जबरदस्त!! आता 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनावरील लस !

                                       नवी दिल्ली :  केंद्र सरकारने आज एक मोठ्ठा निर्णय घेतला आहे. 


                   महाराष्ट्रासोबतच देशभरात वाढत्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर्स, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत एक बैठक घेतली.या बैठकीनंतर हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठ्ठा निर्णय घेण्यात आला.देशातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण व्हावं, यासाठी सरकार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितल.


Age-18-covid-19-vaccination
जबरदस्त!! आता 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनावरील लस !

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व योग्य व्यक्तींना आता कोरोना लस मिळणार आहे!

                 कोरोना वर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभर लसीकरणाची एक मोठी मोहीम सुरू झालेली आहे. मात्र यात सर्वात आधी फक्त 60 वर्षांपेक्षा जास्ती वय असणाऱ्या व्यक्तींनाच अशी लस दिली जात होती. त्यानंतर 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांचा यात समावेश केला गेला, हा लसीकरणाचा कार्यक्रम अजूनही सुरू आहे. यानंतर आता केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्याचा मोठ्ठा निर्णय घेतला आहे!



लसीकरणाचा देशातील हा तिसरा टप्पा :- 

                  कोरोना लसीकरणाची तिसरी मोहीम अथवा तिसरा टप्पा 1 मे 2021 पासून सुरु करण्यात येणार आहे.

                                     तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजारात विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत.उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या बाजारात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

                         मोदींनी यावेळी कोरोना टियर 2 आणि टियर 3 मधील शहरांमध्ये वाढत असल्याचं नमूद केलं, सोबतच  'लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र' असल्याचं या बैठकीत श्री. नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.  डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनावरील लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन सुद्धा नरेंद्र मोदींनी यावेळी केलं आहे. 

                 नरेंद्र मोदींनी देशातील डॉक्टर आणि मेडिकल फार्मा कंपन्यांशी चर्चा केली. यापूर्वी 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत होती. आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे.


                        तर ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी 18 वर्ष पेक्षा जास्ती वय असणाऱ्या तुमच्या सर्व मित्र मैत्रीणीना नक्की share करून कळवा... आणि तुम्ही सुद्धा या लसीकरण मोहिमेमध्ये आपला सक्रीय सहभाग नक्की नोंदवा !! 


                अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि Marathi News करिता नेहमी भेट देत रहा www.khasmarathi.com ला !!

Post a Comment

Previous Post Next Post