अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; अजित पवारांचा मोठा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवक्त्यांना अखेर पक्षाने दरवाजा दाखवला आहे. अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. या निर्णयानंतर नव्या प्रवक्त्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये सातत्याने तणाव निर्माण होत होता, तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कठोर टीका केली होती. त्यानंतर पक्षाने ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. मात्र अजित पवार यांची भेट झाल्यानंतर काही तासांतच त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.
याशिवाय वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांनाही प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांना मारहाण केल्याच्या वादानंतर पद गमावलेले सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवे प्रवक्ते (NCP Ajit Pawar गट):
-
अनिल पाटील
-
रुपाली चाकणकर
-
ब्रिजमोहन श्रीवास्तव
-
चेतन तुपे
-
आनंद परांजपे
-
अविनाश आदिक
-
सना मलिक
-
राजलक्ष्मी भोसले
-
सुरज चव्हाण
-
हेमलता पाटील
-
प्रतिभा शिंदे
-
विकास पासलकर
-
राजीव साबळे
-
प्रशांत पवार
-
श्याम सनेर
-
सायली दळवी
-
शशिकांत तरंगे
संक्षेप:
वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे कारण देत अजित पवार गटाने ही मोठी कारवाई केली आहे. मिटकरी आणि ठोंबरे यांच्या प्रतिक्रियेची आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा