चालू घडामोडी : 14 ऑगस्ट 2020 ||  Daily Current Affairs 2020 - 2021

  
          नमस्कार मित्रांनो, आपण दररोज स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा चालू घडामोडी अर्थात Daily Current Affairs जे 2020 असेल अथवा 2021 मधील कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्यात 20 ते 25 गुणांसाठी हमखास विचारला जाईल असा भाग इथे घेणार आहोत ! आमच्या आजवर च्या अनुभवातून आपण इथे घेत असलेल्या चालू घडामोडींचा फायदा  MPSC, UPSC, BANKING, RAILWAY, RRB, TALATHI, PSI-STI-ASSISTANT, तसेच कनिष्ट लिपिक पासून अगदी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला होईल ! त्यामुळे " खासमराठी सोबत चालू घडामोडींचा अभ्यास " याला एक सवयीचा भाग बनवा ! दररोज अगदी एकही दिवस न चुकता #चालू घडामोडी या आमच्या विभागाला भेट देत रहा !


टीप : दररोज 5 ते 10 मिनिटे खासमराठी चालू घडामोडी या विभागावरील शब्द न शब्द वाचून यावरील नोट्स 
        बनवल्या आणि या नोट्स चा तुमच्या परीक्षेच्या एक दोन दिवस आधी सराव (Revision) केला तर याचा 
        फायदा तुम्हाला खूप होईल ! 

चालू घडामोडी : 14 ऑगस्ट 2020 ||  Daily Current Affairs 2020 - 2021


🔸 क्रीडा मंत्रालय 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत फिट इंडिया फ्रीडम रन या देशभरातील सर्वाधिक धावांचे आयोजन करेल.



 ‘नया श्रीनगर’ आणि ‘नया जम्मू’ या प्रकल्पांची घोषणा करण्याची शक्यता :


🔸 जम्मू व काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या एका वर्षांनंतरही या ठिकाणी वास्तविक विकास नजरेला पडत नसल्याची टीका होत असताना, ‘नया श्रीनगर’ आणि ‘नया जम्मू’ या हायटेक आणि पर्यावरणपूरक शहरांसह महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करण्याची शक्यता आहे.


🔸 एका आठवडय़ापूर्वीच केंद्र सरकारने माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज सिन्हा यांची जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे.


🔸 या प्रकल्पांच्या अंतिम आराखडय़ावर केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि जम्मू- काश्मीर प्रशासन हे संयुक्तपणे काम करत असून, पंतप्रधान वैयक्तिकरीत्या त्यावर देखरेख करत आहेत.



🔸 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इस्रायल यांच्यात नवीन शांतता कराराचा भाग म्हणून संपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास सहमती दर्शविली आहे.



➤ पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे ठरले.


🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिवंगत माजी पंतप्रधान अजट बिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडला.


🔸 मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस पक्षाबाहेरील नेता ठरले आहेत. तर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणाऱ्यांच्या यादीमध्ये मोदींनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.


🔸 काँग्रेसमध्ये नसलेले पण पंतप्रधान पदाचा कार्यकाळपूर्ण करु न शकलेल्या नेत्यांमध्ये मोरारजी देसाई, चरण सिंग, व्हि. पी. सिंग, चंद्र शेखर, एच. डी. देवेगौडा आणि इंदर कुमार गुजराल यांचा समावेश होतो.



🔸 रशिया आणि ब्राझील यांनी जगातील प्रथम नोंदणीकृत कोरोनाव्हायरस लस स्पुतनिक व्हीच्या उत्पादनात आणि मार्केटींगमध्ये सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.



 जुलैमध्ये महागाई वाढली; सरकारची आकडेवारी जाहीर.


🔸 जुलै महिन्यामध्ये देशातील ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ६.९३ टक्क्यांवर पोहोचल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे.


🔸 देशातील अन्नधान्याच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे चलनवाढीच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



🔸 भारतीय तटरक्षक दलासाठी ऑफशोअर पेट्रोल वेसल (ओपीव्ही) सुरू करण्यात आले आणि त्याचे पुन्हा नाव भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘सार्थक’ असे दिले गेले.



 ब्रिटनची अर्थव्यवस्था २०.४ टक्क्यांनी घसरली.


🔸 कोरोना लॉकडाऊनमुळे ब्रिटनमध्ये एप्रिल ते जून या तिमाहीत अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, देशात अधिकृतरीत्या मंदीची स्थिती निर्माण झाली आहे.


🔸 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत अर्थव्यवस्था २०.४ टक्क्यांनी घसरली आहे. दुकाने बंद राहिल्यामुळे घरगुती खर्च घसरला आहे. त्यामुळे कारखाना उत्पादन आणि बांधकामात मोठी घसरण झाली आहे.



🔸 जपानने बांगलादेशसाठी  3.1 अब्ज डॉलर्स किंमतीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे कर्ज पॅकेज दिले आहे.



          मित्र आणि मैत्रिणींनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? आणि पुढचे आर्टिकल तुम्हाला कोणत्या विषयावर वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान असतो . हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता. खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते धन्यवाद... !! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने