राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त आबासाहेब गरवारे महाविद्यालयात रक्तदान व दंत तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन
पुणे – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयात दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात रक्तदान शिबिर व डेंटल चेकअप शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रा. डॉ. विलास रामचंद्र उगले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना समाजातील आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये युवा वर्गाने पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच रक्तदान हे “महादान” असून प्रत्येक तरुणाने आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना अशा सेवाभावी उपक्रमात नक्कीच सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिबिरादरम्यान महाविद्यालयातील रा.से.यो.चे स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. इच्छुक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले. या उपक्रमात एकूण ७४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे आयोजन आबासाहेब गरवारे महाविद्यालय व पूना सेरोलॉजिकल इंस्टिट्यूट ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. तसेच डेंटल चेकअप शिबिराद्वारे विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसह दंत आरोग्याविषयी जनजागृतीही करण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रा. से. यो. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. मधुकर वाळुंज, प्रा. किसन कुमरे, डॉ. शीतल शेवते तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. शंकर घाडगे, प्रा. डॉ. कुंडलिक पारधी, डॉ. जया लीम्बोरे, प्रा. सारंगा कुलकर्णी, प्रा. ऋतुजा वाबळे, प्रा. स्वप्ना निरगुडे, प्र. डॉ. राजेंद्र जमदाडे, प्रा. डॉ. माधव इंचुरे, डॉ. अनिल पारधी व इतर यांचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयीन परिसरात झालेल्या या सेवाभावी उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व समाजातील विविध घटकांनी कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा