द आंत्रप्रेन्यूअर| The entrepreneur |sharad tandale book review


द आंत्रप्रेन्यूअर| The entrepreneur |sharad tandale book review
द आंत्रप्रेन्यूअर| The entrepreneur |sharad tandale book review


बऱ्याच दिवसापासून ज्या पुस्तकाची वाट बघत होतो ते पुस्तक शेवटी वाचण्यात आलं द आंत्रप्रेन्यूअर शरद तांदळे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे,जे उद्योजक आणि लेखक आहेत तसेच त्यांना २०१३ चा

"यंग आंत्रप्रेन्यूअर ऑफ द इअर" हा पुरस्कार इंग्लंड चा राजा चार्ल्स याच्यातर्फे मिळाला आहे .१८४ पेजेस असणार पुस्तक तुम्हाला वेगळ्या वाटेवर नेऊन सोडेल . हे पुस्तक फक्त उद्योग क्षेत्रात येणाऱ्या लोकांसाठी नसून तर विद्यार्थ्यांसाठी,पालकांसाठी ,इत्यादी साठी  उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे. यामध्ये तेरा भागात आयुष्याच्या वेगवेगळ्या भागात केलेल्या चुका व अनुभव यांचा प्रवास यात दाखवला आहे आणि प्रत्येक जण या प्रवासातून जात असतो याचा अनुभव आपली पुस्तक वाचताना येईल व त्यांनी केलेल्या चुका त्यांनी सगळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे मांडले आहेत ज्यामुळे आपण कसे स्वतःला फसवतोय हे आपल्याला कळून येत रॅट रेस ज्यामध्ये आपण प्रत्येक जण एका शर्यतीत असल्यासारखे धावतो आहेत पण आपल्याला आयुष्यात काय हवंय काय नाही याचा थोडा पण विचार करत नाही व असे करत असताना आपण आपल्याबरोबर आपल्या घरच्यांना सुद्धा चुकीच्या अपेक्षा ठेवण्यास भाग पाडतो तर अशावेळी आपल्याला नेमकं काय करायचंय हे सुरुवातीलाच ठरवून आपण आपला प्रवास केला पाहिजे त्यानंतर आपल्या या प्रवासात आपला कोणीतरी मेंटर असला पाहिजे जेणेकरून आपल्याला चुकीच्या वाटेवर जात असताना आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. आणि वेळोवेळी आपण सुद्धा स्वतःचं अवलोकन केलं पाहिजे ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण नेमके कुठे जातोय आणि काय करतोय 


यामध्ये शरद तांदळे यांच्या वडिलांनी दिलेल्या उदाहरण खूप छान आहे ते विचारतात की शरद तुला माहित आहे का फुलपाखराचा जन्म कसा होतो त्यावर शरद तांदळे म्हणतात की हो आळी मातीचा ढिगारा तयार करते मग ती काही काळाने मातीचा ढिगारा  अळी  फोडून बाहेर येते आणि फुलपाखरू उडते त्याप्रमाणे तू पण तुझ्या आजूबाजूला असलेला मातीचा ढिगारा सारून फुलपाखरा प्रमाणे उड ,जर तोच ढिगारा जर बाहेरून फुटला तर तू कायम अळी बनून राहशील,

     यासोबत उद्योग क्षेत्रात असो किंवा कुठलेही क्षेत्र असो .यात वेगवेगळे माणस अनुभवयाला मिळतात चांगले मित्र बनवायची असतील तर आपणही कोणाचे तरी चांगले मित्र असायला पाहिजे. ज्यामध्ये चांगले विचार तसेच अडचणीच्या काळात मदतीला येतील,तसेच उद्योग क्षेत्रात असताना  बँकिंग , अकाउंटिंग, याबद्दल माहिती असायला हवं पैशाचे नियोजन याबद्दल पण आपल्याला बऱ्यापैकी माहिती येते,एकूणच त्यांनी त्याच्या द आंत्रप्रेन्यूअर चा प्रवास ,तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मांडला आहे ज्यातून आपल्याला ऊर्जा तर मिळतेच पण उद्योगक्षेत्रात उतरताना कोणत्या गोष्टी कराव्या किंवा न कारव्या याबद्दल माहिती मिळते .प्रत्येकाने एकदा तरी वाचावे असे हे पुस्तक आहे . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने