जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पुणे – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात आज दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी जागतिक पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रा.से.यो. विभागाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाली. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून ‘शिववंदना’ सादर करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी वर्गखोलीत प्रवेश करून मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून पर्यटनाचे महत्त्व, सांस्कृतिक वारसा संवर्धनाची गरज व आजच्या पिढीची जबाबदारी या विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी पर्यटन हा केवळ प्रवास नसून तो इतिहास, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी UNESCO च्या यादीत नव्याने समाविष्ट झालेल्या किल्ल्यांवर प्रभावी सादरीकरण (Presentation) केले. किल्ल्यांचा इतिहास, वास्तुशैली आणि जागतिक पातळीवरील त्यांचे महत्त्व यांचा अभ्यासपूर्ण आढावा त्यांनी मांडला. प्रेक्षकांनी या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.विलासजी उगले,रा.से.यो. विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.मधुकर वाळुंज , प्रा.किसन कुमरे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.शंकर घाडगे, प्रा.ऋतुजा वाबळे, प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा.केतकी पेंडसे व इतर शिक्षकवर्ग आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा