ऑगस्ट  महिन्यापासून होणार लहान मुलांचे लसीकरण।Marathi news

Marathi news
Marathi news

                     आपण पाहत   आहोत कि पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक लोकांना जीव गमवावा लागला ,लसीकरण चालू असले तरी त्याचा  म्हणावा इतका वेग नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त धोका हा लहान मुलाना आहे आहे. या पार्श्ववभूमीवर पुढील महिन्यात  १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी सांगितले. कशी असेल लसीकरण प्रक्रिया सविस्तर जाणून घेऊ  

● एम्स संस्थेचे म्हणणे काय?
- झायडस, भारत बायोटेक आणि फायझर लसी उपलब्ध 
- सप्टेंबरपर्यंत तिन्ही लसींना मान्यता मिळण्याची शक्यता 
- लसींमुळे लहान मुलांचा कोरोनापासून बचाव होऊ शकतो
- संक्रमणाची साखळी तोडण्यास मदत होणार 

● काय आहे लॅन्सेटचा अहवाल?
- 'द लॅन्सेट' विज्ञान विषयक मासिक अहवाल 
- ११ ते १७ वयोगटातील मुलांबरोबर राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका १८ ते ३० % वाढतो 
- त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवणे आवश्यक 

● लहान मुलांसाठीच्या लसींची सद्यस्थिती काय?  
- झायकोव्ह डी - निर्माती कंपनी : झायडस, चाचण्या पूर्ण, आपत्कालीन वापराच्या मंजुरीची प्रतीक्षा   
- कोव्हॅक्सिन - निर्माती कंपनी : भारत बायोटेक, २ ते १८ वयोगटावरील चाचण्या सुरु, आपत्कालीन वापराच्या मंजुरीची प्रतीक्षा    
- फायझर - निर्माती कंपनी : फायझर, अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी, भारत सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

अश्याप्रकारे लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने