मी चित्रपट रितेश देशमुख चे म्हणून बघतो रिमेक हिट फ्लॉप वगेरे गौण | VED MOVIE REVIEW


VED MOVIE REVIEW

VED MOVIE REVIEW

 #मित्र : अबे मजिली चा रिमेक आहे चित्रपट ...

सेम टु सेम सिन कॉपीकॅट आहेत .........

#मी : मग काय झाल ........ ...

बरेच तेलुगू तामिळ रिमेक बॉलिवूड मधे झाले आणि ते सुपरहिट ही झाले ... 

मी चित्रपट रितेश देशमुख चे म्हणून बघतो रिमेक हिट फ्लॉप वगेरे गौण  ....

आजवर त्याचे चित्रपट मी फक्त तो आहे म्हणून बघितले माझ्या बऱ्याच जुण्यापोस्ट बघु शकता ...........

त्या बाबतीत कदाचित तुमच्या दृष्टीने माझा हा वेडेपणा असेल ...

मराठीतील बहुचर्चित चित्रपट #वेड ...

एकतर रितेश दादा आणि जेनेलिया वहिनी यांचा चित्रपट मध्यंतरी जवळपास 20 वर्षापूर्वी  तुझे मेरी कसम ... मस्ती ... तेरे नाल लव हो गया आणि काल परवा आलेला mr mummy नंतरचा आणि मराठी चित्रपटातील पहिला चित्रपट वेड .. 

त्यामध्ये रितेश दादा चा दिग्दर्शनातील पहिले पाऊल ते ही मराठी मधे त्यामुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता होतीच ... 

रितेश दादा ची बॉलिवूडहिंदी मधे असलले मैत्रीपूर्ण संबंध सर्वाना माहितीय ..

त्याने वेडचे ज्याप्रकारे प्रमोशन केले त्याला तोड नाही बॉलिवूडहिंदी मधे कपिल शर्मा असो वा केस  तो बनता है  वा बरेच मराठी हिंदी सिंगिंग क्षेत्रातील tv show या मधे वा बऱ्याच कलाकारानी केलेला नाच  त्यानी दिलेली visit  त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात सर्व भाषीक लोकांपर्यंत पोहचला आणि सलमान भाऊ सोबती चा सध्या तुफान गाजत असलेले त्याचे गाण ये भाऊ तुला काय झाल ...

रितेश दादा जेनेलिया वहिनी या फेमस जोडीचे मराठीत पदार्पण तर रितेश दादा आणि मराठीतील सुपरस्टार अशोक मामा यांची बाप मुलाची जोडी त्यामुळे हा चित्रपट काहीतरी वेड निर्माण करेल हा विश्वास वाटत होता तो अगदी सार्थ ठरला...

त्याने निर्माता दिग्दर्शक अभिनेता हे शिवधनुष्य पेलले असेच म्हणावे लागेल ...

मुळ चित्रपट हा मजिली शी साधर्म्य असला तरी रितेश दादा चे दिग्दर्शन खुप मस्त वाटते बरेचशे scene हे खुप मस्त प्रकाशयोजना असलेले  आणि निसर्गरम्य वाटतात मग ते मुंबईतील समुद्र किनारा असो वा पाऊसाचे प्रसंग  वा भावनिक चित्रीकरण वा कॉमेडी सर्व छान वाटतात ... 

क्रिकेट वरील रितेश दादा चे प्रेम सर्वार्थाने दिसले असेच म्हणावे लागेल ...

या चित्रपटात तो क्रिकेटपटू दाखवला आहे तो 

कुठेही  ॲक्टींग करतोय असे जाणवत नाही तर एखादा तंत्रशुद्ध फलंदाजा सारखे मारलेले सर्व शॉट अप्रतिम वाटतात

हुक असेल वा sweep वा step out वा नटराज shot  अप्रतिम ......... 

चित्रपट कुठेही बोर होत नाही .अगदी पुर्वारधात वा उत्तरार्धात.......

चित्रपटातील अजय अतुल यांचे संगीत  हे तर खुपच श्रवणीय तसेच पार्शसगीत हे छान आहे अगदी तेलगु तामिळ च्या धाटणीचे ...

थोडक्यात कथा पटकथा संवाद दिग्दर्शन व अभिनय या सर्वच बाजूने चित्रपटातील रितेश दादा चा पहिलावहिला दिग्दर्शनाचा  प्रयत्न खुपच यशस्वी ठरला असे म्हणेल ..

या चित्रपटातील जमेची बाजु म्हणजे चित्रपटातील अभिनेत्यांचा अभिनय ..

आजवर आपण रितेश दादा ला कॉमेडी मधे बघत आलोय आजवर तो आपल्याला आपल्या कॉमिक टायमिंग ने हसवत आला आहे ..

या चित्रपटामद्गील त्याने साकारलेला धीरगंभीर सत्या तो किती ताकदीचा अभिनेता हे दर्शवितो ...

त्याला साथ लाभली आहे सुपरस्टार टायमिंग सम्राट  अशोक मामा वा खाश्ट सासरे  विद्याधर जोशी .. 

शुभंकर तावडे ने साकारलेला johnty  मित्र छान तर मराठी मधे पदार्पण करणाऱ्या जिया शंकर  यांचा अभिनय आणि भाषेवरील प्रभुत्व accent हा छान वाटतो ..

श्रावणी ची भूमिका करणाऱ्या जेनेलिया वहिनी यांचा अभिनय आपण अवखळ खट्याळ असा बघितला असला तरी ह्या चित्रपट मधे त्या वेगळीच छाप सोडुन बाकीच्याचे मार्केट खातील असे वाटले होते  या चित्रप्टामधे त्यानी गंभीर भूमिका निभावली .. खरे पाहता त्यांची मराठीतील dialogue delivery ही आणि मराठी accent थोडा  slow जाणवतो  ..

मात्र काही भावनिक रित्या असलेले प्रसंग खुप ह्रदयस्पर्शी वाटतात ... 

छोट्या खुशी ने मस्त भूमिका केली आहे तर नविन खलनायक भास्कर आण्णा रवीराज यांची भूमिका एकदम साजेशी  मनात राग करणारी ..

या सर्वानी वरचढ ठरत भुमिकेला अगदी योग्य न्याय दिलेला आहे ..

चित्रपटातील शेवटचा scene थोडा emotional करतो 

ज्यावेळी श्रावणी घर सोडुन जाते अगदी त्यावेळेस "तुझे मेरी कसम"  ची आठवण आल्या शिवाय राहत नाही ... 

मागील ८-१० वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचे हिंदी रिमेक करण्याचे फॅड आले आहे बरेच हिंदी चित्रपटातील अभिनेत्यांचे करिअर south  ने वाचवले असे म्हणावे लागेल मात्र वेड च्या बाबतीत हे उलट आहे नागाचैतन्य चा मजली मधील पुर्णा  पेक्षा रितेश दादा चा सत्या खुप मॅचुअर ,गंभीर आणि प्रगल्भ वाटतो  असे म्हणावे लागेल ..

मुळ मजिली चित्रपटापेक्षा कितीतरी पटीने  वेड हा सिनेमा खुप मस्त मांडलाय आणि त्याला मिळणारा प्रतिसाद निश्चित खुप मोठा आहे ...

आणि या वेड साठी संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतोय याचे श्रेय रितेश दादा  आणि देशमुख परिवाराला द्यावेच लागेल .. 

रितेश दादा हा महाराष्ट्रातील  घरचा एखादा सदस्य मोठा भाऊ  वाटतो आणि जेनेलिया वहिनी या  जोडीला मिळणारे प्रेम ही अगदी जास्ती आहे .. 

आजवर मराठी चित्रपटसृष्टीचा आदरपूर्व गवगवा हिंदी बॉलिवूड मधे यथार्थ अभिमानाने  टिकवला वाढविला रुजविला तो रितेश दादा नेच ...

दादा तुझ्या भावी वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा .......

चित्रपटाची सुरवात आणि शेवट दोन्हीही  टिपलेले आनंदायी फोटो ... 

©jai Chikhalikar

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने