PARIZAAD DRAMA HUM TV MARATHI REVIEW । परिजाद ड्रामा मराठी रिव्हिव्ह 


PARIZAAD DRAMA HUM TV MARATHI REVIEW
PARIZAAD DRAMA HUM TV MARATHI REVIEW 

नुकतीच हम टिव्ही या पाकिस्तानी YouTube चॅनल वर परिजाद ही मालिका पहिली या संदर्भतील व्हिडिओज Instagram वर खूप फेमस झाले आहेत,त्याचबरोबर एक दोन ठिकाणी एकायला भेटलं .एकूण 29 भागाची ही मालिका खूप काही शिकवून जाते,या मालिकेनंतर शेरो शायरी बद्दल तुमची आवड अधिक वृध्दींगत होईल, यात प्रेम हा विषय     तुम्हाला वेगवेगळ्या अंगातून पाहायला मिळेल . परिझाद  म्हणजे परीच्या पोटी जन्मलेला अस नाव असून पण नायक त्या नावाप्रमाणे दिसायला साधारण वर्णाने सावळा असा असला तरी आपल्या बोलीच्या जोरावर सगळ काही मिळवण्याचा प्रवास तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल.


 आई वडिलांच्या मृत्यूनंतर एकटा पडलेला parizad एकटी काळजी करणारी बहीण तीचीहे लग्न परिस्थितीमुळे एका वयस्कर माणसासोबत लावले जाते ,उर्दू भाषेत  पारंगत असून पण पैशाच्या अडचणीमुळे विद्यापीठातील शिक्षण सोडून काम करायला लागतो.वर्ग मैत्रिणीच्या घरी तिच्या आई कडून पैसे कमवायलास तरच जग तुला. किंमत देईल नाहीतर कोणी तुला ओळखणार नाही अशी शिकवण मिळते.प्रत्येक क्षणाक्षणाला समोर येणारे अपमान सहन करत तसेच प्रेमात अपयश पचवत दिवस काढत होता. पण पैसे कमवायचा हिशोबाने तो आपले गाव सोडतो कराची शहरात एका मालकाकडे काम मिळवतो आपल्या इमानदारीच्या जोरावर मालकाचे मन जिंकतो .


मध्ये अश्या काही घटना घडतात त्या परिस्थितीत मालक आत्महत्या करतो आणि सर्व प्रॉपर्टी याच्या नावावर करतो आणि मग श्रीमंत झाल्या नंतर आपल्या जुन्या लोकांना न विसरता सगळ्यांचं कल्याण करतो पण तरीही प्रेमाच्या बाबतीत अजूनही अपयशी असतो.अंध रेडिओ जॉकी च्या प्रेमात पडतो पण आपला दिसण्यातील न्यूनगंड अजून त्याच्या डोक्यातून जात नसतो परत एकदा प्रेमात हरेल या भीतीपोटी सर्व सोडून निघून जातो ,नंतर एका डोंगरातील उर्दू शाळेत शिक्षक म्हणून काम करतो व त्या शाळेत सुधारणा घडूवून येतो त्याच शाळेतील मुलाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याने त्याचा सत्कार करायला आलेले असतात त्यात ही रेडिओ जॉकी पण आलेले असते त्यांनतर त्यांचा तेथे  संभाषण होते ते दोघे त्या शाळे साठी काम करायचा ठरवतात.


उगाच टाईमपास न करता खूप फास्ट जाणारी कथा अप्रत्रिम डायलॉग जे तुमच्या मनात जातील .मिर्झा गालिब आणि इतर महान शायर लोकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या  शायऱ्या, सगळ्याच पात्रांनी केलेली कमाल अक्टिंग ,बबली बदमाश ,Rj Anni, लुबिना , Nahid ,Saida प्रत्येकाने आपल्या पात्राला साजेशी अक्टिंग केली आहे. कमी बजेटमध्ये फक्त कथानकाच्या जोरावर खूप भारी मालिका बनवली यामध्ये लेखकाचे खूप मोठे योगदान आहे.यामधील नायक  सर्वसामान्य समजातील तसेच आजकालच्या भौतिक जगात खर प्रेमाचा शोध घेणाऱ्या लोकांचं नेतृत्व करतो. यामध्ये एक आवडलेली शायरी मी इथे लिहित आहेसुनो तुम्हारी वफ़ा पे मुझको

गरचे पूरा यकीं है

मगर जमाने के वार का कुछ

भरोसा नहीं है

सो गर कभी ऐसा हो के तुम्हें

मुझसे नफरत हो जाए

तो कभी उन बातों से नफ़रत न करना

जो कभी हमने एक दूसरे से कि थी

के बातें तो राब्ता होती हैं

वो बैंच जहाँ हम बैठा करते थे

वो पहली बारिश, वो कॉफी के खाली मग्ग,

वो सीनेमा का पहला टिकट 

और आखरी दो सीटें सबको याद रखना

कभी उनसे नफरत ना करना

के यह सब तो लम्हें हैं, हर गरज़ से मावरा

सुनो मुझसे और बस मुझसे नफ़रत करना

के सिर्फ में और फ़क़त मैं ही

तुम्हारी इस नफरत के काबिल हूँ।।


यामध्ये अस सांगितलं आहे की प्रेमात एक वेळ अशी एक येते की सर्व गोष्टी दूरदूर होत जातात प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार केला जातो या पण जर तुला तिरस्कार करायचा असेल तर फक्त माझा कर  पण त्या गोष्टीचा नको की ज्यामध्ये आपला प्रवास होता तो बँच आपण जिथे बसत होतो , सोबत पिलेली कॉफी असेल ,किंवा सोबत बघितलेला शेवटच्या सीटवर बसून पाहिलेला चित्रपट असेल त्या गोष्टीचा तिरस्कार करू नको. अश्या एक ना अनेक शायरी तुमच्या डोक्यात सतत घोळत राहतील जर तुम्ही कवी लेखक शायरी ची आवड ठेवणारे असाल तर तुमच्या साठी हि मालिका म्हणजे मेजवानी आहे तर नक्की पहा..© Dhiraj Bhosale

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने