवेत .


          तो सर्वात कठीण अनुभव होता. तर आम्ही 18 संस्थापकांकडून 50,000 डॉलर्स गोळा केले. आम्ही सुरुवात केली. पहिल्या तीन वर्षात, आमची एकही $ 1 कमाई/नफा नव्हता. ते सोपे नव्हते. पण तरीही याने आम्हाला पुढे का नेलं ? कारण मला अनेक ग्राह्कांचे thanks  धन्यवाद चे emails यायचे. ते म्हणायचे – “ही खरच खुप छान गोष्ट आहे, आम्ही तुम्हाला pay करू शकत नाही पण याने आमची खुप मदत केली”
"जर तुम्ही आम्हाला मदत करत राहिलात, तर तुम्ही यशस्वी व्हाल!” आणि मी यावर विश्वास ठेवला.


          थोड्या काळातच आम्ही आमच्या व्यवसायाची थोडीशी उभारणी केली होती.थोड्या काळातच आम्ही आमच्या Infrastructure ची Ecosystem तयार केली. आणि आता सोळा वर्षांनंतर, आमच्याकडे Alibaba Group आहे , आमच्याकडे Tmall Group आहे ,आमच्याकडे Taobao Group आहे , आमच्याकडे Alipay आहे .आणि लोक म्हणतात – “तुम्ही फारच हुशार आहात, इतकी प्रचंड मोठी कंपनी तुम्ही कशी काय उभारली!”


          “बिल गेट्स, वॉरन बफेट, जॅक welch, लॅरी पेज, मार्क झुकरबर्ग , इतर लोक आणि या लोकांमधील फरक – “हे लोक भविष्याबद्दल नेहमी आशावादी असतात ! ते कधीही तक्रार करत नाहीत. ते नेहमी इतरांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपण आशावादी असतो तेव्हा नेहमी संधी उपलब्ध असते. लोक आजपण म्हणतात - "जॅक संधी कुठे आहे? माझ्याकडे नोकरी नाही. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही!”

Alibaba Owner Jack Ma यांचे गाजलेले Speech  || वैचारिक || खासमराठी
Alibaba Owner Jack Ma यांचे गाजलेले Speech  || वैचारिक || खासमराठी 

          आपण या शतकाच्या सर्वोत्तम वेळेत आहोत, आपल्याकडे सर्वात चांगली संपत्ती आहे ती म्हणजे आपण आजही तरुण आहात. तक्रार करू नका. इतर लोकांना तक्रार करू दया. संधी नेहमी तिथेच उपलब्ध असते जिथे लोक तक्रार करतात. विचार करा, की तुम्ही कशाप्रकारे बदल घडवू शकता? मी असं काही करू शकतो का जे बदल घडवेल? जेव्हा आपण याबद्दल विचार कराल, तेव्हा ते सुरू करा.


          मी बरेच लोक पाहिले आहेत, तरुण लोक प्रत्येक सायंकाली त्यांच्याकडे अनेक विलक्षण कल्पना असतात. पण सकाळी सकाळी उठून ते परत त्यांच्या ऑफिस ला परत तिथेच कामाला जातात.एक उद्योजक म्हणून, तुम्हाला इतर कोणी करण्याआधी कामे करावी लागतात. तुम्हाला इतर लोक जागे होण्याआधी उठावं लागतं. तुम्हाला इतरांपेक्षा अधिक धाडसी व्हाव लागत. तुमच्या अंतःप्रेरिताचा वापर करा! (use your Instinct!) . तुम्ही जे काही कराल ती ग्राहकाची गरज असली पाहिजे.


          प्रत्येकासाठी, कोणत्याही व्यक्तीसाठी, उद्या हा नवीन आहे. हालचाल करा. कृती करा ! गुंतवणुक दारांना विश्वास असेल अथवा नसेल. तुमच्या मित्रांचा विश्वास असेल अथवा नसेल.  तुमच्या घरच्यांना विश्वास असेल अथवा नसेल. ते महत्त्वाचं नाहिये ! तुमचा विश्वास आहे, तुमच्या टीम चा त्यावर विश्वास आहे आणि रात्रंदिवस त्यावर काम करा ! हे अशाच प्रकारे तर सगळ घडतं!


          पुरेशा चुका करा ! तुम्ही पडाल ! तुम्ही उठाल !!! कोणतीही चूक हा एक नफा आहे . उत्पन्न आहे. एक जबरदस्त महसूल आहे ! पैशांची काळजी करू नका ! पैसा माणसांकडेच येतो. लोकांनी त्यांच्या स्व्प्नांकडे वाटचाल करायला हवी ! जर तुमच्याकडे स्वप्न असेल, तर फक्त पुढे जा ! मला वाटते की कोणीही जग जिंकू शकत नाही. आपण फक्त जगाची सेवा करू शकतो. एकतर इतरांसाठी काम करा किंवा स्वत:साठी !


          मी स्वत: साठी काम करण्याचा मार्ग निवडला. स्वत: साठी काम करणे म्हणजे समाजासाठी काम करणे. जर तुम्हाला खरोखरच स्वत:साठी काम करायचे असेल, तर मग इतरांचा विचार करा. कारण फक्त, जेव्हा इतर लोक यशस्वी होतात, जेव्हा इतर लोक आनंदी होतात. तुम्ही यशस्वी व्हाल ! तुम्ही आनंदी व्हाल !


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ? 


२)  पोलीसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच का असतो ? 


         ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने