सोशल मिडीया आणि डिप्रेशन ।।Khasmarathi Special


सोशल मिडीया आणि डिप्रेशन ।।Khasmarathi Special
सोशल मिडीयाआणि डिप्रेशन ।।Khasmarathi Special



                            आज आपण पाहतोय कोणीतरी स्टार नि आत्महत्या केली४ ते ५ दिवसाला ऐकायला येत  असं  ,का होत असेल असं भारत हा एक असा देश आहे की सर्वात जास्त तरुण या देशात आहेत अशी या देशाची ओळख ही आहे ,आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात जास्त  तरुणाचे आत्महत्या करण्याचे प्रमाण याच देशात आहे , एवढ्या शुल्लक गोष्टीवरून आत्महत्या करतात की बस विचारायला नको , आता या दोघांचं उदाहरण घ्याच झालं तर आता ही पुजा चव्हाण आणि समीर गायकवाड टिकटॉक/इंस्टाग्राम स्टार होते समीर गायकवाड, पुजा चव्हाण हे दोघी ही कलाकार होतेच दिसायला ही सुंदर होतेच काय असं झालं आणि यांनी आत्महत्या केली आता ही पुजा चव्हाण पुण्यात राहण्यास अली तिचा तो पर्सनल विषय काहीही असो , त्यात आपण डोकावून नाही पाहू शकत आणि तो अधिकार आपणाला नाही , अचानक एवढी फेमस झाली ते ही तु आत्महत्या केल्यावर ज्यास्त फेमस झाली पुजा चव्हाण ,

 दुसरी गोष्ट

          समीर गायकवाड ची हा तर पॉझिटिव संदेश देत होता चांगल्या गोष्टी सांगत होता , आणि यांनी पण आत्महत्या केली , ठराविक लोक असतात की पॉझिटिव संदेश देतात आणि पॉझिटिव जगतात खर तर पॉझिटिव जगले पाहिजे ही चांगलीच गोष्ट आहे , पण अस ही म्हणू शकत नाही की पॉझिटिव बोलणारा हा पॉझिटिव जगत असेल कारण हे लोक डिप्रेशन मध्ये असतात किंवा डिप्रेशन मधून आले असतात , या समीर गायकवाड ने हेच केलं फक्त पॉझिटिव्ह  बोलत राहिला आणि स्वताचा जीव संपवून घेतला कदाचित त्याला समजून घेणारा आयुष्यात भेटला नाही कदाचित तस असता तर त्याने हा निर्णय घेतला नसता .

आणखी एक 

सुशांत सिंग राजपूत झाला त्याने छिछोरे चित्रपटातून अपयश आलं म्हणजे आयुष्य संपलं ,असं विचार करू नये प्रत्येकाने किमान लढलं पाहिजे ,आणि अपयश आलं तर काय करावं असं पण विचार करावा असा संदेश दिला .पण त्याने सुद्धा आत्महत्या केली .

तुम्ही तुमच्या आई वडील भाऊ बहीण मित्र परिवार कोणाचा ही  विचार न करता ,आणि हे टिकटॉक चालवणार्यांनी बऱ्याच तरुणांनी आत्महत्या केली आहे , यामध्ये काही नि पैसे ही कमावले ,काही नि पैसे गमावले , काहींची खूप मोठी लूटमार झाली आहे ,
मुलींनी तर खूप अवस्था बेकार करून घेतली अगदी मुलांसारखी , तुम्ही स्वताला सावरू नाही शकत तुम्ही तुमच्या नादात जगला आणि स्वताचा जीव गमावला ,, यात तुम्हचे नुकसान तुम्ही करून घेतली आणि संपला तुम्ही आयुष्यातून , अरे हे ताणतणाव डिप्रेशन कोणाला नाही धोका प्रत्येकांनी स्वीकारला आहे कर्जबाजारी कोण नाही भरपूर असे आहेत हे सर्वजण जगतात की.


डिप्रेशन च्या वेळी कसा विचार करावा ?


आजकाल २ कॉमन गोष्टी आहेत ज्यामुळे सगळ्यात जास्त  माणसाला डिप्रेशन ला समोर जावं लागत ,

१)प्रेम 

२)पैसे 


 १) प्रेम   :-  पहिली गोष्ट आपल्या हातात नाही ,आपल आयुष्य एक प्रवास आहे ,आहे त्या प्रवासात आपण अनेक लोक भेटतात कोणी आपल्या सोबत चांगलं वागत ,कोणी वाईट ,आपल्या वर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने आपल्यासोबत ब्रेकअप केले तर तो आयुष्यातला सगळ्यात मोठा दुःखाचा भाग असतो त्यावेळी सुचत नाही काय करावं मग अनेकजण टोकाचं पाऊल उचलतात आणि आपला जीव गमावतात .पण अश्यावेळी आपण असा विचार करायाला पाहिजे कि आपल्या सोबतचा  माणूस एक प्रवासी होता ज्याला आपल्या सोबतच हा प्रवास चांगला वाटलं तोपर्यँत ते सोबत राहिले,आणि नंतर वेगळे झाले ,किंवा तुम्ही त्यांना गमावलं नाही तर त्या व्यक्तीने तुम्हाला गमावला असा विचार करा . प्रेमात भेटणारी व्यक्ती पाहिल्यादा परफेक्ट वाटते नंतर चुका काढणे किंवा या पेक्षा भारी पार्टनर भेटेल असं विचार सुरु होतो ,एकमेकात असणार कॉन्व्हर्सेशन गॅप आणि सहज उपलब्ध होणारे ऑप्शन यामुळे ,आजकाल प्रेम आजकाल जास्त टिकत नाही .ब्रेकअप झाल्यास जास्त  विचार नका करू  काळानंतर ६ महिन्यात आपल्याला तेवढच दुःख राहिलेले असेल का कदाचित आपण विसरून पण जाऊ, त्यामुळे ती वेळ निघून जाऊद्या 


२)पैसे :-पैशाचं टेन्शन घेण्यापेक्षा ,मार्ग काढायला शिका ,नको असणाऱ्या गोष्टी वर जास्त खर्च करणे आपण आर्थिक संकट ओढवून घेतो ,कमवण्याच्या काळात पैशाचं व्यवस्थापन करणे खूप गरजेचं आहे एकापेक्षा जास्त पैशाचे सोर्स तयार करून ठेवा .परतावा देणाऱ्या गोष्टीवर खर्च करा .दुसऱ्याला दिखावा करत असाल तर  नुकसान तुमचं आहे .कर्ज न काढता मार्ग निघतात का बघा ,त्यामुळे खूप ताण येतो .

सोशल मीडिया आणि त्यात अडकत चाललेली तरुणाई 
        

       भारतात असा एखादा तरुण सापडणार नाही ज्याला सोशल मीडिया माहित नाही ,मागे टिकटॉक मुले बरेचशे मुले त्या अधीन झाले होते ,ते बंद झाले आणि नंतर इंस्टाग्राम वर रील फिचर आलं आणि टिकटॉक ला एक चांगला पर्याय म्हणून आला ,आपण पाहतोय प्रत्येकाला त्याच व्यसन लागलं आहे.रील सेक्शन मध्ये गेल्यास प्रत्येकजण स्क्रोल करत राहतो व किती टाईम त्यात जातो हे आपल्याला कळत नाही,आणि सोशल मीडियावरील सर्व खुश दिसणारे लोक त्यांच्या खाजगी आयुष्यात तेवढेच खुश असतील हे सांगता येत नाही,म्हणून आपल्याला वाटते कि सर्वच आयुष्य चांगले चालले आहे माझंच फक्त वाईट होत आहे ,तसेच लोकानी माझ्यासोबत वाईट वागले असे विचार करता ,त्यामुळे डिप्रेशन नक्कीच येत .

     आणि आपण ज्या लोकांसोबत वावरतो याप्रमाणे आपला वागणं बोलणं बनत ,समजा  आपण एखाद्या ४ चांगल्या मित्रांसोबत राहिलो तर आपण पण चांगले होतो ,त्यामुळे आपल्याला काय बनायचं आहे ,तसेच ध्येय असणाऱ्या लोकांसोबत मैत्री करा किंवा सहवास ठेवा .आपले आदर्श बदलत आहेत इंस्टाग्राम स्टार आपले आदर्श वाटत आहेत ,एक विचार करा ते लोक पहिल्यापासून श्रीमंत आहेत त्यानं आणखी काही करायची गरज नाही परंतु जे गरीब मध्यमवर्गतील लोक आहेत त्यांना आयुष्यात कष्टच करावे लागणार आहेत याचा विचार करा ते तुम्हाला १ रुपया मिळवून देणार नाहीत  ,सत्य परिस्थती स्वीकार करा त्यात बदल करायचा प्रयत्न करा आणि सोशल मिडियाच्या माध्यम्यातून मिळलेली प्रसिद्धी काही काळापुरती असती ३ ते ४ दिवसाचा ट्रेंड असतो नंतर नवीन कोणीतरी येते उंची मेलात तरी जास्तीत जास्त महिनाभर लोक आठवण काढतील नंतर कोणाला काही फरक नाही ,आजकाल २ गोष्टी मुले माणसाला ओळखतात एकतर तुम्ही श्रीमंत असायला पाहिजे किंवा श्रीमंत ,श्रीमंतीतून मिळणारी प्रसिद्धी खूप काळ टिकते उ .दा एलॉन मस्क ,जेफ बेझोझ .यांचा विचार करा तुम्ही क्षेत्रात मोठं होयच बघा सोशल मीडियाच्या माधम्यांतून करिअर होणार नाही कधी कोनत्या ऍप वर बॅन येईल काही सांगता येत नाही .

POSITIVE कसा विचार कराल ?

     तुम्ही  आज जो व्यक्ती आहात ते मागच्या काळात तुम्ही कुठल्या लोकांसोबत वेळ घालवला आहे तसेच काय वाचन केले आहे ,कोणत्या गोष्टी फोल्लो केलं आहेत त्यामुळे तशे बनले आहात ,आताच्या काळात दुःख किंवा त्रास असेल ते तुमच्याच मागे घेतलेल्या ऍक्शन मधून आला आहे ,ते स्वीकारा आणि आपलं साधायचं आयुष्य समाधानी आहे का विचार करा नसेल तर कास आयुष्य आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे आपल्याला आयुष्यात काय बदल करावा लागणार आहे याचा फक्त विचार न करता ऍक्शन वर भर द्या ,
या सगळ्या काळात संयम आणि सातत्य ठेवावं लागेल तेव्हाच तुम्हा हवं ते मिळेल ,चांगल्या  पुस्तकांचे वाचण करा ते तुम्हाला नक्की मदत करतील ,चांगल्या लोकांचा सहवास आणि मार्गदर्शन घ्या ते तुम्हाला मार्ग दाखवायला मदत करतील ,तर तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडेल आणि तुम्ही समाधानी राहाल .

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने