भारतातील मंदिर आणि त्यांचे रहस्य || khasmarathi special


          आपला भारत देश हा जगभरातील आस्थेचा / विश्वासाचा देश मानला जातो. देशातील हिंदू धर्माच्या जास्त लोकांमुळे आपल्या देशातील मंदिरांची संख्याही जास्त आहे. हिंदू धर्मात मंदिर आणि पूजा याला विशेष मानले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का - आपल्या देशात अशी काही मंदिरे आहेत; जी केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठीच नव्हे, तर आपल्या अद्वितीय चमत्कारिक वैशिष्ट्यासाठी देखील ओळखले जातात; ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. होय ! आजची पोस्ट आपल्याला भारतातील पाच मंदिर आणि त्यांचे रहस्य (mysterious temples in India) जाणून घेण्यासाठी तुम्हास मदत करणार आहे; ज्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.

भारतातील मंदिर आणि त्यांचे रहस्य - Khasmarathi
भारतातील मंदिर आणि त्यांचे रहस्य - Khasmarathi

          मित्रांनो, आजची पिढी चमत्कारांवर विश्वास ठेवत नाही। लोकांना आज कशावरही विश्वास ठेवण्यासाठी पुराव्यांची गरज भासते, परंतु या जगात अशा काही गोष्टी आहेत; ज्याचा कोणताही पुरावा नसला तरी त्यांना खोटं मानता येत नाही. मंदिरांचीही अशीच गाथा आहे. तर चला मित्रांनो जाणून घेऊया - भारताचे पाच मंदिर आणि त्यांचे रहस्य!

मेहंदीपुर बालाजी मंदिर राजस्थान - रहस्य मराठीत

          मेहंदीपूर बालाजीचे मंदिर श्री हनुमानाचे जागृत स्थान मानले जाते. तेथील लोकांचा असा विश्वास आहे की - श्री बालाजी मंदिर म्हणजे भूतांनी पीडित (भूतबाधा) असलेल्या लोकांची शेवटची आशा आहेत. जर आपण भविष्यात हे मंदिर कधी पहायला गेले तर; तर तिथे तुम्ही पुष्कळ लोकांना साखळ्यांनी बांधलेले आणि उलटे लटकलेले पाहू शकता. या मंदिराचे चमत्कार पाहून कोणतीही व्यक्ती आपले आश्चर्य लपवू शकत नाही. या बरोबरच लोकांचा असा विश्वास आहे की - या मंदिरात विराजमान असलेले श्री बालाजी आपल्या दैवी सामर्थ्याने दुष्ट आत्म्यांपासून मुक्ति देतात. दररोज हजारो भुताने पीडित लोक या मंदिरात दर्शन आणि प्रार्थनेसाठी येतात.

मेहंदीपुर बालाजी मंदिर राजस्थान रहस्य मराठीत - Khasmarathi
मेहंदीपुर बालाजी मंदिर राजस्थान रहस्य मराठीत - Khasmarathi

रहस्य :      संध्याकाळच्या वेळेत जेव्हा बालाजीची आरती होते; तेव्हा भूतप्रेतांनी पीडित लोकांना आपण भांडतांना पाहू शकतो. आरती झाल्यानंतर अशा लोकांना मंदिराच्या गर्भगृहात घेऊन जातात आणि तिथे पुरोहित काही उपाय करतात. असे म्हटले जाते की - यानंतर तो व्यक्ती पूर्णपणे स्वस्थ होऊन जातो.


          मित्रांनो, मेहंदीपुर बालाजी मंदिरात असे काय होत असेल ? की जे लोक भूत प्रेतांनी ग्रसित आहेत ; ते बरे होतात. तेथील पुरोहित नक्की काय उपाय करत असतील? की ज्याने ज्या लोकांना डॉक्टरही बरे करू शकले नाही त्यांना पुरोहित बरे करतात किंवा या मंदिरात जाऊन ते बरे होतात. ह्या सर्व बाबी आजही आपल्यासाठी एक रहस्य आहे.

काल भैरव मंदिर उज्जैन - रहस्य मराठीत

          मध्य प्रदेश, उज्जेन शहरापासून किमान आठ किलोमीटर दूर अंतरावर कालभैरव चे मंदिर आहे. या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे; प्रसाद म्हणून फक्त दारू दिले जाते. होय ! आश्चर्य अजून बाकी आहे - दारूनी भरलेला ग्लास जेव्हा कालभैरव च्या मूर्तीच्या तोंडासमोर नेले जाते तेव्हा बघता बघता ग्लास खाली होऊन जातो. या मंदिराच्या बाहेर तुम्हाला अनेक दारूचे दुकान दिसतात.

काल भैरव मंदिर उज्जैन रहस्य मराठीत - Khasmarathi
काल भैरव मंदिर उज्जैन रहस्य मराठीत - Khasmarathi

          मित्रांनो आता तुमच्या डोक्यात हा प्रश्न उठलाच असेल की - दगडाची एक मूर्ती दारू कशी काय पिऊ शकेल ? होय ! हे एक रहस्य आहे ; ज्याबद्दल शास्त्रज्ञांनाही अजून त्याचे मुख्य कारण भेटलेले नाही. पण अनुसार पौराणिक कथेनुसार - एकदा ब्रम्हा ने शिव चा अपमान केला. अपमान झाल्यामुळे शिव खूपच क्रोधीत झाले. खूपच क्रोधीत झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून कालभैरव प्रकट झाले. क्रोधीत कालभैरव ने ब्रम्हा च्या पाचव्या डोक्याला कापून दिले ज्यामुळे त्यांना ब्रह्म - हत्येचे  पाप लागले .


          हे पाप दूर करण्यासाठी भैरव अनेक ठिकाणी गेले ; पण त्यांना मुक्ती मिळाली नाही. शेवटी त्यांनी शिव ची आराधना केली. शिवने, भैरवला सांगितले की - उज्जैन क्षिप्रा नदीच्या भर ओखर शमशान जवळ तपस्या केल्याने त्याला या पापांपासून मुक्ती मिळेल. तेव्हापासून त्या जागेवर काल भैरव ची पूजा केली जाते.


          तुमच्या माहिती करता तुम्हाला सांगून देऊ की - कालांतराने त्या जागेवर एक मोठं मंदिर बांधण्यात आले आणि या मंदिराचे निर्माण परमार वंशच्या राजांनी केले होते.

स्तंभेश्वर महादेव मंदिर - रहस्य मराठीत

          बर्‍याच पुराणात या मंदिराचा उल्लेख आहे. भगवान शंकरपुत्र कार्तिकेय यांनी महिसागर संगम तीर्थाच्या पवित्र भूमीवर शिवलिंग स्थापित केले. ज्याला श्री स्तंभेश्वर महादेव म्हणतात. हे मंदिर गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील जंबूसार तहसीलमधील कवी कंबोई समुद्रकाठा वर आहे. या मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की केवळ दर्शन घेतल्यास त्या व्यक्तीचे सर्व दु: ख दूर होतात आणि त्याची सर्व इच्छा पूर्ण होते.

स्तंभेश्वर महादेव मंदिर रहस्य मराठीत - Khasmarathi
स्तंभेश्वर महादेव मंदिर रहस्य मराठीत - Khasmarathi

रहस्य :      मित्रांनो, तुम्ही कोणत्याही मंदिरात पुजाऱ्याला मूर्तीचे अभिषेक करताना पाहिले असेल. पण हे एकमेव असे मंदिर आहे की - ज्याचा अभिषेक कुणी पुजारी नवे; तर स्वतः समुद्र करतो. होय! समुद्र दिवसभरातून दोन वेळेस श्री स्तंभेश्वर शिवलिंगाचे स्वतः अभिषेक करतो. असे होते की समुद्राचं पाणी इतके वाढते कि संपूर्ण मंदिर पाण्यात डुबून जाते आणि थोड्याच वेळात पाणी उतरून हि जाते. खरंच या रहस्याला सोडवणे शास्त्रज्ञांसाठी तर डोकेदुखीच आहे.

तवानी मंदिर हिमाचल प्रदेश - रहस्य मराठीत

          हिमाचल प्रदेश धर्मशाला पासून 25 किलोमीटर दूर अंतरावर तवानी मंदिर स्थित आहे. तुम्हाला तर माहितीच असेल धर्मशाला हे गरम पाण्याच्या धबधब्या आणि तलावासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरा जवळ सुद्धा एक तसेच तलाव आहे, ज्या तलावाचे पाणी गरम आहे. या तलावात आंघोळ केल्यानंतरच दर्शनासाठी आलेल्या भक्तजनांना मंदिरात प्रवेश करता येते. आता हे सुद्धा एक रहस्य आहे की - या तलावातले पाणी गरम कसे होते ? आज पर्यंत या रहस्य वरून शास्त्रज्ञांना परदा काढता आलेला नाहीये.


          मित्रांनो मंदिराजवळ असलेल्या या तलावातले पाणी शरीरासाठी खूप फायदेकारक आहे, कारण या पाण्यात शरीरासाठी आवश्यक तत्व असतात.

करणी माता मंदिर बिकानेर - रहस्य मराठीत

          राजस्थान, बिकानेर पासून काहीच अंतरावर देशनोक नावाचे स्थान आहे, या स्थानावरच करणी माता मंदिर उपस्थित आहे. या मंदिराला मूषक मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला भक्तांना पेक्षा जास्त काळे उंदीर दिसतील. जर तुम्हाला त्यामध्ये एखादा पांढराशुभ्र उंदीर दिसला, तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. असे तिथल्या लोकांची मान्यता आहे. हे मंदिर उंदीरांचा काबा आहे. तिथं गेल्यानंतर भक्त उंदरांना दूध, लाडू इत्यादी खायला देतात. आश्चर्य म्हणजे त्या मंदिरात असंख्य मंदिर असून सुद्धा मंदिराच्या पायऱ्यांवर बाहेर पाय ठेवल्यास तुम्हाला एकही उंदीर दिसणार नाही.

करणी माता मंदिर बिकानेर रहस्य मराठीत - Khasmarathi
करणी माता मंदिर बिकानेर रहस्य मराठीत - Khasmarathi

रहस्य :      उंदरांची दुश्मन म्हणजे मांजर. इतके असंख्य उंदीर असून सुद्धा एकही मांजर त्या मंदिरात प्रवेश करत नाही. हे जाणून सुद्धा आपल्याला आश्चर्य होऊ शकते की - प्लेग रोग उंदरांपासून होतो आणि ज्या वेळेस प्लेग रोगाने आपला आतंक दाखवला होता. तेव्हा मंदिरच नाही, तर जवळचे सर्व गाव या रोगापासून सुरक्षित होते.


***तर मित्रांनो हे होते भारताचे पाच रहस्यमय मंदिर त्यांच्याबद्दल या आर्टिकल च्या माध्यमाने आपण जाणून घेतले. आम्ही आशा करतो की - आपण ही माहिती आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर सामायिक कराल (शेयर) आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या माहितीबद्दल आपले मत द्याल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने