भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाने ग्रासले || Marathi news


सिंधुदूर्ग, 16 ऑगस्ट :      देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने सुरु असून काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी कोरोनाचे हॉट स्पॉट (hotspot) तयार होताना दिसत आहेत. तसेच काही अंशी माणसे कोरोनाला चांगली टक्कर देऊन बरे होताना दिसत आहेत. असं असलं तरी रशियाने कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) तयार केल्याचा दावा तसेच मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्पादन सुरु असल्याचे कळत आहे.भारतातही यावर संशोधन सुरूच आहे.
भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाने ग्रासले || Marathi news
भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाने ग्रासले || Marathi news

          देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव / प्रसार सुरूच आहे. कोरोनाच्या संसर्गाने राजकीय नेत्यांपासून ते अनेक दिग्गजांना आणि कलाकारांना देखील वेढलं आहे. अनेक मोठ्या पक्षातील नेत्यांना कोरोनाची झालेली लागण आपण पाहिली आहे. अशात माहिती समोर येत आहे ती अशी कि भाजपचे नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण झाली . यासंबंधी निलेश राणे यांनी स्वतः ट्वीटकरुन माहिती दिली आहे व स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.


          प्राथमिक लक्षण दिसली असता मी कोरोनाची चाचणी केली आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने निलेश राणे हे सेल्फ क्वारंटाईन (self quarantine) झाले आहेत. तर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


          निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, 'कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.'


          अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये अमित शहांपासून ते अनेक आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे तसेच त्यांची पत्नी मेधा सोमय्यादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच नवनीत राणा यांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाने ग्रासले होते त्यांच्या प्रकृतीत आता सुधार दिसत आहे.


निलेश राणे यांचे ट्विट :➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.

          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने