परब्रम्ह परमात्मा  (ओळख आपल्या अस्तित्वाची)।Psychology

नमस्कार मित्रानो आपण Psychology या विषयातील बरेच दिवस या घटकावर लेख लिहिले नव्हते पण आपण परत एकदा या विषयावरील लेख घेऊन आलो आहोत तरी आपले मागचे ब्लॉग सुद्धा एकदा ननक्की वाचा .
परब्रम्ह परमात्मा  (ओळख आपल्या अस्तित्वाची)।Psychology
परब्रम्ह परमात्मा  (ओळख आपल्या अस्तित्वाची)।Psychology



असं म्हणतात की मानवी जीवन फार थोड्या दिवसांच आहे. या जीवनात अशा अनेक गोष्टी आपण ऐकत बघत वाढत असतो ज्या बाबत आपल्या मनात कुतूहल निर्माण होत असतं, आणि आपण विचार करू लागतो की कधीतरी आपल्यालाही या गोष्टींचा उलगडा व्हावा.

बऱ्याचदा असंही होतं की, आपण काही अनाकलनीय गोष्टींचा अनुभव घेतो आणि जेव्हा तसे अनुभव येतात तेव्हा त्या गोष्टी प्रत्येक वेळी गुढतेकडे वळत गेलेल्या आहेत असं आपल्या निदर्शनास येतं. मग शोध सुरू होतो त्या गोष्टींचा, मनात एक विचित्र अशी घालमेल सुरू होते आणि माणूस निघतो आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, पण बऱ्याचदा त्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं बाहेर किती ही शोधण्याचा प्रयत्न केला तरी सापडत नाहीत आणि हतबल होऊन हे आपल्या समजे पलीकडचं आहे असं समजून तो शोध थांबवतो ..

पण आपल्या अंतरंगात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरं प्रश्नासोबतच आहेत असं तुम्हाला सांगितलं तर? 

जाणून घेऊया.


Prime concious ची संकल्पना


आत्मा, आत्मन, परम सत्य, परब्रम्ह, रुह, concious, किंवा soul तुम्ही त्याला काहीही म्हणा, पण जे तुमच्या शरीरात कुठेतरी एक निरीक्षक असतो जो सतत काही ना काही निरीक्षण करत असतो किंवा असं म्हणता येईल की अनुभव करत असतो त्याला आपण prime concious असं म्हणू शकतो.


तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असा, पण तुम्ही आयुष्यात एकदा तरी prime concious ही संकल्पना ऐकली असेलच. आता प्रत्येक धर्मात या बाबत लिहिलेलं आढळून येतंच.. कारण जरी प्रत्येक माणूस हा विविध धर्म , मान्यता यांचा पुरस्कर्ता असला तरी कधी ना कधी त्याला त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न उदभवतोच... तर प्रत्येक व्यक्ती कधीतरी या प्रश्नावर विचार करत असेलच की माझं अस्तित्व आहे तरी काय? मी या पृथ्वी तलावर जन्म का घेतला असावा किंवा आत्मा म्हणजे नेमकं काय? असे प्रश्न बहुतेकदा वैचारिक लोकांना पडत असतीलच, तर यावेळी ही संकल्पना आपल्याला बरच काही समजावून सांगू शकते.


प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं

एवढं वरच वाचल्यावर आपल्याला वाटेल की, ठीक आहे आत्मा वगैरे पण आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्या प्रश्नासोबत च असतात हे कसं?

तर जेव्हाही आपण एखाद्या प्रश्नार्थक स्थिती मध्ये येतो तेव्हा कुठंतरी एक अशी शक्ती देखील असते जी आपल्याला वेळोवेळी आपल्या प्रश्नांवर उत्तरं देत असते पण आपलं अवधान त्याकडे जास्त नसल्यामुळे त्याचं अस्तित्व कधी कधी आपल्या लक्षात येत नाही आणि कधी कधी असंही होतं की आपल्याला उत्तर मिळतं, आपल्या ते लक्षात ही येतं पण तरीही हा एक विचार आहे असं आपल्याला वाटतं आणि तो विचार कुठून आला यावर लक्ष देत नसल्यामुळे आपल्या अंतरंगात असलेल्या त्या शक्तीची ओळख आपल्याला होत नाही.


 परब्रम्ह ओळख

 संत, धर्मशास्त्र, आध्यत्मिक गुरू किंवा तुम्ही ज्यांची ही शिकवण मान्य करत असाल ते एक गोष्ट नेहमी तुम्हाला सांगतात.. ती म्हणजे,  "अंतरातम्याचा शोध घ्या म्हणजे ईश्वर सापडेल" याचा अर्थ जेव्हा आपण समजून घ्यायला लागतो तेव्हा आपल्याला अंतर्मुख होण्याची गरज भासू लागते आणि जेव्हा आपण अंतर्मुख होऊन शोध घ्यायला लागतो तेव्हा आपल्याला अद्वैताची जाणीव होऊ लागते.


Psychology काय म्हणतं?

मानसशास्त्रमध्ये आपल्या मेंदू व्यतिरिक्त आपल्या सम्पूर्ण व्यक्तित्वाचा अभ्यास केला जातो आणि त्यातही आपल्या शरीरात concious आणि subconcious असे दोन व्यक्तित्वाचे पैलू पाडण्यात येतात. Concious म्हणजे सचेत मन आणि sub concious म्हणजे अचेतन मन अशी ती संकल्पना आहे आणि त्यातही आपलं शरीर हे एका concious असणाऱ्या तत्वांद्वारे काम करत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


परब्रम्ह परमात्मा आणि ध्यान


आता तुम्ही म्हणाल की हे सर्व लक्षात येतंय की  आपला आत्मा, परम आत्मा वगैरे शरीरात असतं आणि ते आपल्याला वेळोवेळी कुठंतरी subconcious level ला मदतही करतं, पण त्याचा अनुभव कसा घ्यावा?

तर या प्रश्नाचं एक साधं आणि सोप्प उत्तर म्हणजे ध्यान.

थोडक्यात सांगायचं झालं तर आपला prime concious जर access करायचा असेल तर त्यासाठी अंतर्मुख होऊन त्या अस्तित्वाची जाणीव करून घेणं गरजेचं ठरतं, त्यासाठी ध्यान हा सर्वात उत्तम मार्ग सांगितल्या जातो.

ध्यानाचे विविध प्रकार आहेत, जसं की चलीत ध्यान, ओंकार, विपस्सना इत्यादी.

जेव्हा तुम्ही ध्यान करणं सुरू करता तेव्हा तुमच्या Brain मधील एक द्रव्य ज्याला grey matter म्हणतात त्याची वृद्धी होण्यास सुरुवात होते. हळूहळू मेंदू मध्ये काही अंतःस्रावी ग्रँथी active होऊन एक अचल अशी स्थिती उत्पन्न व्हायला लागते आणि आपल्याला एक असीम शांती लाभण्यास सुरुवात होते. 

जगात अनेक संत, गुरू आणि  बऱ्याच लोकांनी ध्यान आणि त्यातून येणारे अनुभव याबाबत लिहून ठेवलंय पण , जर आपल्याला आपल्या अंतरंगाचा शोध घेऊन पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील किंवा आपण असं म्हणू की परमात्मा शोधून काढायचा असेल तर एकदा तरी या मार्गातून शोध घेण्याचा प्रयत्न करावा..तेव्हा तुम्हाला जो अनुभव येईल तो फक्त तुमचाच असेल आणि जेव्हा तुमची आणि त्या सूक्ष्म शरीराची ओळख होईल तेव्हा ? कदाचित काहीतरी रहस्य उलगडेल ? Anything is possible..



Prof. Tushar Gopnarayan

MA psychology+ NET

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने